४३५) उंच माझा झोका — पुरस्कार सोहळा २०१५ / १३-०९-२०१५

435) Uncha Maza Zoka

435) Uncha-Maza-Zoka

४३५) उंच माझा झोका — पुरस्कार सोहळा २०१५ / १३-०९-२०१५

झी टीव्ही वरील उंच माझा झोका — पुरस्कार सोहळा २०१५ बघून मन प्रसन्न झाले, पण त्याचबरोबर मन अंतर्मुखही झाले. कार्यक्रमाचे सादरीकरण उत्तम होते.

ह्या पुरस्काराचे हे तिसरे वर्ष. ह्या स्त्रियांचा गौरव करून समाजाचा पाठींबा त्यांच्या मागे उभा  करून त्यांना आपले  कार्य अधिक जोमाने करण्यास बळ मिळेल ह्यात शंकाच नाही.

यशस्वी स्त्रियांच्या कहाण्या आणि कार्य बघून स्त्रीशक्तीचा अभिमान वाटला. अश्या ध्येयवेड्या स्त्रिया आणि त्यांना साथ देणारे पुरुष समाजात आहेत म्हणून आज आपला समाज जिवंत आहे.

यशाच्या शिखरावर असलेल्या ह्या स्त्रियांचे पाय जमिनीवर होते. यश पचविणे हि काही सोपी गोष्ट नाही. विशेष म्हणजे ह्या स्त्रियांनी मिळालेले यश हे आपले एकटीचे नसून ह्या कार्यात साथ देणाऱ्या कुटुंबाचे, गुरूंचे, सहकाऱ्यांनी  दिलेल्या पाठींबा, मदत ह्यामुळे शक्य झाले हे आग्रहाने नमूद केले. चित्रपट सृष्टीतील पुरस्कारात हि भावना फारशी आढळत नाही. असो.

भारुड, कविता वाचन, गायन आणि कार्यक्रमातील  इतर कलाविष्कार कार्यक्रमाला सुसंगत आणि रंजकता वाढविणारे होते.

हा कार्यक्रम झी टीव्हीने परत परत दाखविला पाहिजे. ह्या कार्यक्रमाचे video, you tube वर उपलब्द्ध आहेत.

ह्या कार्यक्रमाच्या CD शहरातील शाळेतील सुखवस्तू मुला – मुलींना दाखविल्या पाहिजेत, जेणेकरून त्यांना आपल्या देशाची खरी ओळख होण्यास मदत होईल. जो पर्यंत पांढरपेशा समाज मनाला  ‘ नाही रे ‘ गटाची दु:खे – समस्या भिडत नाहीत, तो पर्यंत तळागाळाचा पूर्णपणे विकास साधणे कठीण आहे.
Media एकाचवेळी मनोरंजन आणि समाज प्रबोधन करू शकतो, हा धडा झी टीव्हीने घातला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. ह्या सर्व यशस्वी स्त्रीयांना मानाचा मुजरा.  इतर स्त्रियांसाठी ह्या कहाण्या प्रेरणादायी ठरतील असा मला विश्वास वाटतो.

सुधीर वैद्य

१४-०९-२०१५

Advertisements

0 Responses to “४३५) उंच माझा झोका — पुरस्कार सोहळा २०१५ / १३-०९-२०१५”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

September 2015
M T W T F S S
« Aug   Oct »
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: