४५८) आम्ही जातो आमच्या गावा (Good bye -Exit ) – कै. श्री राम मोरे

458) Ram More

४५८) आम्ही जातो आमच्या गावा (Good bye -Exit ) – कै. श्री राम मोरे

मित्रानो , सुप्रभात

काल दुपारी आपले मित्र श्री राम मोरे दादांचे दुखद निधन झाल्याची बातमी वाचली आणि मन अस्वस्थ झाले. मरण खरेतर माझा जिव्हाळ्याचा विषय. मरणाचे अनुभव घेतलेला व डोळ्यासमोर कणाकणाने मरण बघितलेल्या मलासुद्धा राम दादांच्या निधनाने अस्वस्थ केले. जवळच्या व्यक्तीचे निधन झाले असे वाटले.

खरेतर मी राम दादांना कधी भेटलो नाही कि कधी फोन वर बोललो नाही. आमचा संपर्क फेसबुकच्या माध्यमातून होत असे. दोन वर्षांपूर्वी माझ्या फेसबुक वरील मित्रांसाठी त्यांची ओळख करून दिली होती.

गेले काही काळ राम दादा आजारी होते. फेसबुक वर त्यांची उपस्थिती कमी झाली होती. परंतु गेल्या महिन्यात त्यांनी फेसबुक वर दमदार हजेरी लावली. परंतु त्यांच्या कवितेचा नूर काहीसा बदललेला वाटला. कदाचित प्रकृती अस्वास्थ्याचा परिणाम असावा. परंतु एव्हड्या लवकर ते exit घेतील असे वाटले नाही.

सर्व मित्र परिवारातर्फे दादांना भावपूर्ण श्रध्दांजली ..___/\__

मरण ह्या विषया वरील माझा जुना लेख पोस्ट करत आहे.
————————————————–
आम्ही जातो आमच्या गावा (Good bye -Exit )

माणसाला मरणाची नेहमी भीती वाटत असते. हे स्वाभाविकपण आहे. खरेतर हि भीती मरणाची असतेच पण त्याहून जास्त भीती असते कि आपण लोळत पडणार का? आपली कोण सेवा करणार.? पत्नी आधी वारली असेल तर हि चिंता पराकोटीची असते. ह्यामुळेच ‘मरण’ हा शब्द उच्चारायला पण माणूस घाबरतो. विनोदाने बोलायचे तर आयुष्यात दोन गोष्टी नक्की आहेत, त्या म्हणजे मरण आणि कर. (Taxation)

आपले आयुष्य म्हणजे जन्म आणि मृत्यू ह्या मधील प्रवास आहे. ह्या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाहीत. Pascal (तत्ववेत्ता) म्हणतो कि मृत्यू नक्की आहे, फक्त वेळ अनिश्चित आहे. मग मृत्यू बद्दल काळजी करण्यात काय अर्थ आहे?

कै. विनोबा भावेनी आपल्या ‘भगवत गीता ‘ ह्या पुस्तकात मृत्यू बद्दल छान विवेचन केले आहे. माणसाला शांतपणे मरण येण्यासाठी ४ देवतांची कृपा आवश्यक आहे.

१) Fire / अग्नी म्हणजे काम. माणसाने शेवट पर्यंत कार्यमग्न राहिले पाहिजे.
२) Moon / चंद्र म्हणजे चांगले, क्षमाशील मन असले पाहिजे.
३) Sun / सूर्य म्हणजे सतत नवीन शिकणे. शिक्षणाचा / अनुभवाचा उपयोग लोकांसाठी करणे.
४) Space /अवकाश म्हणजे वासना मेली पाहिजे. (detached attitude )

ह्या देवतांची मर्जी संपादन करण्यासाठी तरुण वयातच अभ्यास सुरु करावा लागेल. हा अभ्यास वाटतो तेव्हडा सोपा नाही. पूजा अर्चा, कर्म कांड एकवेळ निभावता येईल पण क्षमाशील मन, कार्यमग्नता, सेवेतील आनंद आणि वासने वर विजय संपादन करणे, खूप कठीण. हा प्रयत्न मी तरुणवयापासून करत आहे. संसारात राहून वानप्रस्थाश्रम निभावत आहे.

मरणाचा आणि माझा खूप जवळचा संबंध आहे. मरणाच्या छायेत मी मोठा झालो आहे. मी स्वत: मरणाचे अनुभव घेतले आहेत.

अल्बम मधील फोटोतून हाच message देण्याचा प्रयत्न केला आहे.

ह्या अल्बम ची Link: http://bit.ly/oWMF4w

तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट बघतोय. नुसेतच Like करून पुढे जाऊ नका हि विनंती.

 

सुधीर वैद्य
२००५२०१६

Advertisements

0 Responses to “४५८) आम्ही जातो आमच्या गावा (Good bye -Exit ) – कै. श्री राम मोरे”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

June 2016
M T W T F S S
« May   Jul »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: