४४०) म्हातारपण

360) Old Age - 3

४४०) म्हातारपण 

म्हातारपण हा आपल्या आयुष्यातील अपरिहार्य टप्पा आहे. म्हातारपणाची चिंता ज्याला वाटत नाही, असा माणूस शोधावा लागेल. हि चिंता खरेतर मरणाच्या भीतीपेक्षा आपण लोळत तर पडणार नाही ना, ह्या गोष्टीची असते. मरेपर्यंत आपण हिंडते फिरते असू ना? असो.

म्हातारपणी आपल्या मनाचा आणि पाठीचा कणा ताठ राखण्यासाठी, तरुणपणापासून प्रयत्न करा. फळ अति पिकले कि नरम होते, पण बी मात्र टणक  असते. असेच काहीसे आपल्या बाबतीत झाले पाहिजे.

म्हातारपण सुसह्य करण्यासाठी काही टिप्स देत आहे.

१) जो पर्यंत आपण शारीरिक आणि मानसिक दृष्टया सक्षम आहात, तो पर्यंत वेगळे राहा व स्वातंत्र्य उपभोगा.

२) पैसा अडका – जागा आपल्या व पत्नीच्या नावावर ठेवा. प्रेमाखातर  किंवा इतर कारणांनी स्वत:ची संपत्ती मुलगा – मुलीच्या नावावर करू नका.

३) म्हातारपणी  आपली मुले आपला सांभाळ करतील, ह्या त्यांच्या बोलण्यावर

१०० % विसंबून राहू नका.  तरुण पिढीचे अग्रक्रम चटकन बदलतात, ह्याचे भान ठेवा.

४) तरुण मंडळींशी मैत्रीचे संबंध जोडा, जेणेकरून तुमच्या कठीण काळात मदत मिळू शकेल.

५) तुलना  टाळा. स्वावलंबी राहा. शक्यतो  कोणाकडून अपेक्षा ठेवू नका म्हणजे अपेक्षाभंग होणार नाही.

६) मुलाबाळांनी मागितल्या शिवाय सल्ला देऊ नका. चांगल्या शब्दात योग्य तोच सल्ला द्या.

७) आपल्या वयाची ढाल पुढे करून आपली काळजी घेतली जावी असे मानसिक दबावतंत्र वापरू नका.

८) ऐकावे जनाचे पण करावे मनाचे,  हे कायम लक्षात ठेवा.

९) देवाकडे कोणीतीही  मागणी करू नका. मागितलेले सगळे देव देत नाही याचा प्रत्यय आजपर्यंतच्या आयुष्यात आलाच असेलच.

१०) कार्यरत राहा. छंद  जोपासा. तब्बेतीची काळजी घ्या. हलका व्यायाम करा. नियमितपणे फिरायला जा. खाण्याच्या वेळा सांभाळा. जिभेवर ताबा ठेवा म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहील.

सुधीर वैद्य

०७-१२-२०१५

Advertisements

0 Responses to “४४०) म्हातारपण”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

December 2015
M T W T F S S
« Nov   Jan »
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: