४३३) Maturity म्हणजे काय ?

433) Maturity - canstock20711295  433) Maturity - 000805_maturity_powerpoint_template_example

४३३) Maturity म्हणजे काय ? 

Maturity शब्दाचे मुख्य असे दोन अर्थ आहेत. एक psychological आणि दुसरा अर्थ म्हणजे आर्थिक गुंतवणूक (Fixed Deposits etc.) ज्या दिवशी आपण परत withdraw करू शकतो तो दिवस.

ह्या लेखात मला ह्या विषयाची चर्चा केवळ psychological दृष्टीकोनातून करायची आहे. माणूस जेव्हा विचार करण्यात, बोलण्यात आणि  कृतीत एकवाक्यता दाखवितो, तेव्हा आपण त्याला matured व्यक्ती म्हणून ओळखतो.

थोडक्यात सांगायचे तर Maturity म्हणजे प्रसंगानुसार योग्य वेळी, योग्य जागी, योग्य प्रमाणात वागणे. परंतु हे प्रत्येकाला जमतेच असे नाही.

वयानुसार माणसाच्या बुद्धीची व मनाची वाढ होते असे म्हटले जाते. हि मनाची -बुद्धीची वाढ साधरण १८ वर्षापर्यंत होत असते. म्हणूनच १८ वर्षाखालील गुन्हेगार मुलांसाठी वेगळी न्यायव्यवस्था केलेली असते.

वय म्हणजे माणसाच्या आयुष्यातील एक ज्वलंत विषय आहे. वय नेमके कसे मोजायचे? एकाच माणसाचे वेगवेगळ्या मापदंडानुसार वेगळे वय असते का ?

स्त्रियांसाठी वय हा खूप संवेदनशील विषय असतो. अनेक पुरुष सुद्धा केसाला कलप लावून वय कमी दाखविण्याचा प्रयत्न करत असतात. माझ्या मते माणसाचे वय हे जेव्हडे शारीरिक असते, तेव्हडेच मानसिक असते. संवाद सुरु झाल्यानंतर त्याच्या विचारातून त्याचे खरे वय लपून राहूच शकत नाही.

संवाद करायला माणूस साधारणपणे २ वर्षांचा असताना शिकतो. पण काय बोलावे , कसे बोलावे, काय बोलू नये वगैरे शिकायला कधी कधी एक जन्म सुद्धा अपुरा पडतो. अश्यावेळी त्या माणसाचे नेमके वय किती समजायचे?

मनातल्या भावनेनुसार एका नात्याची प्रतिमा मनात अनुभवणं याला वयाचं काही बंधन नसावे असे मला वाटते. कित्येक वेळा लहान मुले मोठ्या माणसासारखी बोलतात – सल्ला  देतात. तेव्हा ते  बोलणे गांभीर्याने घेतले पाहिजे. आपला मुद्दा जर बरोबर असेल तर मोठ्या माणसांसमोर बोलताना घाबरायचे काहीच कारण नाही, फक्त नम्रपणे व  ठामपणे बोलावे.

वय आणि संवाद ह्यात तफावत होण्याचे मुख्य कारण म्हणजे माणसाचा जीवन प्रवास हा Child – Adult – Parent ह्या मार्गावरून होतोच असे नाही. (ह्या प्रवासाला Transactional Analysis असे म्हणतात) काही माणसांचे वय वाढते पण त्यांचा पोरकटपणा (Child instinct ) कमी होत नाही.

शिक्षणाने लहानपणीची स्वप्ने आणि त्यातील फोलपणा कळला तर माणूस Adult होतो. त्याच्या विचारसरणीत सकारात्मक बदल होतो.  त्यामुळे  त्याच्या संवादात पोक्तपणा येतो व ते बोलणे वयानुसार असू शकते.

———————————————————————————————–

दोन शब्द Transactional Analysis बद्दल :
Transactional Analysis Approach of analyzing our behavior.

We all inherit 3 ego status such as Parent (attitude, opinion) Child (feelings, emotions) and adult (thoughts, learning)

All these egos are essential and play vital role in balancing our behavior.

We move in and out of these egos in response to what is going on around us.

Child ego wants something, Adult ego makes the decision and Parent okays the decision of adult.

Child Ego State:  Emotions, Love, Joy, Fear, wants, excitement

Adult Ego State: Learning & Experience

Parent Ego State: Dos & Don’t s , Rules of Living, Prejudice.

———————————————————————————–

प्रत्येक पालकांनी  काळजी घेतली पाहिजे कि आपले अपत्य वयानुसार बोलते का नाही? लहान तोंडी मोठा घास घेण्याची सवय तर त्याला लागली नाहीये ना ? अनेक वेळा लहान मुले copy + paste style चा अवलंब करून संवाद साधतात. पालक हेच त्यांचे पहिले गुरु असतात. त्यामुळे पालकांनी मुलांच्या समोर काय, कसे , कोणासंबंधी आणि किती बोलावे, कसे वागावे ह्याचे भान ठेवणे आवश्यक आहे.

आपल्या मुलाचे वय वाढतेय पण तो खऱ्या  अर्थाने मोठा  होतोय का, हे बघणे गरजेचे आहे. Age and growing up should be automatic. But in many cases, age advances automatically but growing up is kept optional.

Parents should make this Growing up of his kid compulsory.

——————————————————————————————

चर्चेच्या ह्या टप्प्यावर Maturity (मनाची प्रगल्भता) म्हणजे नेमके काय हे शब्दांकित करण्याचा प्रयत्न करणार आहे.

१)  Maturity म्हणजे आलेल्या प्रसंगाला सामोरे जाणे. आयुष्यात प्रत्येक वेळी आपल्या मनासारखे होत नाही. जे हवे आहे ते मिळत नाही. आपल्या मनाप्रमाणे  दुसरा माणूस वागत नाही. अश्या प्रसंगात तोंड वाकडे करून, नशिबाला दोष देत न बसता, आपल्या वाट्याला आलेली परिस्थिती स्वीकारणे व त्याचे योग्य विश्लेषण करून स्वत:च्यात बदल घडवून आणणे ज्याला जमते तो Matured माणूस.

२) Maturity म्हणजे  दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न न करणे. परंतु स्वत:च्या वागण्याचे विश्लेषण करून स्वत:चे वागणे पारखून योग्य ते बदल स्वत: मध्ये घडविण्याचा प्रयत्न करतो.

३) Maturity म्हणजे  संपर्कात येणाऱ्या माणसाना जसे आहेत तसे स्वीकारणे.

४) Maturity म्हणजे  प्रत्येक जण स्वत:पुरता बरोबर असतो हे मान्य करणे. परंतु जेव्हा ह्या स्वत:च्या ‘ बरोबरचा ‘  दुसऱ्याच्या  बरोबर झगडा होतो तेव्हा खरी समस्या उभी राहते. अश्यावेळी ज्याचे चुकले आहे तो माघार घेतो, तो matured  माणूस असतो.

५) Maturity म्हणजे ज्याला दुसऱ्याला  माफ करणे.  प्रसंगा नुसार let go असे म्हणता येणे.

६) Maturity म्हणजे नातेसंबंधात अपेक्षा न ठेवता आपले प्राथमिक कर्तव्य पार पाडणे.

७) Maturity म्हणजे केवळ स्वत:च्या मन:शांती साठी वागणे . लोकांच्या डोळ्यात स्वत:ची प्रतिमा बघण्यासाठी नाही.

८) Maturity म्हणजे दुसऱ्याचे गुण प्रथम ओळखणे. समोरचा दिसतो कसा ह्या पेक्षा तो आहे कसा ह्याला महत्वाचे देणे.

९) Maturity म्हणजे  जगाला आपण किती हुशार आहोत हे सांगण्याचा प्रयत्न न करणे.

१०) Maturity म्हणजे  स्वत:च्या कर्मावर, विचारांवर विश्वास ठेवणे आणि दुसऱ्याच्या मान्यतेची (certificate ) गरज न वाटणे.

११) Maturity म्हणजे  दुसऱ्याबरोबर तुलना न करणे.

१२) Maturity म्हणजे  चेहऱ्यावर मनातील शांतीचे प्रतिबिंब दिसतणे.

१३) Maturity म्हणजे ‘ गरज ‘ आणि ‘ इच्छा ‘ ह्यात फरक करता येणे.

१४) Maturity म्हणजे आनंद – समाधान हे मिळणाऱ्या वस्तूवर अवलंबून नसतणे.

१५) Maturity म्हणजे  आयुष्यात  सकारात्मक दृष्टीकोन जपणे.

१६) Maturity म्हणजे अपयश आले तरी प्रयत्न न सोडणे. अपयशाचे मुल्य मापन करून ध्येय प्राप्तीसाठी धडपड करणे.

१७) Maturity म्हणजे आपल्या स्वप्नपूर्तीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे.

१८) Maturity म्हणजे खालील प्रश्नांची उत्तरे शोधणे.

  1. i) I don’t know what I don’t know.
    ii) I don’t know what I  know.

iii) I know what I know.

iv) I know what I don’t know.

१९) Maturity म्हणजे आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींचे खरे अर्थ कळणे.  The sign of Maturity is not when U start saying Big things but actually it is when U start Understanding Small Things.

२०) Maturity म्हणजे योग्य वेळी हो किंवा नाही म्हणणे.  नाही लवकर म्हटल्यामुळे किंवा हो उशिरा म्हटल्यामुळे, आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्याला मिळत नाहीत, ह्याचे भान ठेवणे.

२१) Maturity म्हणजे अपयशाने खचून न जाता प्रयत्न करणे. जेव्हा एक मार्ग बंद होतो, तेव्हा देव दुसरा मार्ग दाखवत असतो. तो शोधून कर्म करणे अपेक्षित असते.

२२) Maturity म्हणजे जे मिळाले आहे त्यावर प्रेम करणे, कारण जे पाहिजे ते मिळेल ह्याची कधीच खात्री देत येत नाही.

२३) Maturity म्हणजे हसून समस्या सोडविणे किंवा मौनव्रत  धारण करून समस्या टाळणे.

२४) Maturity म्हणजे जे मिळाले आहे त्याबद्दल देवाचे आभार मानणे, भविष्यातील वाटचालीसाठी देवावर श्रद्धा ठेवणे, समाज सेवा करणे, आपल्या मनात डोकावून देव शोधणे.

२५) Maturity म्हणजे आयुष्यातील  गत काळातील चुकीचे निर्णय बदलता येत नाहीत पण भविष्यात बरोबर निर्णय कसे घेत येतील हे कळणे.

२६) Maturity म्हणजे सुखाचा खरा अर्थ कळणे. Your Life should be like square meal. Your destination of ‘Happiness’ in life will be your mind it self if you can manage to keep balance between your educational/occupational career, family, health and friendship.

मित्रानो, जेव्हा लिहायला घेतले तेव्हा वाटले नाही कि हा लेख इतका लांबेल. तुम्हाला काही सुचले तर नक्की कळवा.

सुधीर वैद्य

२८-०८-२०१५

Advertisements

0 Responses to “४३३) Maturity म्हणजे काय ?”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

September 2015
M T W T F S S
« Aug   Oct »
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: