P1110435             07-154305404590383

४२४) स्पंदने आणि कवडसे – १०

मतप्रदर्शन 

आयुष्यात आपण एखाद्या  माणसाबद्दल – गोष्टीवर लगेच मतप्रदर्शन करून मोकळे होतो. एकाच माणसाची वेगळी रूपे असू शकतात. काही प्रसंगात उलटा – दुसऱ्या बाजूने विचार करून प्रश्न सुटू शकतात.

आपला अनुभव आणि समोरच्याचा अनुभव वेगळा असू शकतो, हे  प्रत्येक वेळी लक्षात घेतले जात नाही व आपण Judgment देऊन टाकतो.

———————————————-

आयुष्य 

आपले आयुष्य प्रमाणशीर असणे गरजेचे आहे. कोणत्याही गोष्टीचा संपूर्ण अभाव किंवा अतिरेक आपल्यासाठी घातक असतो. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी योग्य वेळ, योग्य प्रमाण आणि योग्य कारण आवश्यक असते.

—————————-

बदल 

बदल हा निसर्गाचा नियम आहे. कोणतीच गोष्ट संपत नाही – त्याचा शेवट होत नाही. ज्याला आपण शेवट म्हणतो तेव्हा ह्या शब्दात नवीन सुरवातीच्या पाऊल खुणा दडलेल्या असतात.

——————-

प्रामाणिकपणे कर्म करत राहा, स्व-धर्माचे पालन करा , कर्मकांडाच्या आहारी जाऊ नका  म्हणजे तुमची स्वप्ने नक्की साकार होतील.

———————–

संध्याकाळ

प्रत्येक संध्याकाळ वेगळे रूप घेऊन येते.  संध्याकाळ कधी तुम्हाला प्रसन्न करते, कधी उदास करते. कधी जुन्या पुराण्या आठवणी जागवते, कधी धीर देते, कधी रडवते, कधी उल्हास देते. खरेतर आपण जेव्हा संध्याकाळ अनुभवतो तेव्हा जगाच्या पाठीवर कोठेतरी रम्य पहाटेची चाहूल लागलेली असते. नवी पहाट – नवा दिवस उल्हास घेऊन येत असतो. हि सगळी रूपे आपल्या मनात असतात. आपल्या मनाचे खेळ असतात. नकळतपणे आपण ते खेळ खेळत असतो.
मित्रानो, विचार करू नका. हि कातरवेळ  अशीच  असते. अशावेळी फक्त स्वत:शी संवाद साधा. ईश्वराचे स्मरण करा. देवापुढे दिवा लावा आणि हात जोडा. दोन मिनिटे डोळे बंद करून ध्यान करा. दीर्घश्वास घ्या आणि परत एकदा अनुभवा तीच संध्याकाळ. किती छान वाटू लागेल बघा. अनुभव घ्याच.

———————–

उब 

थंडी नसताना सुद्धा माणसाला उबेची आवश्यकता असते. काय मित्रानो, चक्रावलात ? बघा विचार करून.

माणसाला जन्मापासून ऊब  हवी असते. बाळ असताना आईच्या कुशीतील ऊब त्याला हवी असते. त्याला आई – वडिलांकडून मायेची ऊब  अपेक्षित असते. यशाच्या ऊबेने  त्याचा जीव सुखावतो. नोकरीची ऊब त्याचे राहणीमान सुधारते. ज्यावेळी प्रेम करणारी पत्नी त्याच्या आयुष्यात येते, तेव्हा तो सर्वांगाने मोहरून जातो.

ज्या माणसाला काही कारणांनी मानसिक ऊब मिळत नाही, त्याचे जगणे हे शारीरिक पातळीवरच राहते, असे माझे निरीक्षण आहे.

प्रश्न असा आहे कि ज्या ऊबेसाठी आपण आसुसलेले असतो , तशी मानसिक ऊब आपण आपल्या बरोबरच्या माणसाना (कुटुंबीय, पालक, सहकारी, समाज ) देतो का? त्यांची कधी आठवण होते का? असो. बघा विचार करून.

—————-

ध्येयाकडे वाटचाल करताना अनेक अडथळे येतात, वेगळा विचार – वेगळी वाट चोखाळावी लागते. ज्या माणसाकडे योग्य वेळी तात्पुरती माघार घेण्याची, नवीन प्रयोग करण्याची – वेगळी वाट धरायची कला असते, तो माणूस आपले ध्येय गाठतोच.
——————-

जन्म आपल्या हातात नसतो पण कसे जगावे हे तर आपल्या हातात आहेना. !!!!
—————

मित्रानो आपले ध्येय डोळ्यात जपू नका. अडचणींच्या अश्रू बरोबर ते वाहून जाईल. ध्येय हृदयात जपा, जेणे करून हृदयाच्या प्रत्येक ठोक्याबरोबर ते तुम्हाला ध्येयाची आठवण देईल.

——————–

पाठीचा आणि मनाचा कणा

आपल्याही आयुष्यात अनेक समस्या येतात, नातेसंबंध पणाला लागतात, काही कुटुंबीय आपल्याला सोडून जातात, आपण दु:खी होतो, कधी खचून जातो. आपला पाठीचा कणा  वाकतो कि काय अशी शंकासुद्धा मनात येते. पण मित्रानो, घाबरू नका, हे प्रसंगच असे असतात. देवाला नेहमी माणसाची परीक्षा घेण्याची हौस असते. आपला पाठीचा कणा  आणि मनाचा कणा ताठच  ठेवा.

—————————————————

आयुष्यात सुखी होण्यासाठीचे मुलभुत प्रश्न

जर प्रत्येक माणसाने खालील प्रश्नांचा – वाक्यांचा गांभीर्याने विचार केला व प्रामाणिकपणे उत्तरे शोधली तर तो नक्की सुखी होईल किंवा कमी दु:खी होईल..
बघा विचार करून. हि उत्तरे स्वत:ला शोधता  आली नाहीत तर आपले पालक, गुरुजन, मित्र, नातेवाईक ह्यांची मदत घ्या.

1) I don’t know what I don’t know.
2) I don’t know what I  know.

3) I know what I know.

4) I know what I don’t know.

————————-

निवांत:

माणूस आयुष्यभर राब राब राबतो, जेणेकरून आयुष्याची संध्याकाळ निवांतपणे घालवता येईल. बरेच वेळा आपण आयुष्यभर पैसे कमावतो कि जेणेकरून म्हातारपण ताठ मानेने जगता  येईल . ह्या वाटचालीत आपण एव्हडे गुंतत जातो कि निवांतपणा म्हणजे काय हेच विसरायला होते. निवांतपणा हा काही जीवनाचा अंतिम टप्पा नव्हे. निवांतपणा हा आयुष्याच्या  प्रवासातच मिळवायचा असतो.

आयुष्य हे चौरस आहारासारखे असले पाहिजे. शिक्षण, नोकरी -व्यवसाय, पैसा-संपत्ती, आई-वडील- इतर कुटुंबीय, मित्र , तब्बेत – व्यायाम -आहार , आराम. छंद – करमणूक, ह्या सर्व गोष्टींना योग्य प्रमाणात स्थान देता  आले तर दिवसाची प्रत्येक संध्याकाळ तुम्हाला निवांतपणे घालवता येईल. बघा विचार करून. 🙂

You may not get what you LOVE -WANT in  Life & hence you should LOVE what you get in  LIFE .

————

जगावे कसे

वर्तमानात जगा, भूतकाळात गुंतू नका, भविष्याची अति काळजी करू नका.
भूतकाळातील चुका वर्तमानात टाळा आणि भविष्याचा आराखडा तयार करा व वर्तमानात कामाला लागा.
——————-

भेळ 

आपले कुटुंब – समाज म्हणजे सुद्धा एका अर्थाने भेळच  आहे. वेगवेगळी माणसे, वेगवेगळ्या स्वभावाची – आवडी निवडी  असलेली, वेगवेगळ्या पंथाची, शिक्षणाची, वयाची, धर्माची, जातीची, गरीब-श्रीमंत वगैरे. त्यातही स्त्री – पुरुषांचे प्रमाण हा घटक महत्वाचा असतोच. हि वर्गवारी जो पर्यंत प्रमाणात असते –  गुण्या गोविंदाने नांदते तो पर्यंत कुटुंबात – समाजात शांतता असते. ह्यातील प्रमाणात बदल झाला कि समाज अस्वस्थ होतो, भेळेत तिखट चटणी जास्त झाली कि कसा आपला मूड बदलतो, त्याप्रमाणेच हा बदल होत असतो.

आपल्या आयुष्याचे सुद्धा असेच आहे. आयुष्यात सुख, दु:ख, राग, लोभ, हेवेदावे, मत्सर, स्पर्धा, हव्यास जोपर्यंत प्रमाणात आहेत  तो पर्यंत दिवस बरे असतात. पण हे प्रमाण बिघडले आणि आपण स्वत:ला वेळेवर सावरले नाही तर आपले आयुष्य मांजा कापलेल्या पतंगासारखे होते.

———————–

जे मनात असेल ते ओठावर आले पाहिजे. मनात एक, बोलायचे एक असे त्यांना मंजूर नाही. प्रत्येक परिस्थितीचा साकल्याने उलट बाजूने विचार केल्याशिवाय, समस्येचे निराकरण करता येत नाही.

———————-

भाऊबीज

भाऊबीज (त्याच दिवशी) साजरे करणाऱ्या सगळ्याच भावा – बहिणी मध्ये खऱ्या प्रेमाचे – जिव्हाळ्याचे संबंध असतात का?

भाऊबीज (त्याच दिवशी) साजरे न करणाऱ्या सगळ्याच भावा – बहिणी मध्ये प्रेमाचे – जिव्हाळ्याचे संबंध नसतात का?

मित्रानो तुम्हाला काय वाटते ? तुमचा काय अनुभव आहे ? मनाची कवाडे उघडी ठेवून उत्तर द्या.

जर एकमेकांची मने जुळली असतील तर नातेसंबंध टिकविण्यासाठी बाह्य उपचारांची गरज नसते असे माझे मत आहे .

आज धर्मातील यम तत्व मागे पडले आहे आणि नियम म्हणजेच धर्म अशी समजूत झाली आहे. नियमा मागील तत्व आणि खरा अर्थ  समजून घेण्याचा कोणी प्रयत्न करत नाही असे मला वाटते.

————————————-

सुधीर वैद्य

२२-०७-२०१५

 

Advertisements

0 Responses to “”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

July 2015
M T W T F S S
« May   Aug »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: