४२९) स्पंदने आणि कवडसे -१४

397) P1140618                            P1140097
P1140073                             P1140115
४२९) स्पंदने आणि कवडसे -१४
 
अ आईचा / अ अथांग / अ अमर्याद / अ अपरंपार
अ अप्रूप / अ अखंड / अ अस्मिता / अ अमाप
अ अंगार / अ अपराजिता

हे सर्व शब्द ज्या एकाच शब्दात सामावलेले आहेत …. तो शब्द म्हणजे आई. !!!

—————————————–
Investment फक्त आर्थिक व्यवहाराचीच नसते.  आयुष्यात आपण इतरही महत्वाच्या गोष्टींमध्ये Investment करणे गरजेचे असते. बघा विचार करून. ह्या महत्वाच्या बाबी म्हणजे शिक्षण, तब्बेत, कुटुंब, मित्र, + मानसिकता.
—————————————-
आजकाल + Attitude चा डंका पिटला जातो. पण ह्या + Attitude  चा जन्म स्वत:कडील सुप्त शक्तीत दडला आहे.

मित्रानो, आपल्यातील सुप्त शक्तीओळखा आणि  वेळ प्रसंगी सुप्तशक्तीला आवाहन करा. मग बघा काय चमत्कार घडतो ते.

————————————-

आवळे पाडून खाण्यातील गंमत काही वेगळीच असते. 🙂 काय मित्रानो, आठवले का आपले बालपण ?

————————————

तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी निसर्गोपचारातील  एक हिंदी कविता सादर करतो.

पाव को रखो गरम (नियमित व्यायाम करा)

पेट को रखो नरम (जेवण – खाण्यावर नियंत्रण हवे.)

मगज को रखो थंडा (मन चिंता मुक्त करा)

वैद्यजी को मारो दंडा (वरील प्रमाणे वागणे असेल तर डॉक्टरकडे जावेच लागणार  नाही)

Health is Wealth. (चांगले आरोग्य हीच माणसाची खरी संपत्ती होय.)

तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी माझ्या शुभेच्छा.

———————————————
माणूस काय काय खातो किंवा काय काय खात नाही, हा एका वेगळ्या लेखाचा स्वतंत्र विषय आहे, त्यामुळे त्या विषयावर  न बोललेलेच बरे . 🙂
——————————————
समस्या (आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक, शारीरिक वगैरे ) आल्यानंतर योग्य तोच उपचार – उपाय केला पाहिजे. स्वत:ला निर्णय घेता येत नसेल, तर तज्ञ मंडळींवर हि जबाबदारी टाकली पाहिजे व त्यांच्या सल्ल्यानुसार वागले पाहिजे. अर्धवट माहितीवर उपाय करून किंवा गुरु – देव – व्रत – वैकल्य यांच्या आहारी जाऊन स्वत:चे आणि कुटुंबाचे नुकसान करू नये.
———————————
मित्रानो तुम्ही कधी सुखांशी भांडला आहात? आपण सर्वजण दु:खाशी भांडतो. दु:ख देणाऱ्या देवाशी भांडतो. पण सुखांशी भांडल्याचे चटकन आपल्याला आठवत नाही हे मात्र खरे.
————————————–
माणूस फक्त सुखाचा शोध घेत असतो. बालपणी आपले पालक आपल्याला सुख मिळावेम्हणून झगडत  असतात. आपण थोडे मोठे  होतो  आणि मग सुखाची चटक लागल्यामुळेआपण सुखासाठी पालकांशी भांडायला लागतो. कधी ते सुख ओरबाडून घेण्यासही आपणमागेपुढे पाहत नाही.

बरेच वेळा सुख म्हणजे नेमके काय? ह्याचा शोध लागलेला  नसतो. आपण कधी तसाविचारही गांभीर्याने केलेला नसतो. त्यामुळे आपल्याकडे जे नाही आणि  जे दुसऱ्याकडे आहे ते मिळवणे म्हणजे सुख मिळवणे अशी ढोबळ व्याख्या करून आपण मार्गक्रमणा करतो.

स्वप्नं बघणे हा माणसाचा स्वभाव आहे. हि स्वप्नं पालक मुलांच्यासाठी सुद्धा  बघतात. त्यांच्या स्वत:च्या स्वप्नाच्या मागे ती धावत असतातच. आपण पालकांची स्वप्ने साकार करावी म्हणून आपल्याला सर्व सोई सवलती पुरवण्यात येतात. किती तरी वेळा हे सर्व स्वत:च्या पोटाला चिमटा काढून केले जाते. आपण मोठे होतो आणि स्वत:च स्वप्नं बघायला लागतो, बरेच वेळा पालकांच्या जीवावर. पण आपल्या स्वप्नांच्यात आई-वडील असतातच असे नाही. जेव्हा आपली वेगळी स्वप्ने आई-वडिलांना कळतात, तेव्हा ते वेडेपिसे होतात. पण मग त्याना  कळते की आपल्या तरुणपणी आपण हेच तर  केले होते. कदाचित भाषा वेगळी असेल, स्थळ वेगळे असेल पण स्वप्नाचा गाभा तोच आहे.
 
स्वप्नासाठी किवा ध्येय पूर्तीसाठी लहानपणापासून आपण धावत असतो. एकप्रकारचीशर्यतच जणू. त्याचे TRACK आई-वडिलांनी ठरविलेले असतात.   नव-नवीन ध्येयगाठताना आपण बरेच काही गमावत असतो. सुरवातीला आपल्याला ह्याची थोडीफारजाणीव असते. पण आपण जस जसे मोठे होतो, तसे आपण आतला आवाजदाबूनटाकण्याची कला अवगत करत जातो. त्याचे justification हि करतो. काळाच्या ओघातजेव्हा आपले मन बंड करून उठते, तेव्हा आपल्या मनात बुद्धी आणि मन ह्यांचा झगडा सुरु होतो. सुखाच्या शोधात घावताना अनेक सुखाच्या जागा निसटून गेलेल्या असतात ह्याची प्रकर्षाने आठवण होत राहते. आपण वेडेपिसे  होतो. आपला आदर्शवाद कधीच आपली साथ सोडून गेलेला  असतो. आदर्शवाद पुस्तकजमा झालेला असतो. मग जाणवत राहते की आपण फक्त आयुष्यभर तडजोड करत राहिलो. खऱ्या सुखाकडे डोळेझाक करत राहिलो. हेच आपले सुखाशी केलेले भांडण असते पण हे भांडण आपल्याला फार उशिरा कळते हे आपले दुर्भाग्य असते. 
 
सुख हे चौरस आहारासारखे पाहिजे. ह्या सुखात आपली स्वप्ने, ध्येय, कुटुंब, मित्र, शरीरस्वास्थ्य, शिक्षण, प्रतिष्ठा ह्या सर्वाचा समावेश आहे का नाही हे तपासून बघा. असे झाले तर मला नाही वाटत तुम्हाला कधी सुखांशी भांडावे लागेल.
——————————–
स्वधर्माचे पालन करताना – आपले कर्तव्य पार पाडताना एकाग्रता दाखविली तर, भारतीयांची सर्वांगीण विकासाची रम्य पहाट उगवायला वेळ लागणार नाही. (विकास म्हणजे मला फक्त GDP Growth अपेक्षित नाही ह्याची कृपया मित्रांनी नोंद घ्यावी.)
————————————–
पण अंधश्रद्धा गरीब – श्रीमंत असा भेद करत नाही. गरीब अनेक वेळा परिस्थिती सुधारण्यासाठी अंधश्रद्धेचा बळी होतो तर श्रीमंत मिळवलेले वैभव टिकावे म्हणून अंधश्रद्धेच्या आहारी जातो.

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सीमा रेषा फार धुसर आहे. जो पर्यंत अंधश्रद्धेचा त्रास समाजाला – कुटुंबाला होत नाही तोपर्यंत हा प्रश्न ज्याच त्याचा आहे, असे म्हणता येईल.

——————————-
स्वप्ने

आपण  सर्व जण लहानपणापासून स्वप्ने  बघतो. काहीवेळा आपल्या पालकांची स्वप्ने आपल्यावर लादली जातात. योग्य मार्गदर्शन मिळाले व आपल्यात स्वप्न पूर्ण करायची क्षमता असेल तर काही स्वप्ने प्रत्यक्षात उतरतात. काही उरतात.

पूर्ण न झालेली स्वप्ने उराशी बाळगून  आपल्या आयुष्याची वाटचाल सुरूच असते. पण आयुष्याच्या उत्तरार्धात हि स्वप्ने  पूर्ण होण्याची  शक्यता दुरावते. मग काही वेळा हि स्वप्ने पुढील पिढीकडे दिली जातात आणि हे रहाट गाडगे चालू राहते.

अपूर्ण स्वप्ने  मला PC मधील न वापरलेल्या utility programme सारखी वाटतात. आपण फ्री म्हणून download तर केलेली असतात पण आपल्याला खरेच त्या utilityची  गरज आहे का हा विचार न करता. मग कधीतरी ह्या न वापरलेल्या Utility तीलVirus आपल्याला त्रास देतो.

अपूर्ण स्वप्नांचे पण असेच होते. म्हातारपणी आपले मन अस्वस्थ करत राहतात. कोणीतीही गोष्ट योग्य  वेळी, योग्य प्रमाणात , योग्य कारणासाठी  मिळाली तर मजा असते. म्हातारपणी हि स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द आणि वेळ निघून गेलेली असते. म्हणून आपल्या मनातील स्वप्ने वेळोवेळी तपासून बघितली पाहिजेत आणि आपल्या मनातून  कोणीही खंत न बाळगता delete केली पाहिजेत. तरच आपले आयुष्य व शेवटचा दिवस गोड होईल.

————————————-
काही प्रश्नांची उकल हि काळावर सोडून देता  आली पाहिजे. 
——————————
तुमचे  आर्थिक स्वातंत्र्यच म्हातारपण सुसह्य करेल. प्रेमात आणि नात्यात पैसा आला कि संबंध बिघडायला वेळ लागत नाही.
————————–
सासू – सून


आयुष्यातील परीक्षेत सून हा विषय नेहमी option ला टाकायचा असतो, कारण सून ह्या विषयाचा कितीही अभ्यास केला तरी हा अभ्यास परीक्षेत उपयोगी पडेलच असे कोणी सांगू शकत नाही. 🙂


सून म्हणजे सूचना नकोत. सासू म्हणजे सारख्या सूचना. 🙂
 
————————————
मनात विचार आला कि हि हुशार मुले उच्च शिक्षण घेतील, परदेशात जातील. तिथल्या स्वच्छतेचे भारतात येउन गोडवे गातील. भारतीय लोकांना शिस्त नाही म्हणून नाके मुरडतील, पण भारतात असताना आपण हि शिस्त पाळली होती का याची त्यांना आठवण येणार नाही.

समजा प्रामाणिकपणा हा विषय शाळेत शिकवला तरी हि मुले त्या विषयात चांगले गुण मिळवतील, पण प्रत्यक्षात प्रामाणिकपणे  वागतील का हा खरा प्रश्न आहे .

जे शिक्षण जागृत नागरिक तयार करत नसेल त्याला चांगले शिक्षण म्हणावे का? असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला.
—————————————————-
 
सुधीर वैद्य 
१०-०८-२०१५
Advertisements

0 Responses to “४२९) स्पंदने आणि कवडसे -१४”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

August 2015
M T W T F S S
« Jul   Sep »
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: