४४६) ऐकणे

446) Ear

४४६) ऐकणे 

आज गुरूवार, International Ear Care Day – 03-03-2016.

सर्वाना खूप खूप शुभेच्छा.

‘ ऐकणे ‘ ह्या शब्दाला अनेक कंगोरे आहेत. ह्या शब्दाचा शारीरिक अर्थ म्हणजे ऐकू येणे. मुल जरा मोठे झाले कि आई -वडिलांना काळजी असते कि ह्याला ऐकू येते आहे कि नाही? गंमतीने ते त्याच्या कानाशी चुटकी वाजवत राहतात. ज्यावेळी ते बालक त्या आवाजाला प्रतिसाद देते तेव्हा पालकांना आनंद होतो.

दुसरा अर्थ थोडा व्यापक आहे. ऐकणे म्हणजे दुसऱ्याचा  सल्ला विचारात घेऊन त्याप्रमाणे आपल्याला योग्य वाटेल अशी कार्यवाही करणे व त्याची जबाबदारी स्वीकारणे.

आज जर प्रत्येकाने दुसऱ्याचे शांतपणे ऐकून घेतले तर समाजात , कुटुंबात, व्यवसायात अनेक प्रश्न निर्माणच होणार नाहीत. लहानपणी पालकानी मुलांचे म्हणणे समजून – ऐकून घेतले नाही, तर मोठेपणी ते पालकांचे ऐकत नाहीत. मालकाने नोकरांची  न्याय बाजू  ऐकली  नाही तर उत्पादनावर परिणाम होतो. राजकारणी लोकांनी दुसऱ्या  राजकीय पक्षातील नेत्यांचे बोलणे ऐकले तर देशापुढील समस्या सुटायला मदत होईल. सासूने सुनेचे नवीन पण चांगले विचार ऐकले नाहीत तर कुटुंबात कलह होण्यास वेळ लागत नाही.

दुसऱ्याचे  ऐकणे ह्याचा  अर्थ तशीच कार्यवाही करणे असे नाही. ह्या संवादातील बरोबर काय, हितकारक काय , चुकीचे काय ह्याची शांतपणे चर्चा करून संमतीने कार्यवाही करणे. अर्थात हे लिहिणे जेव्हडे सोपे आहे, तेव्हडे ह्या प्रमाणे वागणे कठीण आहे ह्याची जाणीव मला आहे. पण असा प्रयत्न केला गेला पाहिजे हे मात्र नक्की. असो.

आज प्रत्येक जण  दुसऱ्याचे ऐकतो ते फक्त समोरच्याचे बोलणे संपण्याआधी त्याला उत्तर देण्यासाठीच. असे करण्याने मूळ  प्रश्न सुटत नाहीच तर आणखीन गहन होतो. मग सुरु होतो Argument विरुद्ध Discussion असा लढा.

Argument aims to decide WHO is RIGHT, But Discussion aims to decide WHAT is RIGHT. असो.

आपल्याला जन्मानंतर ऐकायला येते, पण काय ऐकायचे, कोणाचे ऐकायचे, कधी ऐकायचे हे कळण्यास कधी कधी एक जन्म सुद्धा अपुरा पडतो, हे वास्तव आहे.

आजच्या व भविष्यातील प्रत्येक दिवशी आपण चांगलेच ऐकायचा  प्रयत्न कराल ह्याची मला खात्री आहे.

सुधीर वैद्य

०३-०३-२०१६

Advertisements

0 Responses to “४४६) ऐकणे”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

March 2016
M T W T F S S
« Jan   Apr »
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: