४६१) भेट भाग २

IMG_20160528_180704313            IMG_20160528_180729063_HDR

IMG_20160528_183406979     IMG_20160530_174429450

IMG_20160530_182813745        011

023        Photo5073

४६१) भेट भाग  

मित्रानो माझी २ दिवसांपूर्वीची पोस्ट ‘ भेट ‘ तुम्ही वाचली असेलच. त्या पोस्ट मध्ये मी निसर्ग भेटीबद्दल बोलत होतो.

निसर्ग हा माझा लहानपणापासूनचा खूप जिव्हाळ्याचा मित्र आहे. त्याचे बोट धरून मी आजपर्यंत वाटचाल केली आहे. माझ्या वडिलांना निसर्गाची खूप आवड होती. कदाचित त्यामुळे माझ्यात सुद्धा निसर्गाबद्दल एक हळुवार कोपरा तयार झाला असेल. वडिलांचे छत्र लहानपणी हरवल्यानंतर निसर्गाचाच मला आधार होता. आजही मी शहरात निसर्ग शोधत असतो. माझ्या कचेरीच्या cabin मध्ये सुद्धा मी त्याला लहान प्रमाणात जपला होता. निसर्ग आपल्याला खूप काही शिकवत असतो.

नुकतीच  निसर्ग यात्रा करून आलो. मे महिन्याच्या शेवटचा आठवडा. ज्या ठिकाणी  मी गेलो होतो तेथे ह्या वर्षी मे महिन्यात पावसाने हजेरी लावली नव्हती. उन्हाच्या झळा मध्येच येणाऱ्या वाऱ्यामुळे सहन करता येत होत्या. आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा आयुष्यातील दुपार – उन्हाळा आठवतो, तेव्हा हा उन्हाळा तर काहीच नाही असे वाटते. असो .

परंतु निसर्ग मात्र मजेत होता. गुलमोहर फुलला  होता. झाडावर आंबे वाऱ्याबरोबर   डोलत होते. मातेला बालक जसे बिलगते,  तसे  फणसानी झाडाला कवेत घेतले होते. झाडावर पक्षी मजेत गात होते. बगळ्यांची मेजवानी चालली होती.  समुद्राचा  नेहमीचाच भरती – ओहटीचा खेळ  चालू होता. समुद्राच्या पाण्याचा धीरगंभीर आवाज येत होता. फुले डोलत होती. आकाशात ढग वाऱ्याबरोबर पकडा पकडी खेळत होते. वाळूत खेकड्यांनी सुंदर चित्रे  रेखाटली होती. खजुर्या संध्याकाळच्या सूर्यप्रकाशात चमकत होत्या. बोगनवेल मस्त फुलली होती.

उन्हाळा तर सर्वांसाठी त्रासदायकच होता, पण निसर्गाची कोठे तक्रार दिसत नव्हती. तेथील माणसाना सुद्धा उन्हाळ्याची सवय झाली होती. मला सुरवातीला थोडा त्रास झाला, पण निसर्ग भेटला आणि उन्हाळ्याचा शरीराला झालेला त्रास मनाला झाला नाही, कारण निसर्गाने मनावर हळुवार फुंकर घातली होती. निसर्ग माझा बालपणापासूनचा मित्र आहे. माझी सुख – दु:ख ह्याचा तो मूक साक्षीदार आहे. सुखाच्या आणि दु:खाच्या प्रसंगी मी नेहमीच निसर्गाच्या संगतीत असतो. तासंतास समुद्राकडे बघत बसतो. मावळतीचा सुर्य बघणे हा माझा खूप जुना छंद आहे. असो.

माणसे  आणि निसर्ग पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पाऊस  लवकरच येईल कारण घरी परतलो आणि मला आश्चर्याचा धक्का बसला कारण बागेतील monsoon lily ला चक्क कळी आली आहे. काही दिवसावुर्वी पावसाचे चार थेंब पडले होते. कळी येण्यास तेव्हडे निमित्त पुरेसे होते. वर्षभर ह्या झाडाला आम्ही पाणी घालतो पण पाऊस आला म्हणजेच ह्या Monsoon  लिलीची कळी खुलते. !!! फुले येतात.

पावसाचे स्वागत करायाल सज्ज होऊया – पावसाचा आनंद लुटू या. पाऊस  म्हणजे आकाशाचे पृथ्वीवरील प्रेम.  हे दोघे भेऊ शकत नाहीत म्हणून पावसाच्या रूपाने आकाश हे प्रेम व्यक्त करते.

मनाची कवडे उघडी ठेवून निसर्गाला भेट द्या, त्याच्याशी हितगुज करा. मग बघा मन कसे पिसासारखे  हलके होते. ताजेतवाने व्हा आणि आपल्या ध्येय पूर्तीसाठी प्रयत्न करा. शक्य असेल तर वरचे वर एक – दोन दिवस कामातून सवड काढा. तेही नाही जमले तर आपल्या परिसरातील निसर्ग शोधण्याचा प्रयत्न करा करा. . आपल्या शहरातून सुद्धा सूर्यास्त दिसतो. आपल्या परिसरात सुद्धा झाडे असतात, पानगळ होते, नवीन पालवी फुटते, त्याचा आनंद घ्या.

निसर्ग आपला मित्र आहे. आपल्या आयुष्याच्या वाटचालीत निसर्गाचा खूप मोठा वाटा  आहे. निसर्ग आपल्या आजूबाजूला सुद्धा असतो पण त्याकडे आपण दुर्लक्षच करतो. वर्षातून एकदा सुटी  घेऊन निसर्गरम्य ठिकाणी जातो पण तेथे जाऊन आपले शौक पुरे करतो. 😦

निसर्ग डोळ्यात साठवा, कॅमेऱ्यात बंदिस्त करा. डोळ्यातील निसर्ग मनात रुजवा म्हणजे तो आपल्या चेहऱ्यावर पसरेल आणि आपल्या सर्व ताण  – समस्येवर शीतल छाया धरेल. बघा  प्रयत्न करून.

शांत चित्ताने फोटो बघा आणि फ्रेश व्हा. कशी वाटली idea ची कल्पना.

सुधीर वैद्य

०४०६२०१६

Advertisements

0 Responses to “४६१) भेट भाग २”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

June 2016
M T W T F S S
« May   Jul »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: