४२५) स्पंदने आणि कवडसे – ११

P1110428        10-1173842_224063144466579_1395133850_n

४२५) स्पंदने आणि कवडसे – ११

इतिहासातील शिवाजीचे चरित्र आणि किल्ले आपल्याला आयुष्यात  खूप काही शिकवून जातात. इतिहासाचा उपयोग वर्तमान सुधारण्यासाठी झाला पाहिजे. परंतु बरेच वेळा इतिहासाचा अभ्यास हा हमखास मार्क मिळवण्यासाठी केला जातो.

————————

आमचे बालपण बालपणातच संपले.  बदल हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे हा धडा बालवयात  गिरवावा लागला हीच काय ती जमेची बाजू.

—————————–

No & Yes are two short words, which need a long thought. Most of the things we miss in life are due to saying No too  soon or Yes too  late.

Relationship does not shine by just shaking hands at best time. But it blossoms by holding firmly in times of critical need.

Life is all about the  little decisions you make everyday. You can’t change the decisions of the past, but every new day offers opportunity to make ‘Right’ decisions.

Good relationships are like Trees. They demand attention & care in the beginning but once they blossom, they provide u shade in all situations of life.

Silence & Smile are two powerful tools. Smile is the way to solve many problems & Silence is the way to avoid many problems.

Life means missing expected things & facing unexpected things. When You are right, No one remembers, But when you  are wrong. No one forgets.

Expect more from yourself than from others because expectation from others hurts a lot, while expectation from you inspires a lot.

The sign of Maturity is not when you start saying Big things but actually it is when you start Understanding Small Things.

“Changing the face” can change nothing. But “facing the change” can change everything. Don’t complain about others. Change yourself if you want peace.

Lovely thing to learn from Water! “Adjust yourself in every situation”. But most importantly, always find out your “own way to flow” & take everything within it which come with it.

”Waves are inspiring, Not because they Rise & Fall, But because they Never Fail to Rise Again”

It takes around two years to learn how to speak…but it takes LIFE Time to learn “ how & when to speak, what not to speak etc. etc.”

———————————————

Transactional Analysis 

वय आणि संवाद ह्यात तफावत होण्याचे मुख्य कारण म्हणजे माणसाचा जीवन प्रवास हा Child – Adult – Parent ह्या मार्गावरून होतोच असे नाही. (ह्या प्रवासाला Transactional Analysis असे म्हणतात) काही माणसांचे वय वाढते पण त्यांचा पोरकटपणा (Child instinct ) कमी होत नाही.

शिक्षणाने लहानपणीची स्वप्ने आणि त्यातील फोलपणा कळला तर माणूस Adult होतो. त्याच्या विचारसरणीत सकारात्मक बदल होतो.  त्यामुळे  त्याच्या संवादात पोक्तपणा येतो व ते बोलणे वयानुसार असू शकते.

——————————————————————

बाल संगोपन

मी पालकांना नेहमी सल्ला देतो कि मुलाबरोबर प्रेमाचे संबंध ठेवा, पण तुम्ही dual role मध्ये आहात हे भान तुम्ही सोडू नका आणि त्याची जाणीव मुलांना सुद्धा द्या. मुलाचे अवगुण स्वीकारा, त्यावर पांघरूण  घालू नका किंवा त्याचे समर्थन करून अवगुणाचे खापर कोणाच्या तरी डोक्यावर फोडू नका. (Acceptance of the situation is the first step towards improvement. )

आपल्या मुलाचे वय वाढतेय पण तो खऱ्या  अर्थाने मोठा  होतोय का, हे बघणे गरजेचे आहे. Age and growing up should be automatic. But in many cases, age advances automatically but growing up is kept optional.

Parents should make this Growing up of his kid compulsory.

———————————————————————-

गरजवंताला मानसिक आधार देणे हा समाजापुढील गंभीर प्रश्न आहे. प्रत्येकानेच आपल्या हातून होईल ती सर्व मदत अश्या अभागी जीवाला दिली पाहिजे. प्रौढी म्हणून सांगत नाही, पण मी १९९८ सालापासून समुपदेशनाचे काम सहनिवासातील मुले -मुली – जेष्ठ नागरिक, सुना – सासवा ह्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी करत आहे. माझ्या लेखनात काही अनुभव मी share केले आहेत.

———————-

मित्रानो  स्पंदने – कवडसे म्हणजे जगावे कसे हे सांगणारे  काही मुलभुत सिद्धांत आहेत.  खडतर आयुष्याने मला हे सिद्धांत शिकवले आणि मी जे अंगिकारले.

हा विषय बराच गहन आहे तसाच व्यक्ती सापेक्ष आहे. आपले म्हातारपण सुखाचे जावे असे वाटत असेल तर तरुण वयापासून  तयारी केली पाहिजे. त्यामुळे हा लेख जेष्ठ नागरिकांनी तसेच  तरुण मंडळीनी वाचला पाहिजे.

मुख्य गोष्टी अधोरेखित करतो.

१) जो पर्यंत आपण शारीरिक आणि मानसिक दृष्टया सक्षम आहात, तो पर्यंत वेगळे राहा व स्वातंत्र्य उपभोगा.

२) पैसा अडका – जागा आपल्या व पत्नीच्या नावावर ठेवा. प्रेमाखातर  किंवा इतर कारणांनी स्वत:ची संपत्ती मुलगा – मुलीच्या नावावर करू नका.

३) म्हातारपणी  आपली मुले आपला सांभाळ करतील, ह्या त्यांच्या बोलण्यावर १०० % विसंबून राहू नका.  तरुण पिढीचे अग्रक्रम चटकन बदलतात, ह्याचे भान ठेवा.

४) तरुण मंडळींशी मैत्रीचे संबंध जोडा, जेणेकरून तुमच्या कठीण काळात मदत मिळू शकेल.

५) तुलना  टाळा. स्वावलंबी राहा. शक्यतो  कोणाकडून अपेक्षा ठेवू नका म्हणजे अपेक्षाभंग होणार नाही.

६) मुलाबाळांनी मागितल्या शिवाय सल्ला देऊ नका. चांगल्या शब्दात योग्य तोच सल्ला द्या.

७) आपल्या वयाची ढाल पुढे करून आपली काळजी घेतली जावी असे मानसिक दबावतंत्र वापरू नका.

८) ऐकावे जनाचे पण करावे मनाचे,  हे कायम लक्षात ठेवा.

९) देवाकडे कोणीतीही  मागणी करू नका. मागितलेले सगळे देव देत नाही याचा प्रत्यय आजपर्यंतच्या आयुष्यात आलाच असेलच.

१०) कार्यरत राहा. छंद  जोपासा. तब्बेतीची काळजी घ्या. हलका व्यायाम करा. नियमितपणे फिरायला जा. खाण्याच्या वेळा सांभाळा. जिभेवर ताबा ठेवा म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहील.
—————————

लहान मुलांना  खेळाचे आकर्षण असते. पण मेहनत करायची त्यांची तयारी असतेच असे नाही. त्यांना झटपट यश हवे असते. असे झटपट यश कोणत्याही खेळात कधीच मिळत नाही. कितीही सराव केला तरी रोज परीक्षा द्यावी लागते. कोणत्याही खेळासाठीच्या मेहनतीपेक्षा अभ्यास करणे सोपे असते.

———————

गुरूंचे स्मरण

जन्म आपल्या हातात नसतो, पण जगायचे कसे हे नक्की आपल्या हातात असते. प्रत्येकाला ह्या जीवन प्रवासात दुसऱ्याची  साथ लागते – जन्मापासून ते मृत्यू पर्यंत. आपण मात्र उगाचच फुशारकी मारत असतो कि माझा मी मोठा झालो. मोठा होणे हि एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ती घडतच असते.

आयुष्यात मोठे होण्यासाठी आणि चांगला नागरिक बनण्यासाठी ज्या लोकांची साथ लागते त्याची जंत्री करणे खूप अवघड आहे, कारण आपल्या ह्या प्रवासात समाज आणि अनेक अनामिक सुद्धा असतात. त्यामुळे आपणही दुसऱ्याच्या जीवन प्रवासात आपले योगदान देतो का? हा प्रश्न वारंवार मनाला विचारला पाहिजे, म्हणजे आपले पाय नेहमी जमिनीवर राहतील.

आपल्या  जीवन प्रवासातील गुरूंचे स्मरण करता कि नाही? आपल्याला आयुष्यात ज्याच्या कडून शिकायला मिळते तो आपल्यासाठी शिक्षक किंवा गुरु असतो. आपले आयुष्य परिपूर्ण करण्यासाठी अनेक लोकांचे आशीर्वाद – मार्गदर्शन आपल्याला लाभते म्हणून आपला शेवटचा दिवस गोड होतो.

मग एकदा एकांतात बसा  आणि आठवा  कि आजपर्यंत कोणी कोणी तुम्हाला साथ दिली आणि तुम्ही कोणाला?

———————————————————–

रिमोट कंट्रोल

आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल स्वत:च्या हातात असेल तर मनाप्रमाणे आयुष्य जगता  येते. पण अश्या जगण्याचा कुटुंबियांना त्रास होणार नाही ह्याची काळजी घेणे गरजेचे असते.

————————————————————–

 

सुधीर वैद्य
२२-०७-२०१५

 

Advertisements

0 Responses to “४२५) स्पंदने आणि कवडसे – ११”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

July 2015
M T W T F S S
« May   Aug »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: