४५९) आज माझ्या संकेत स्थळाचा ८ वा वाढदिवस (२३-०५-२०१६)

154305404590383   997034_932837186737197_932330780037976444_n

 ४५९) आज माझ्या संकेत स्थळाचा वा  वाढदिवस (२३०५२०१६)

मित्रानो, सुप्रभात

आज २३ मे २०१६ रोजी माझ्या संकेत स्थळाने www.spandane.com  ८ वर्षे पूर्ण
केली आहेत.  (Website Hosted on २३-०५-२००८) आजपर्यंत ह्या संकेत स्थळाला अंदाजे १,८६,००० लोकांनी भेट दिली आहे व संकेत स्थळावर १६,५०,००० हिट्स रेकॉर्ड झाल्या  आहेत. ह्या  संकेत स्थळाला अंदाजे ५० देशातील वाचक भेट देतात.

हे संकेत स्थळ म्हणजे एका अर्थाने माझ्या आयुष्याचा लेखा जोखा आहे.
आयुष्यातील वैयक्तिक आणि व्यावसाईक अनुभव ह्याचे हे आत्मकथन आहे. आयुष्यात जोपासलेले छंद (लिखाण, वाचन Medical, Astrology, Photography, समाज सेवा वगैरे) ज्याचा  समाजाला उपयोग होईल, share केले आहेत.

मी लिहिलेली अनेक विषयांवरची अंदाजे ४० पुस्तके अपलोड केली आहेत. मला खात्री आहे कि संपूर्ण संकेत स्थळ एका  भेटीत बघून – वाचून होणार नाही. एकदा भेट द्या आणि आवडले तर मित्रांना सांगा.

ह्या संकेत संकेत स्थळासाठी मी अंदाजे १,१०,००० रुपये आजपर्यंत खर्च केले आहेत. संकेत स्थळावर व ब्लॉगवर   एकही जाहिरात नाही त्यामुळे रसभंग होत नाही. संकेतस्थळाच्या माध्यमातून पैसा मिळवणे हा कधीच हेतू नव्हता. आपल्याकडील ज्ञान व अनुभवाचा समाजाला फायदा व्हावा ह्याच हेतूने ह्या संकेत स्थळाची निर्मिती केली आहे.  हे संकेत स्थळ मी माझ्या प्रिय वडिलांना अर्पण केले आहे.

संकेत स्थळावरील असंख्य पोस्ट माझ्या व्यावसाईक career च्या वेळी तयार केल्या गेल्या. तीच गोष्ट मी लिहिलेल्या पुस्तकांची. वर नमूद केलेले छंद सुद्धा गेल्या २० वर्षाहून अधिक काळाचे आहेत. त्यामुळे २०११ साली व्यवसायातून निवृत्त झाल्यानंतर सुद्धा माझा वेळ मजेत जातो आहे. तुमच्या सर्वांचे प्रेम आहेच.

एप्रिल २०१२ साली मी स्पंदने ब्लॉग https://spandane.wordpress.com सुरु केला. त्यानंतर खालील ब्लॉग्स सुरु केले.

http://www.slideshare.net/spandane

http://www.slideshare.net/spandaneastrology

ह्या सर्व ब्लोग्सना सुद्धा देश – विदेशातील  वाचकांचा भरगोस प्रतिसाद मिळत आहे.

आजचा दिवस माझ्यासाठी कायमचा स्मरणात राहण्याचे दुसरे एक कारण म्हणजे ह्याच दिवशी २३-०५-२००६ साली माझा जिवलग मित्र जयंत वयाच्या ५५ व्या वर्षी हे जग सोडून गेला. आमची ४५ वर्षे घट्ट मैत्री होती. आम्ही लहानपणापासून एकत्र अभ्यास केला, एकत्र खेळलो, आयुष्यातील एकमेकांच्या सुखात व दु:खात सामील झालो. एकत्र व्यवसाय केला. त्यामुळे त्याचे  अकाली जाणे माझ्या  मनात कायमचे घर करून आहे. 😦 असो.  त्याची आठवण म्हणून माझे संकेत स्थळ २३ मे रोजी होस्ट करण्यात आले.

आजचा दिवस आपल्या सर्वांना आनंदाचा, सुखा-समाधानाचा आणि भरभराटीचा जावो….

सुधीर वैद्य

२३०५२०१६

Advertisements

0 Responses to “४५९) आज माझ्या संकेत स्थळाचा ८ वा वाढदिवस (२३-०५-२०१६)”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

June 2016
M T W T F S S
« May   Jul »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: