४४१) Selfie सेल्फी / लेखक : शिल्पा नवलकर / दिग्दर्शक : अजित भुरे

441) IMG_20151210_103555869

४४१) Selfie सेल्फी  / लेखक : शिल्पा नवलकर / दिग्दर्शक : अजित भुरे

Selfie – सेल्फी  हे नाटक नुकतेच बघितले. नाटक खूप भारावून टाकणारे आहे. अश्या धाडसी विषयावर नाटक लिहून समाज प्रबोधनाचा प्रयत्न केल्याबद्दल लेखिकेचे मनापासून अभिनंदन.

नाटकाचा विषय:

ट्रेन वेळापत्रकानुसार धावत नसल्यामुळे एका रेल्वे स्टेशनच्या महिला वेटिंग रूम मध्ये ५ स्त्रिया अडकून पडतात. वेळ घालवण्यासाठी म्हणून एकमेकींशी ओळख करून घेतात. सहज बोलता  बोलता त्या स्वत:चे  आयुष्य share  करतात. अनेक वेळा मनातील खोल जखम अनोळखी माणसासमोर बोलायला लाज वाटत नाही. ह्या स्त्रीयांना असे वाटते कि एकदा ट्रेन सुरु झाल्या कि प्रत्येक जण आपापल्या ट्रेनने  मार्गक्रमणा करेल व आपण काही परत एकमेकांना काही भेटणार नाही त्यामुळे मोकळेपणी बोलायला काय हरकत आहे? त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या आयुष्यातील व्यथा , चुका ह्यात प्रेक्षक गुंतत जातो. प्रत्येक स्त्री दुसरीची  बाजू ऐकुन झाल्यानंतर स्वत:चे मत देत राहते व त्यातून एकमेकीना counselling  होते. आजपर्यंत आपले काय बरोबर – काय चुकले ह्याचा  लेखा – जोखा  मनात मांडला जातो व पुढील आयुष्य कसे जगले पाहिजे ह्याचा विचार त्यांना सुचतो.

नाटकाचा विषय चाकोरीबाहेरचा आहे. हा विषय खरेतर समाजाला नवीन नाही.  पण उघडपणे बोलण्यावर अलिखित बंदी आहे, ह्या अर्थाने हा विषय चाकोरीबाहेरचा आहे. प्रत्येक माणसासाठी लग्न हा आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा असतो. स्त्री साठी हा टप्पा जरा जास्तच महत्वाचा असतो.  सामाजिक रीत म्हणून तुलाच तडजोड करायची आहे, त्यामुळे स्त्री जन्माला दोष देवून स्वत:चे  आयुष्य का बरबाद करायचे? हाच विचार तिच्या मनावर ठसविला जातो. बलात्कार शारीरिक असतो तसा मानसिकही असतो. समाजाच्या प्रस्थापित चालीरीतीने प्रत्येक स्त्री वर ओढवणाऱ्या मानसिक बलात्काराच्या प्रसंगांचा पंचनामा लेखिकेने मांडला आहे.

स्त्री जन्मत नाही, तर घडवली जाते हे खरे सत्य आहे. स्त्री वरील अत्याचाराच्या बातम्या रोज आपण वाचतो, त्यातील कारणे शोधतो, शक्य असेल तेथे प्रथम स्त्रीला दोष देवून मोकळेही होतो. चर्चेच्या शेवटी पुरुषाची मानसिकता बदलल्याशिवाय स्त्रीला खरा न्याय मिळणार नाही असे म्हणून आपली विद्वत्ता पाजळतो. पण हि मानसिकता बदलण्याचा प्रयत्न कसा आणि कोणी करायचा हे मात्र सांगत नाही. हि पुरुषांची मानसिकता लेखिकेने अधोरेखित केली आहे.  स्त्रीनेच  आतापासूनच  पुरुषांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मन हे मन असते पण बाईचे मन आणि पुरुषाचे मन ह्यात फरक असतो. हा फरक ज्या बाईला आणि पुरुषाला कळतो, त्यांचे संसार यशस्वी होतात.

स्त्री जन्मत नाही, तर घडवली जाते. आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर, प्रत्येक स्त्रीने मी काय करू शकते, मी काय करणार, किती – कुठपर्यंत तडजोड करणार, स्वत:ला काय नको – काय हवे , मी काय करणार नाही, हे नक्की करणे आवश्यक आहे. हि शिकवण तिला लहानपणापासून मिळाली पाहिजे.

स्त्रियांच्या संदर्भात वाचनात आलेले एक वाक्य देण्याचा मोह मी टाळू शकत नाही. ह्या एका वाक्यात स्त्री चे वर्णन केले आहे.

A woman’s strength amazes men. She can handle trouble and carry heavy burdens. She holds happiness, love and opinions. She smiles when she feels like crying, cries when she’s happy and laughs when she’s afraid. Her love is unconditional!! There’s only one thing wrong with her, she sometimes forgets what she is worth…..

आजच्या स्त्रियांची खरेतर हीच शोकांतिका आहे. लग्न हे बरेच वेळा आयुष्याचे ध्येय बनते – लादले जाते. चांगेल दिसणे, शिकणे, नोकरी  करणे, स्वभावाला  मुरड  घालणे, गृह कृत्य दक्ष होणे हे केवळ लग्न होऊन सासरी जाणे ह्यासाठीची गुंतवणूक असते. हे सर्व करताना स्त्री स्वत:चे स्व विसरत असते किवा  दुसऱ्या गोष्टीत शोधत राहते. सुख बाह्य गोष्टीत शोधत राहते. स्वत:च्या  सुखाची व्याख्या मात्र करत नाही. दुसऱ्याच्या सुखात आपले सुख अशी स्वत:ची समजूत काढत राहते. पण असे करून ती खरेच सुखी होते का? वरवर सुखी दिसत असली तरी मनातल्या मनात कुढत राहते. हीच तिची शोकांतिका लेखिकेने नाटकात मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

लेखिकेच्या निरीक्षणशक्तीची ताकद एवढी प्रचंड आहे कि हे नाटक बघितल्यानंतर मग ती स्त्री असो किवा पुरुष, एका निराळ्या व  चांगल्या नजरेने स्वत:कडे आणि भिन्नलिंगी व्यक्ती कडे बघू लागेल.

कथेच्या ओघात लेखिका social media, भारतीय रेल्वे  वगैरे विषयांचा लेखा  – जोखा मांडते.

नाटकाचे दिग्दर्शन:

अजित भूरेनी  नाटक छान दिग्दर्शित केले आहे.  नट्यांची निवड भुमिकेप्रमाणे योग्य वाटते. सर्व व्यक्तिरेखा प्रातिनिधिक आहेत. सर्व पात्रे नुसताच अभिनय करत नव्हती तर भूमिका जगत होती. नाटकाची संहिता प्रखर होती, त्यामुळेच असा अभिनय शक्य झाला.

पात्रांचे कपडे भूमिकेप्रमाणे योग्य होते. त्यांचे विचार आणि  व्यक्तिमत्व त्यांच्या  ड्रेस मधून अधोरेखित झाले.  त्यातील तीन व्यक्तिरेखा बोल्ड आहेत हे ठसविण्यासाठी त्यांचे दारू पिणे  नसते दाखविले तरी चालले असते, कारण त्यांच्या  देहबोलीतून , कपड्यांवरून पुरेसा message प्रेक्षकांना मिळत होता. नाट्यकथा  ठळकपणे  अधोरेखित करण्यासाठी दिग्दर्शकाने ह्याचा वापर केला असेल असे वाटते.

नाटकाचे नेपथ्य:

नेपथ्यकाराने रेल्वेची वेटिंग रूम नेमकी साकारली आहे. पण हि  वेटिंग रूम जर जास्तच झगमगीत वाटली.

कलाकारांचा अभिनय:

ह्या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या नाटकात एकही पुरुष पात्र  नाही. सर्व स्त्री कलाकारांनी आपापल्या भूमिका चोख पार पाडल्या आहेत. डावे – उजवे ठरविणे खरेच कठीण आहे.

मित्रानो, वेळात वेळ काढून हे नाटक नक्की बघा. तुमचा वेळ फुकट जाणार नाही ह्याची खात्री मी देतो. पण नाटक  खुल्यामनाने बघणे आणि आपल्या आचार – विचारात बदल घडविण्याचा प्रयत्न करणे मात्र आवश्यक आहे.

सुधीर वैद्य
१०-१२-२०१५

Advertisements

0 Responses to “४४१) Selfie सेल्फी / लेखक : शिल्पा नवलकर / दिग्दर्शक : अजित भुरे”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

December 2015
M T W T F S S
« Nov   Jan »
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: