४५१) आज हनुमान जयंती. शुक्रवार २२-०४-२०१६

Hanuman-!cid_7

४५१) आज हनुमान जयंती. शुक्रवार २२-०४-२०१६

सुप्रभात आणि हनुमान जयंतीच्या प्रेरणादायी शुभेच्छा.

पवनपुत्र हनुमानकी जय. “हे अंजनिच्या सुता तुला रामाचे वरदान. एकमुखाने बोला बोला जयजय हनुमान “

लहानपणी सगळे जण ऐकतात तशा मी हि रामायण, महाभारतातील कथा ऐकल्या. त्यापैकी मारुतीच्या कथांपैकी एक कथा माझ्या मनात घर करून राहिली. त्या कथेतील आशय जस जसा मोठा झालो तसा जास्त उलगडत गेला.

त्या आशयाचा मी वैयक्तिक आयुष्यात उपयोगही करून घेतला. त्या कथेवर मी एक लेख लिहिला आहे.  त्या लेखाचे  नाव आहे ‘सुप्त शक्ती’. वेळ मिळाल्यास नक्की वाचा. आजकाल + Attitude चा डंका पिटला जातो.  पण ह्या + Attitude  चा जन्म स्वत:कडील सुप्त शक्तीत दडला आहे.

मित्रानो, आपल्यातील ‘सुप्त शक्ती’ ओळखा आणि  वेळ प्रसंगी सुप्तशक्तीला आवाहन करा. मग बघा काय चमत्कार घडतो ते.

सुप्त शक्ती लेखासाठी Link: http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/33-SecretEnergy.pdf

पवनपुत्र हनुमानाकडून अनेक गोष्टी शिकता  येतात. सर्वात महत्वाची म्हणजे सेवा वृत्ती. आजच्या खा- उ- जा संस्कृतीत (खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण)   सेवा धर्माचे पालन फारच कमी होत चालले आहे.

प्रत्येकाकडे कोणतीतरी शक्ती असते. त्याचे भान जर स्वत:ला आले तर आयुष्य बनते. आपल्या अंगातील सुप्त गुण आपल्या पालकांनी, शिक्षकांनी ओळखले व आपल्याला  योग्य वेळी मार्गदर्शन मिळाले, तर आपण खरेच भाग्यवान. परंतु मोठेपणी अशीच शक्ती आपल्या मुलाबाळांकडे आहे का हे सुद्धा बघायला विसरू नका. त्यांना योग्य मार्गदर्शन करणे म्हणजे एक प्रकारे गुरुदक्षिणाच  असेल. असो.
सुधीर वैद्य

२२-०४-२०१६

Advertisements

0 Responses to “४५१) आज हनुमान जयंती. शुक्रवार २२-०४-२०१६”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

April 2016
M T W T F S S
« Mar   May »
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: