४२८) स्पंदने आणि कवडसे – १३

DSCN3461       321) Mind - 1

 

P1120645-tile           P1120642-tile

४२८) स्पंदने आणि कवडसे – १३ 

स्वातंत्र्य

स्वातंत्र्य हे मिळवावे लागते. स्वातंत्र्य हे कोण कोणाला सुखासुखी देत नाही. ह्यासाठी कोठे थांबावे, आयुष्य कसे समृद्ध करावे (नुसते पैशाने नाही ) हे कळणे  गरजेचे आहे. स्वातंत्र्याला पारतंत्र्याची किनार नसेल तर परिस्थिती बिघडते.

जर एकमेकांची मने जुळली असतील तर नातेसंबंध टिकविण्यासाठी बाह्य उपचारांची गरज नसते असे माझे मत आहे .

—————————————
More / मोर

आज सर्वसाधारणपणे प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट More हवी असते. ते मिळण्यासाठी आपण लायक आहोत का ह्याचा विचार मनात येतोच असे नाही.

आपल्याला काय काय More हवे असते ह्याची जंत्री करण्याचा प्रयत्न करतो, पण मला कल्पना आहे कि हि केवळ नमुना जंत्री असेल. कारण व्यक्ती तेव्हड्या प्रकृती असे म्हणतात. 🙂

More (जास्त) सुख, पैसा , शिक्षण, सुंदर बायको, मोठे घर, सोई, मौज – मजा, सुटी, भेटवस्तू, प्रवास. हि जंत्री कितीही वाढू शकते. ………

ह्या More (जास्त) च्या मागे एकदा माणसाचा पाठलाग सुरु झाला कि मग त्याचे भान हरपते. More  म्हणजे किती More हे त्याला कळतच नाही, कुठे थांबावे हे कळत नाही आणि मग मिळालेल्याचा उपभोग घेण्याचे भान – वेळ त्याच्याकडे शिल्लक राहत नाही. तो विसरून जातो कि वयाच्या आधी आणि लायकी पेक्षा जास्त काही मिळत नाही. समजा  मिळाले तरी ते टिकवता येत नाही. अर्थात ह्या नियमाला काही अपवाद असू शकतात याची मला पूर्ण कल्पना आहे.

More चा विचार आणि पाठलाग करताना, देशात – समाजात Less काय आहे ह्याचा विचार मनाला शिवला तर आपले पाय जमिनीवर राहतील.  More च्या मागे पळताना ज्यांच्या कडे Less आहे असे सुद्धा म्हणू न शकणारे लोक ह्या समाजात आहेत ह्याचे भान सुटता कामा नये. (Jobless , Homeless , Money less)

आपल्या ग्लासात निदान अर्धे पाणी आहे (बाकीची हवा) तर अनेक लोकांकडे ग्लास आहे पण पाणी  नाही अशी अवस्था आहे. समाजातील बहुसंख्य वंचित वर्गाकडे तर ग्लास हि नाही आणि ओंजळीने पिण्यास पाणीही नाही. 😦

Poverty in the midst of Plenty अशी आपल्या भारताची अवस्था आहे. प्रत्येक सरकार आपल्या परीने प्रयत्न करीत आहे, पण स्वातंत्र्य मिळून एव्हड्या वर्षांनी सुद्धा अशी अवस्था बघून तरी ह्या More  चा हव्यास कमी केला पाहिजे.

आपल्या मनात जे MORE आहे ते मिळेल याची खात्री नसते. अर्थात त्यासाठी प्रयत्न करत राहणे आपल्या हातात आहे. त्यामुळे आपल्याला जे LESS  मिळाले आहे, त्यावर प्रेम करायला शिका. असे झाले तर मोरच sorry देव पावला असे म्हणावे लागेल. 🙂

मित्रानो, सध्या मोराचा (MORE) फोटो बघा आणि मग विचार करा.

————————————————————————————–

जीवन प्रवास

आयुष्यात आपला जीवन प्रवास अनेक वळणावरून होतो. (बालपण, शिक्षण, उच्चशिक्षण, नोकरी-व्यवसाय, निवृत्ती, म्हातारपण, वैराग्य वगैरे ) ह्या साऱ्या टप्प्यातील शिक्षणाचा काळ मी आयुष्यभर जोपासला. आपले जरी Academic शिक्षण झाले असले तरी ह्या जगात शिकण्यासारखे खूप काही आहे. जीवन प्रवासात शिक्षणाचा काळ जोपासला, तर हा प्रवास खूप आनंदी – मजेशीर होतो. आपल्या मनोभूमिकेत चांगला बदल होतो. मन संवेदनशील बनते. त्यामुळे मी अति उच्च शिक्षण पूर्ण केल्यावर सुद्धा नवीन नवीन गोष्टी शिकत राहिलो – निरीक्षण करत गेलो. ह्या शिक्षणाचा नोकरी – व्यवसायात फायदाच झाला. आयुष्यभर मी विद्यार्थी म्हणून राहणे पसंद केले. त्याचवेळी माझ्याकडील ज्ञान, माहिती आयुष्यभर share केली.
————————————————————————————–

डाग

काल  रात्रभर पाऊस पडत होता. सकाळी थोडा कमी  झाला. नेहमीप्रमाणे मी आणि बायको फिरायला बाहेर पडलो . रस्त्यावर पाण्याची छोटी छोटी तळी  झाली होती. आम्ही हि तळी  चुकवून चाललो  होतो. तेव्हड्यात एक कार आमच्या बाजूने रस्त्यावरील पाण्यातून सुसाट गेली, आमच्या कपड्यांवर पाणी उडवून. driver ला कार रस्त्याच्या मधून नेता आली असती, पण त्याने रस्त्याच्या कडेला साठलेल्या पाण्यातून नेली व आमच्या कपड्यांवर पाणी उडाले.

बायको म्हणाली कि पहिल्या पावसानेच कामाला लावले. मी गंमतीने म्हणालो कि ठीक आहे , कपड्यावरील डाग काढता येतील. पण आप्तस्वकीयांनी मनावर पाडलेल्या डागांचे काय ? काळानुसार पुसट  झालेत पण नाहीसे मात्र नाही झालेत आजपर्यंत.
————————————————————————————–

श्रीमंत कोण?

श्रीमंत कोण असा प्रश्न अनेकांना पडतो. श्रीमंतीची व्याख्या व्यक्ती सापेक्ष असते. पण बरेच वेळा श्रीमंत म्हणजे जाच्याकडे सर्व सोईसुविधा – बंगला – गाडी – नोकर – चाकर आहेत असा माणूस. श्रीमंत कोण हे ठरवताना आर्थिक बाजू जास्त विचारात घेतली जाते कारण तिची मोजदाद  होऊ शकते. पण मनाच्या श्रीमंतीचे मोजमाप लोकांना समजावून सांगणे कठीण असते. मनाच्या श्रीमंतीचा अनुभव यावा लागतो.
————————————————————————————–

गोष्ट छत्री बाळगण्याची

आपण आयुष्यात कितीतरी गोष्टी बाळगत असतो.(उ.ह. आपला अहंकार, आपला स्वभाव, आपल्या शिक्षणाचा तोरा, आपली श्रीमंती, आपली दु:खे, आपला आनंद, आपल्या कुटुंबाची मर्जी, घरातील जुन्या वस्तू,वगैरे.)

काही वेळा आपण खडूस बॉस व इतर सहकारी यानाही सहन करत असतो. तसेच जन्माबरोबर मिळणारे रक्ताचे नातेसंबंध टिकवायचा केविलवाणा प्रयत्न करत असतो. वैवाहिक आयुष्य सामोपचाराने टिकविण्याचा प्रयत्न करतो.

हे सर्व यशस्वीपणे बाळगल्यानंतर त्यात पावसाळ्यात एका छत्रीची भर पडली तर बिघडले कोठे? छत्री नेणे म्हंजे तुम्ही पावसाचा मान  ठेवण्यासारखे आहे. बघा विचार करून.

—————————————————————————

लक्ष्मण रेषा – सीमारेषा

लक्ष्मण रेषा – सीमारेषा आपल्या गुणांची असते, आपल्या शक्ती स्थानांची असते, आपल्या दुर्बलतेची असते,   दुर्गुणांची  -व्यसनांची असू शकते, आपल्या रागाची, लोभाची, द्वेषाची, अहंकाराची, मानाची, अपमानाची सुद्धा असते.

आपल्या दुर्गुणांनी लक्ष्मण रेषा – सीमारेषा ओलांडणे श्रेयस्कर नसते.  हे सांगणारे कुटुंबीय – मित्र – वरिष्ट – नातेवाईक – गुरुजन मिळाले तर आपण खरेच भाग्यवान.

लक्ष्मण रेषा ओलांडल्यामुळे रामायण घडले हे आपण जाणतोच. आपल्या आयुष्यात रामायण घडू नये असे वाटत असेल तर आपली लक्ष्मण रेषा वेळेवर ओळखा.

————————————————————————————–

प्रतिबिंब

काल  रात्री बऱ्यापैकी पाऊस  पडला. सकाळी नेहमीप्रमाणे फिरायला गेलो असता रस्त्यात छोटी छोटी तळी तयार झाली होती. सुर्य लाजत लाजत, ढगांशी लपंडाव खेळत आज  दर्शन देऊ का नको अशा मूड मध्ये होता.

अश्याच एका तळ्यात आकाशाचे – झाडाचे प्रतिबिंब पडले होते. बायकोने माझ्याकडे बघितले. तिचे डोळे मला सांगत होते कि झाले तुझे समाधान ? तुला सकाळची फेसबुक पोस्ट  मिळाली ना ?.  मी नेहमीप्रमाणे  दुर्लक्ष केले. शांतपणे mobile काढला आणि प्रतिबिंबाचा मस्त फोटो काढला.

एखादेवेळी आपणही आयुष्याचे प्रतिबिंब बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खूप छान वाटते असा माझा अनुभव आहे.

———————————————–

भरती  – ओहोटी — एक चिंतन

समुद्राला दिवसातून दोन वेळा भरती आणि दोन वेळा ओहोटी येते. भरती – ओहोटीचा अनुभव आपल्याला आयुष्यातही येतो.

आयुष्यातील ओहोटी टाळायची असेल तर स्वधर्माची कास  धरा, प्रामाणिकपणा, सचोटी, नैतिकता, परोपकार इत्यादी गुण जोपासायचा प्रयत्न करा. स्वत:चे अवगुण, राग, लोभ, मत्सर, स्पर्धेची भावना ईश्वर चरणी अर्पण करा आणि बघा आपले आयुष्यच बदलून जाईल.

भरती – ओहोटी, सुख -दु:ख हे खोखोचा खेळ खेळतात. भरती – ओहोटीच्या वेळी खालील चार शब्द लक्षात ठेवलेत तर तुमचे पाय जमिनीवरून कधीही सुटणार नाहीत. हे शब्द आहेत  ” This too will pass . ”

———————————————-

कावळ्याचे घरटे आणि पाऊस 

माझ्या निरीक्षणानुसार  कावळा जेव्हा झाडावर उंचावर  घरटे बांधतो तेव्हा पाऊस  कमी पडतो आणि जेव्हा घरटे खाली बांधतो तेव्हा पाऊस जास्त पडतो.

——————————————-

अच्छेदिन:

नुकतीच लोकसभा निवडणूक झाली. अनेक वर्षांनी एका पक्षाला मतदारांनी कौल दिला. आता अच्छेदिन येणार म्हणून प्रत्येक जण  उतावळा झाला आहे.  ज्या पक्षाला – आघाडीला आपण मताधिक्याने निवडून दिले आहे, ते तर त्यांच्या वचननाम्या प्रमाणे प्रयत्न करतीलच. परंतु हे अच्छेदिन येण्यासाठी आपण प्रत्येक जण खारीचा वाटा उचलणार आहोत कि नाही हा खरा प्रश्न  आहे.

आपण देशासाठी नेमके काय करू शकतो असा जर प्रश्न मनात पडला असेल, तर माझा लेख वाचा. लिंक: https://spandane.wordpress.com/2013/02/27/%E0%A5%A8%E0%A5%A7%E0%A5%AE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE/

———————————————-

रिमोट कंट्रोल

आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल स्वत:च्या हातात असेल तर मनाप्रमाणे आयुष्य जगता  येते. पण अश्या जगण्याचा कुटुंबियांना त्रास होणार नाही ह्याची काळजी घेणे गरजेचे असते.

राजकारणात सत्ताबाह्य रिमोट कंट्रोल असेल तर लोकाभिमुख राज्यकारभार करण्यास अडचणी येतात. मला आनंद आहे कि अनेक वर्षांनंतर मतदारांनी प्रादेशिक पक्षांच्या  रिमोट कंट्रोल ची battery काढून घेतली आहे. 🙂

———————————————————-

Happy Mother’s Day…

भारतीयांसाठी रोजच मातृदिन  असतो.  वर्षातून मे महिन्यातील दुसऱ्या  रविवारी जागतिक मातृदिन साजरा केला जातो म्हणून आपणही हा दिवस social media मध्ये साजरा करतो. पण आईचे उपकार असा एखादा दिवस साजरा करून फिटू  शकणार नाहीत ह्याची जाणीव मात्र बाळगणे गरजेचे आहे. असो .

 

—————————————————

र 

आज भारत महासत्तेच्या दिशेने दमदार पावले टाकत आहे पण आजही इतक्या वर्षांनी सुद्धा आपल्या विकासाचे दुसरे टोक  ‘ न ग र ‘ ह्या तीन अक्षरात घुटमळत  आहे .
(म्हणजे नळ  – पाणी / म्हणजे गटार – Drainage / म्हणजे रस्ता. )

आपण नगर विकासाचे आराखडे बनवितो, नगर सेवकांना निवडून देतो पण अजूनही ह्या अक्षरात राजकारण –समाजकारण करत बसतो . 😦

विजेचा प्रश्न तर भेडसावतो आहेच. महानगरे वगळता विजेचा प्रश्न गंभीर आहे.
‘ न ग र ‘प्रश्न सगळ्यांनाच आहेत. असो.

——————————————————–

सुधीर वैद्य
२२-०७-२०१५

 

Advertisements

0 Responses to “४२८) स्पंदने आणि कवडसे – १३”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

July 2015
M T W T F S S
« May   Aug »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: