४४५) आयुष्यावर बोलू काही

४४५) आयुष्यावर बोलू काही

शांती आणि प्रेम 

कुटुंबात, सहनिवासात, शाळा – कॉलेजात, कामाच्या ठिकाणी, समाजात, देशात, आणि जगात शांतीने व  प्रेमाने राहण्यास माणूस कधी शिकेल.

एकटा

प्रत्येक माणसाच्या मनाच्या कोपऱ्यात एकाकी पणाची भावना असतेच. तुम्ही मान्य करा अथवा नका करू.

खाजखुजली 

हे शब्द खरेतर माणसासाठी नवीन नाहीत. परंतु सर्वसाधारणपणे हे शब्द वाईट अर्थी वापरले जातात. खरेतर ध्येय – महत्वाकांक्षा वगैरे शब्द म्हणजे ह्याच शब्दांचे गोंडस रूप आहे. माणसाच्या मनात एखाद्या  गोष्टीबद्दल खाज -खुजली (ध्येय) असल्याशिवाय त्याच्या हातून चांगले काम होत नाही.  बघा विचार करून. असो.

ओहोटी

भरती आणि ओहोटी हा निसर्गाचा नियम आहे. सुखानंतर दु:ख येते. प्रत्येक सुखात दु:ख लपलेले असते, हा सुद्धा नेहमी येणारा अनुभव आहे.

आपल्या भाग्याला ओहोटी लागू नये असे वाटत असेल तर स्वधर्म करा, कर्म चांगलेच झाले पाहिजे असा आग्रह ठेवा, पैशासाठी कामाच्या दर्जात तडजोड करू नका, प्रामाणिकपणाची कास घरा, म्हणजे आपल्या सुखाला कायमच भरती अनुभवायला मिळेल.

सौंदर्य 

वडाच्या झाडाची फळे.

बाह्य सौंदर्याला भुलू नका. जे बाहेरून आकर्षक दिसते ते आपल्याला उपयोगी असतेच असे नाही. Beauty is not what you see in the  mirror. सौंदर्याचा प्रवास आतून बाहेर व्हायला हवा. परंतु बरेच वेळा हा प्रवास बाहेरून आतल्या दिशेने होत असतो. असो.

सामान्य जनता 

मुकी बिचारी कोणी हाका …

साथ साथ

प्रत्येकाला  आयुष्य समृद्ध करण्यासाठी दुसऱ्या माणसाची साथ लागते. हि साथ वयानुसार – गरजेनुसार बदलत जाते. (पालक, शिक्षक, भाऊ, बहिण, कुटुंबातील इतर मंडळी, मित्र, बॉस, सहकारी, spouse, मुले वगैरे).  अशी साथ योग्य माणसाकडून, योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात मिळाली तर त्याच्यासारखा भायवान तोच. बघा विचार करून कि तुम्हाला अशी साथ मिळाली का?

तोल

मुल वर्षभरातच कशाला तरी घरून उभे राहायचा व चालायचा प्रयत्न करते. सुरवातीच्या प्रयत्नात लगेच यश मिळतेच असे नाही. पण ते मुल प्रयत्न करणे सोडत नाही. कालांतराने ते मुल तोल सांभाळून चालू लागते.

परंतु काही व्यक्तींच्या बाबतीत खऱ्या अर्थाने तोल सांभाळणे व नेमकी वाट पकडणे – योग्य वेळी आयुष्यात वळण घेणे वगैरे त्यांना आयुष्याच्या अखेरपर्यंत जमत नाही, असे माझे निरीक्षण आहे.

बघा विचार करून.

आजची तारीख १५१२१५

बदल हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तो न कुरकुरता स्वीकारता आला पाहिजे आणि त्या वळणावर न थांबता नवीन बदलाच्या स्वागताला तयार झाले पाहिजे. आपल्या आयुष्यात अनेक वळणे येतात. त्या प्रत्येक वळणाला तुम्ही कसे सामोरे जाता, ह्यावर तुमच्या  आयुष्याचा लेखा  – जोखा अवलंबून असतो, असे मला  वाटते. आजची तारीख हेच सांगत असेल का?

आतल्या गाठीचा

लोकांनी आपल्याला ‘ आतल्या गाठीचा ‘ असे म्हणू नये अशी इच्छा असेल तर जे बोलाल तेच मनात असू दे. तसेच जे मनात असेल ते वेळप्रसंगी  बोलता आले पाहिजे.

बघा विचार करून.

कट्यार 

आयुष्यात योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य मार्गदर्शनाची कट्यार जर आपल्या काळजात घुसली तर, आपले आयुष्य संगीतमय होते. बघा विचार करून.

ऐकणे

आपल्याला जन्मल्यापासून ऐकायला येते. परंतु काय ऐकायचे, कोणाचे ऐकायचे, किती   ऐकायचे, कधी ऐकायचे  हे कळायला काही माणसांना एक जन्म सुद्धा पुरत नाही.

सुधीर वैद्य

३०१२२०१५

Advertisements

0 Responses to “४४५) आयुष्यावर बोलू काही”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

March 2016
M T W T F S S
« Jan   Apr »
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: