४५०) स्पंदने आणि कवडसे –१७

Cards - 1   free_investing_calcualtors      P1140622     Photo4804

 

1896733_258911194277333_1674125931_n           Mirror

४५०) स्पंदने आणि कवडसे१७

पत्याचा डाव 

आपले आयुष्य म्हणजे पत्याचा डाव असतो. पत्ते निवडण्याचे स्वातंत्र्य नसते. दरवेळी हुकुम सुद्धा आपण ठरवू शकत नाही. पण जसे पत्ते आहेत, त्याप्रमाणे आपल्याकडील कौशल्याचा वापर  करून आपण पत्ते खेळतो. कधी जिंकतो  – कधी हरतो.

पत्त्याचा डाव आणि आयुष्य – दोन्ही ठिकाणी हार –  जीत होतच असते. आपण खेळत रहायचे. खेळातील आनंदासाठी.  आयुष्यातही असेच चालत रहायचे आपल्या स्वप्नांच्या दिशेने. बघा विचार करून.

————————————

आरसा 

आरसा प्रिय नाही असा माणूस मिळणे अशक्य. आरसा कधीच खोटे बोलत नाही. परंतु आरश्यात दिसते तेच सौंदर्य असा मात्र समज करणे चुकीचे आहे, खरे सौंदर्य आरशात दिसणार सुद्धा नाही. Beauty is not what you see in the mirror. असो.

आपण करत असलेल्या कामाचे मूल्यमापन करणारा आरसा मिळत नाही. पण मनाच्या आरश्यात तुम्ही नक्की बघू शकता. असे करणे गरजेचे आहे. जेव्हा आपले कार्य बरोबर नाही किंवा अपेक्षेनुसार होत नाहीये ह्याची जाणीव दुसऱ्या  माणसाने करून दिली तर साहजिकपणे आपल्याला राग येतो. असा राग येणे जरी प्रतिक्षिप्त क्रिया असली तरी राग त्या माणसाचा नाही तर स्वत:चा आला पाहिजे. अशी

आत्म-परीक्षणाची सवय अंगी बाणवता आली तर आपले पाय नेहमी जमिनीवर राहतील.

बघा विचार करून.

—————————————-

श्रद्धा 

श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यातील सीमारेषा नेहमी व्यकीसापेक्ष व संदिग्ध असते.

भक्ती

भक्ती कोणाची, कसली, कधी, किती काळ करावी हा एक संशोधनाचा विषय आहे. वेळ मिळाल्यास कधीतरी संशोधन करावे असा विचार आहे.

रस्ता आणि आयुष्य

रस्ता आणि आयुष्य ह्यांचे फार जवळचे नाते आहे. रस्त्यात जसे खाच-खळगे, उंच -सखलपणा , लहान – मोठे खड्डे , वळणे असतात, तसेच आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवस वेगळे आव्हान घेऊन येतो. काही वेळा रस्ता जसा गुळगुळीत असतो तसे आपले बालपणीचे दिवस सुद्धा मंतरलेले असतात.  रस्त्यावरून आणि आयुष्यात जपूनच चालावे लागते. बघा विचार करून. !!!!

जे घडते तेच चांगले असते :

आयुष्यात पदोपदी आपण प्रत्येक क्षणाकडून काहीतरी अपेक्षा करत असतो. आपल्या अपेक्षेनुसार घडले तर आपण आनंदी होतो. परंतु जेव्हा आपल्या मनासारखे घडत नाही, तेव्हा आपण बेचैन होतो. हाच क्षण असतो सावरण्याचा. जे घडते ते आपल्या चांगल्यासाठी असा सकारात्मक विचार त्या क्षणी केला तर आयुष्यातील अनेक समस्या सुटण्यास मदत होईल. मित्रानो, बघ विचार करून.

वेळ असेल तर ह्या विषयावरील माझा लेख वाचा. लिंक:

http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/38-ThankGod.pdf

———————-

 

Investment – गुंतवणूक

Investment
  म्हणजे आर्थिक गुंतवणूक हे समीकरण मनात पक्के असते. पण गुंतवणूक ह्या शब्दाचा हा फारच संकुचित अर्थ आहे. जो माणूस आर्थिक गुंतवणुकीबरोबर नातेसंबंध, शारीरिक – मानसिक स्वास्थ्य, शिक्षण, कुटुंब,
मित्र- मंडळी, सकारात्मक दृष्टीकोन ह्यात गुंतवणूक करतो तो माणूस  खऱ्या अर्थाने सुखी होतो. बघा विचार करून. !!!

——————————————————-

आज ३१ मार्च

आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस, निवृत्ती नंतर मला नेहमीच भूतकाळात घेऊन जातो. माझी अवस्था आयुष्यभर ट्रेनचे सारथ्य करून निवृत्त झालेल्या व निवांतपणे नजरेसमोरून वेगाने जाणाऱ्या ट्रेन बघणाऱ्या मोटरमन सारखी होते.

१० वर्षे Financial Analyst  – Financial Controller व ३० वर्षे Auditor म्हणून काम करताना ३१ मार्च नंतर पुढील काही महिने चालणारी धावपळ नजरेसमोर येते. दर वर्षी वेळेचे – कामाचे नियोजन करून टार्गेट पूर्ण केल्यानंतर मनाला मिळणारे समाधान आठवत राहते. असो.

बदल हा आयुष्याचा अपरिहार्य भाग आहे. बदल होत राहतात. आपण ते स्वीकारतो. बदलाशी जुळवून घेतो व परत एकदा नवीन बदलाच्या स्वागताला तयार राहतो. आयुष्यात बदल होतात म्हणून तर जगण्यात मजा  आहे.

गणित 

गणित चुकले तरी चालेल पण गणित सोडविण्याची रीत चुकता कामा नये. गणित सोडविणे आणि आयुष्यातील गुंता सोडविणे सारखेच आहे. उत्तर बरोबर असेल किंवा नसेल पण रीत बरोबर असेल तर आयुष्यात निभाव लागतो. बघा विचार करून !!!!

———–

लेखन

लेखन करताना शब्दांचा फुलोरा जमला नाही तर, स्वत:ची आणि लेखनाची शोभा होते. लेखक म्हणून केलेले निरीक्षण.

ठसा

आयुष्यात स्वधर्माचे पालन करून आपल्या contribution चा ठसा, हे जग सोडताना मागे राहिला पाहिजे. असे झाले तर आपला जन्म सार्थकी लागला असे म्हणता येईल.

प्रश्न

आपले आयुष्य प्रश्नांनी सुरु होते. मुलगा झाला कि मुलगी? वजन किती? तब्बेत कशी आहे? आणि हा प्रश्नांचा सिलसिला आयुष्यभर चालू राहतो. प्रश्न हे माहिती मिळविण्याचे साधन आहे. त्यानंतरच संवाद सुरु होतो. प्रश्न विचारणे हा सुद्धा संवादाचा एक भाग आहे.

बरेच वेळा ज्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत, त्यांनाच प्रश्न विचारून भंडावले जाते. कित्येक वेळा उत्तर माहित असूनही खोडकरपणे प्रश्न विचारले जातात.

आयुष्यात सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. मग हे प्रश्न घेऊन आपण लांबच्या प्रवासाला निघतो. आपल्या मनात पदोपदी प्रश्न उमटत असतात. काही विचारले जातात तर काहींची उत्तरे काळच देतो.

वैयक्तिक प्रश्नांची उत्तरे वेळेवर मिळाली नाहीत तर ते प्रश्न विसरून जायचे असतात म्हणजे मनाला त्रास होत नाही. उत्तर वेळेवर मिळण्यात जी मजा आहे, ती मजा उत्तर ओरबाडून घेण्यात नाही.

माझ्याही मनात अनेक प्रश्न डोकावत असतात. अति विचार करण्याचा परिणाम. असो. त्याबद्दल परत कधीतरी. !!!!!!

—————————

समस्येचा स्वीकार 

प्रत्येक माणसाला – देशाला काहीतरी समस्या असतेच. समस्येशिवाय खरेतर आयुष्यात गंमतच नाही. 🙂

समस्येचा स्वीकार हि समस्या सोडविण्याची पहिली पायरी असते. समस्येचे उत्तर अनेकवेळा समस्येतच दडलेले असते. त्यामुळे समस्येचे वर्गीकरण – अभ्यास करणे आवश्यक असते. असे केले नाही, तर समस्या सोडविण्यासाठी आवश्यक असणारी वैचारिक बैठक डळमळीत बनते. हीच ती वेळ असते स्वत:ला सावरण्याची.

समस्या म्हणजे माणूस म्हणून तुम्ही किती प्रगल्भ झाला आहेत हे पाहण्यासाठी देवाने घेतलेली परीक्षा असते. हि भावना  एकदा मनात रुजली कि हेच आयुष्य बघा कसे वेगळे वाटू लागेल.

बघा विचार करून.

———–

नात्याचे ओझे

ज्या क्षणी कोणत्याही नात्याचे ओझे वाटू  लागते , त्या क्षणी ते अदृश्य ओझे उतरवण्यातच आपले भले असते. बघा विचार करून !!!!

——————

Fan 

घरातील Fan योग्य वेळी, योग्य स्पीड  मध्ये लावला तर आपल्याला सुखावह  वाटते. जेव्हा आपण कोणाचे तरी FAN  होतो, तेव्हा आपल्याला स्पीड – वेळ – प्रमाण ह्याचे भान असते का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारला पाहिजे. !!!!

नाही म्हणण्याची कला

प्रत्येक / बहुसंख्य अनावश्यक  गोष्टींना – नात्यांना  हो म्हणून मिळणाऱ्या सुखापेक्षा, काही अनावश्यक गोष्टींना वेळ – काळाचा विचार करून ‘ नाकारून / नाही  म्हणून ‘ मिळणारे सुख खूप जास्त असते. माणूस म्हणून प्रगती केल्याची ती एक खुणगाठ असते. तुमचे पायही जमिनीवर राहतात व माणूस म्हणून तुमची प्रगती होते. कदाचित आर्थिक समीकरणात हि प्रगती दाखविता येणार नाही. बघा विचार करून.

————————————-

All are equal. Why somebody should be more than equal?

सुधीर वैद्य

२२०४२०१६
Time Permitting, Follow me on …..
www.spandane.com
http://www.slideshare.net/spandane

 

 

 

 

Advertisements

0 Responses to “४५०) स्पंदने आणि कवडसे –१७”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

April 2016
M T W T F S S
« Mar   May »
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: