४३०) स्पंदने आणि कवडसे -१५

P1050215

४३०) स्पंदने आणि कवडसे –१५

माणूस साधारणत: मृत्यूला भीत नाही. तो म्हातारपणच्या त्रासाला भितो. आपल्यामुळे कुटुंबाला होणारा त्रास म्हातारपणी पचवणे कठीण असते.

————————————–

आपल्या लहानपणी – बालपणी आपली दुपार – संध्याकाळ, पौर्णिमेच्या चंद्रासारखी शीतल व्हावी आणि आपल्या आयुष्यात रातराणीचा सुगंध दरवळावा, ह्या उद्देशाने आई आपल्याला घडवायचा प्रयत्न करत असते. हि धडपड जर आपल्याला (दुपारी) आयुष्याच्या मध्यावरसुद्धा कळली नाही, तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच.

—————————————————-

आईचा सहवास मिळून सुद्धा वडिलांचा प्रेमळ हात अनुभवण्यासाठी माझी पाठ नेहमीच आसुसलेली राहिली.

——————————————————

आपले आयुष्य म्हणजे अनेक लहान घटनांची मालिका असते. हि माळ जर चांगली राहिली तर आपले आयुष्य सुखाचे होते. त्यासाठी माणसे जोडा, नियमित बचत करा, देवावर श्रद्धा ठेवा, तब्बेतीची काळजी घ्या, माणुसकी जपा. मग तुम्हाला काही कमी पडणार नाही.

———————————————-

आपण सर्वजण बरेच वेळा भूतकाळात तरी रमतो किवा भविष्याची चिंता करतो. पण हे वागणे फारसे बरोबर नाही. खरेतर आपल्या हातात वर्तमान असते. आपण वर्तमान सुधारण्यासाठी भूतकाळाकडे बघितले पाहिजे. भूतकाळातील चुका सुधारल्या पाहिजेत. तसेच भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी वर्तमानात कारवाई केली पाहिजे.

—————————————————–

जेव्हा आयुष्य हीच एक परीक्षा आहे, याचे भान आले तेव्हा आयुष्यभर विद्यार्थी दशेला पर्यायच उरला नाही. मग विद्यार्थी दशेचीच मजा  घेत राहिलो. परीक्षा मागून परीक्षा देत गेलो. यशस्वी सुद्धा झालो. ईश्वराची कृपा.

——————————————————

इंग्लिश शब्दकोषात Money (पैसा) हा शब्द Sincerity (प्रामाणिकपणा) ह्या शब्दाच्या आधी येतो.  हे आपल्याला माहित असूनही आपण प्रामाणिकपणे काम करून पैसा मिळविला हा आपला दोष आहे असे नवीन पिढीचे म्हणणे असते. असे वागून आपले काही बिघडले का? उलट आज म्हातारपणी प्रामाणिकपणे चार पैसे गाठीशी बांधून आपण शांतपणे शेवटच्या टप्प्याचा आनंद घेत आहोत. हि तरुण पिढी पैसे तर कमावते आहे, पण त्याचा उपभोग घेण्यास त्यांच्याकडे वेळ नाही. त्यांची किती घुसमट होते आहे ते आपण बघतो आहोत. काळाचा महिमा आहे, दुसरे काय ?

—————————————————–

आपल्या समाजात यशाचे मोजमाप हे तुम्ही यशाच्या शिडीवर किती उंच गेलात ह्यावरून ठरवली जाते. पण माझ्या मते असे मोजमाप करताना, शिडीवरील कोणत्या पायरी पासून सुरवात झाली हे सुद्धा महत्वाचे आहे . काहीवेळा तर शिडीचाच पत्ता नसतो. !!!

यश  म्हणजे काय ? यशाचे मापदंड कोणते ?  ते कसे मोजायचे वगैरे अनेक प्रश्न निर्माण होतात. यशस्वी माणूस प्रत्येक आघाडीवर यशस्वी असेल असे नाही.

सर्व आघाड्यांवर प्रमाणशीर यश असेल तरच  तो माणूस यशस्वी झाला किंवा यशस्वी आहे असे म्हणता येईल. अर्थात हे माझे मत आहे आणि ते तुम्हाला पटलेच पाहिजे असा  माझा आग्रह नाही.
यशस्वी होण्यासाठी आपल्या अंगभूत गुण दोषांवर आधारित ध्येय ठरवून कर्म केले पाहिजे. त्याचबरोबर वेळेचे नियोजन करता आले पाहिजे. ह्या प्रवासात पराभव  किंवा कमी यश वाट्याला येऊ शकते . त्यामुळे पराभवाने खचून जाता कामा नये.

यश हे आपल्या चौरस आहारासारखे पाहिजे. आयुष्यातील सर्व आघाड्यांवर (शिक्षण , नोकरी , व्यवसाय , कुटुंब , मित्र, तब्बेत, छंद, सामाजिक जाणीव – बांधिलकी, चांगले नाते संबंध वगैरे ) प्रमाणशीर यश मिळाले तर तो माणूस खऱ्या अर्थाने सुखी असे म्हणता येईल. एक – दोन आघाड्यांवर मिळालेले अति यश हे इतर आघाड्यांवरील पराभवाला adjust करू शकत नाही, हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे.

————————————————

खरेतर निवृत्ती ह्या  शब्दाचा नेहमीच संकुचित अर्थ लावला जातो. निवृत्तीचा अर्थ नोकरी – व्यवसायातून निवृत्ती असाच बरेच वेळा घेतला जातो.  आपण रोजच – प्रत्येक क्षणी  निवृत्ती घेतही असतो आणि परत तीच गोष्ट करतही असतो. बघा विचार करून. असो.

निवृत्तीहि अनेक प्रकारची असते. उ. हा. नोकरी -व्यवसायातून, जबाबदारीतून, मोहापासून, राग -लोभ – मत्सर – स्पर्धा-तुलना  अश्या अनेक विकारापासून, अतिरिक्त सुखापासून, दु:खापासून, सून आल्यानंतर सासू घरकामातून निवृत्ती घेण्याचा प्रयत्न करते, जगातून (मरण ) वगैरे …………असो. थोडे मुद्दे तुमच्यासाठी सोडतो. 🙂 🙂

नोकरीतून वयाच्या अटीमुळे माणसाला निवृत्ती स्वीकारावी लागते. काही उच्च पदस्थ त्याच कचेरीत consultant म्हणून काही वर्षे कार्यरत असतात.  अनेक जण नोकरीतून आपण एक दिवस निवृत्त होणार आहोत, ह्याचा विचार करायलाच घाबरतात. त्यामुळे निवृत्तीनंतरचे आयुष्य कसे व्यतीत करायचे हे ठरवतच नाहीत. पुढे त्यांना रिकाम्या वेळेचे काय करायचे असा प्रश्न पडतो.  अनेक व्यावसाईक मंडळीना निवृत्तीचे वय नसल्यामुळे, ते आयुष्यभर तेच तेच काम करत राहतात. पैसे कमावतात, पण आयुष्य जगायचे राहूनच जाते. ‘ समाजाचे देणे ‘ देण्याचे  सुचतच नाही – वेळही उरत नाही.

जगातून निवृत्तीची (मरण) वेळ आपल्याला माहित नसते. ज्योतिषशास्त्र थोडेफार मार्गदर्शन करू शकते. पण मरणाचा विषय निघाला कि अनेकांना  कापरे भरते. माझ्या मते मरणाचे सुद्धा व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. (आर्थिक, जबाबदाऱ्या, आपला सहभाग वगैरे ) मरण ह्या शब्दाला माणूस घाबरतो. माझ्या मते मरणासारखी सुंदर गोष्ट नाही. मरण हे आयुष्यातील अंतिम सत्य आहे.

नोकरीतील निवृत्ती आणि मरण ह्या दोन गोष्टी सोडून आपल्या मनात इतर कोणत्याही निवृत्तीच्या गोष्टी यात नाहीत.

—————————————–

आयुष्यात प्रत्येकाला समस्या असतात. काही समस्या सांगता येतात, तर काही सांगता येत नाहीत. कमी शिक्षण – गरिबी – व्यवसायातील नुकसान हा काही गुन्हा नाही.

——————————————

जन्म आपल्या हातात नसतो, पण जगावे कसे हे नक्की आपल्या हातात असते. परंतु आपल्या आयुष्यातील कौटुंबिक परिस्थिती, व्यावसाईक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती याचा आपल्या जगण्यावर परीणाम होतोच, पण न डगमगता आपल्याला  मार्ग निवडता आला पाहिजे. अर्थात हे प्रत्येकाला जमेल असे नाही.

————————————————-

आयुष्य म्हणजे सुख आणि दु:खाच्या धाग्यांचे कापड आहे. आपले कापड थोडे मळकट रंगाचे आहे इतकेच. जे मिळाले आहे त्यावर प्रेम करणे म्हणजेच सुखी जीवन.

—————————————–

आज धर्मातील यम तत्व मागे पडले आहे आणि रूढी – परंपरा – नियम म्हणजेच धर्म अशी समजूत झाली आहे. नियमामागील तत्व आणि खरा अर्थ  समजून घेण्याचा कोणी फारसा प्रयत्न करत नाहीत  हे वास्तव आहे.

————————————

प्रत्येक कौतुकात भविष्यातील  समस्या दडलेली असू शकते ह्याचे भान सुटता कामा नये. त्याच वेळी काही समस्या कमी कौतुक किंवा कौतुक न केल्यामुळे निर्माण होत असतात.

—————————————–

संवादाशिवाय माणूसाचे जगणे सुसह्य नसते.  त्याचा मनाशी संवाद सतत सुरु असतो, पण जगाशी संवाद साधल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. मनातील भावनांचा निचरा कुटुंबात झाला नाही, तर तो मित्र जवळ करतो. फेसबुकने तर संवाद साधायची खूप मोठी सोय केली आहे. प्रश्न असा आहे कि आपण एकमेकांशी का बोलतो.?

———————————————–

संभाषणाचे मापदंड म्हणजे – सत्य, चांगले, उपयोगी. माझ्या मते ह्या तीनही कसोटीवर प्रत्येक संभाषण उतरेल असे नाही.

———————————————–

काही लोक विपश्यना करण्यासाठी इगतपुरीला जातात. काही दिवस ते एक महिना एकमेकांशी न बोलता राहतात. मग परत बोलायला मोकळे.  अर्थात विपश्यनेचे फायदे आहेत. पण त्यासाठी इतरही उपाय आहेत. दिवसातील काही ठराविक काळ न बोलणे. दुसऱ्याचे वाईट न बोलणे,   स्वत: विषयी कमीत कमी बोलणे. माणसाच्या पाठीमागे न बोलणे. Gossip टाळणे. न बोलण्यातून आपल्या भावना दुसऱ्याला चांगल्या व प्रभावीपणे समजतात. एकदा सांगितल्या नंतर हा प्रयोग करून बघा. माझा अनुभव ह्या बाबतीत  चांगला आहे. विचारल्यानंतरच एखाद्या विषयावर मत प्रदर्शन करणे व योग्य (श्रेय) सल्ला देणे.

——————————————–

माणसाला सुखी व्हायचे असेल तर त्याला निग्रह आणि संयम आत्मसात करणे आवश्यक आहे.

—————————————–

निग्रह हा काही वेळा सोपा असतो, पण संयम मात्र खूप कठीण. निग्रह हे संयमाचे शेवटचे टोक असते. संयम  म्हणजे सुद्धा काही काळा पुरता निग्रहच असतो. परंतु जेव्हा संयम शक्यच होत नाही, तेव्हा निग्रह करण्या शिवाय आपल्याकडे पर्याय नसतो.

————————————

निग्रह आणि संयमाची एकदा कास धरली कि सुख – दु:खात आपले पाय जमिनीवर राहतात. हे शब्द आपल्याला चांगली वर्तणूक शैली आत्मसात करण्यास मार्गदर्शन करतात. हे शब्द आत्मसात करून व्यवहारात वापरणे वाटते  तेव्हडे सोपे नाही. हि एक तपश्चर्या आहे आणि ह्याचा अभ्यास लहानवयात सुरु करावा लागतो. पण कोणत्याही वयात प्रयत्न केला तरी ह्या बाबतीत यश येईल, कदाचित थोडा अधिक वेळ लागेल. कमीत कमी आपण आपल्या मुला बाळांना हे शिकवण्याचा प्रयत्न मात्र नक्की करू शकतो.

—————————————-

सुधीर वैद्य

१०-०८-२०१५

Advertisements

0 Responses to “४३०) स्पंदने आणि कवडसे -१५”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

September 2015
M T W T F S S
« Aug   Oct »
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: