४६२) निसर्गाचा चमत्कार – Monsoon Lily

Photo5107     Photo5108    Photo5109

 

Photo5110       Photo5111

४६२) निसर्गाचा चमत्कार – Monsoon Lily

आमच्या बागेत Monsoon Lily ची झाडे आहेत. वर्षभर त्यांची निगा राखली जाते. वेळोवेळी माती, खत टाकले जाते. नियमितपणे पाणी दिले जाते. परंतु Monsoon Lily ला वर्षभर एकदाही कळी येत नाही.

परंतु पावसाच्या पहिल्या एक – दोन सारी पडल्या कि Monsoon Lily च्या झाडातून फणा  बाहेर येतो व त्यावरछोट्या छोट्या कळ्या  दिसतात. नियमित पाऊस  सुरु होणार ह्याची खात्री पटते.

दोन दिवसापूर्वी माझ्या Monsoon Lily च्या कळीने वरुण राजाच्या आगमनाची वार्ता दिली होती. काल पावसाची परत एकदा हलकीशी सर आली आणि आज सकाळी लिलीची कळी खुलली. 🙂 सकाळी फिरून आल्यानंतर फोटो session ला तयार झाली.

एखाद्या  लग्न  ठरलेल्या नवरीसारखी प्रियकराची (पावसाची) वाट पाहू लागली.  फोटो काढताना मला कळी गुणगुणल्याचा भास झाला. कळी गात होती. ~~~~

येरे येरे पावसा.
तुला देते डॉलर.
डॉलर होऊ दे छोटा.
पाऊस येउ दे मोठा.

मित्रानो डॉलर कधी छोटा होईल – कधी मोठा होईल हे सांगणे कठीण आहे, कारण भारतीय अर्थव्यवस्था एका बिकट वळणावरून जात आहे. परदेशी गंगाजळीवर  कच्च्या तेलाच्या वर – खाली होणाऱ्या  किमतीमुळे कायमच  दबाव असतो. आयात – निर्याती मधील तुटीची समस्या तर आहेच. असो. डॉलर कधी छोटा होईल तेव्हा होऊदे,  पण पाऊस मात्र भरपूर पडू दे  व दुष्काळग्रस्तांचे – शेतकऱ्यांचे  हाल लवकर संपावेत, एव्हडीच  ईश्वर चरणी प्रार्थना.

सुधीर वैद्य

०६-०६-२०१६

Advertisements

0 Responses to “४६२) निसर्गाचा चमत्कार – Monsoon Lily”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

June 2016
M T W T F S S
« May   Jul »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: