४६३) #MySixWordStory

४६३) #MySixWordStory

अर्नेस्ट हेमिंग्वे नावाचा अमेरिकेचा एक प्रसिद्ध लेखक, पत्रकार आणि कादंबरीकार होता. एकदा त्याच्या सहकारी लेखकांनी त्याला आपल्या आयुष्याबद्दल सहा शब्दात लिहायचे आव्हान दिले. तेव्हा त्याने आपल्या रुमालावर पुढील वाक्य लिहले. For sale: Baby Shoes, Never Worn. (अर्थ – विक्रीस उपलब्ध :बाळाचे बुट, कधीच न घातलेले.) तेव्हापासूनच ही पध्दत सुरु झाली. २००८ साली अशा स्टोरींसाठी एक स्वतंत्र वेबसाईटही बनवली होती.   २ जुलैला या लेखकाचा स्मृतीदिन असतो.

———————————————————————–

सध्या फेसबुक वर #Mysixwordstory चा धुमाकूळ चालू आहे. सुरवातीला हा नेमका काय प्रकार आहे हे समजत नव्हते. परंतु लवकरच खुलासा झाला. असे वाटले कि सहा शब्दात कसे काय मनोगत प्रगट  करणार? म्हटले बघू या. प्रयत्न तर करूया. मग जसा पहिला प्रयत्न केला तेव्हा पटले कि हे काही खूप कठीण नाही. मग जसे सुचले तसे विचार शब्दांकित करत गेलो.

मित्रानो, तुम्ही सुद्धा प्रयत्न करून बघा. !!!

———————————————————————–

१) जे मिळाले आहे त्यावर प्रेम करा.

२) आयुष्यात हवे असलेले सर्व मिळते का ?

३) Monsoon आला पण पाऊस  नाही आला.

४) देवाने माणसाला डोळे दिले, डोळसपणाचे काय?

५) पैसा हा जगण्यासाठी नक्की आवश्यक असतो

६) पैसा  हे आयुष्याचे ध्येय असू शकत नाही.

७) मनात असलेले बोललेच पाहिजे असे नाही.

८) जे बोलाल ते मनात असले पाहिजे.

९) नात्यात पैसा आला कि नाती बिघडतात.

१०) पती – पत्नी एकमेकांचे मित्र असले पाहिजेत.

११) प्रेम हे ओंजळीत धरलेल्या पाण्यासारखे असते.

१२) वैवाहिक आयुष्यात इतरांच्या अपेक्षांमुळे गुंता होतो.

१३) देव भक्ताने मागितलेले सर्व देत नाही.

१४) भक्ताने न मागता सुद्धा देव त्याला देतो.

१५) देवाला आपली गरज चांगली ठाऊक असते.

१६) Success = combination of intelligence,efforts, luck.

१७) बचत हा सुद्धा एक प्रकारचा खर्च आहे.

१८) वैवाहिक आयुष्यात प्रेम आणि विश्वास महत्वाचा.

१९) समोरचा  माणूस आवडण्याचे कारण कळले पाहिजे.

२०) भोगलेल्या दु:खाला मला  सुख मानावे लागले.

२१) इतके भोगले कि मला हसावे लागले.

२२) वेळ आल्याशिवाय खेळ उभा राहत नाही.

२३) उद्यापासून काही काळ फेसबुक संन्यास घेणार.

२४) काळ आला पण वेळ आली नव्हती.

२५) मृत्यू हे एक सुंदर काव्य आहे.

 

सुधीर वैद्य

१३०६२०१६

Advertisements

0 Responses to “४६३) #MySixWordStory”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

June 2016
M T W T F S S
« May   Jul »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: