४२३) स्पंदने आणि कवडसे – ९

P1140123      385) Adjustment  - Tree

४२३) स्पंदने आणि कवडसे –

आपल्याला प्रत्येकजण “आपल्यासारखच ” का हवं असतं? आणि “दुसऱ्यासारख” तो झाला तर आपल्याला  नेहमी दुःख का होते ?

————-

मनात उमटलेले कोणतेही नाते चेहऱ्यावर दिसते, देहबोलीतून प्रगट होते आणि शब्दांनी समोरच्याच्या मनात घर करते.
————–

कितीही फुललेल्या सावत्र नात्याला कालांतरे किड लागतेच. सख्खे नाते खरेच सख्खे असते का ? सावत्र नाते सावत्रच असते का? सावत्र नात्याला सावत्रपणाचा शाप आहे बहुतेक . 😦
—————–

जशी आई संपूर्ण कुटुंबाला एकत्र ठेवते, तेच काम   Mother board करतो. त्यामुळे MOM हा शब्द उलटा  केला तर WOW होतो.

———————

अनेक वर्षे झाली संगणक वापरायला लागून, पण अजून संगणकात – laptop मध्ये Mother board च असतो. Father board  नाही. ह्यातूनच आईचे आपल्या आयुष्यातील महत्व अधोरेखित होत आहे. बघा विचार करुन.

———————–

बालपणीच्या खडतर परिस्थितीने त्याला मोलाचा घडा दिला होता कि पोटात  Gas झाला तरी चालेल पण डोक्यात Gas  जाऊ  देऊ  नकोस. त्याने  हा धडा चांगला गिरवला असल्यामुळे आजही तो तृप्त आहे.

————————–

प्रत्येकाच्या आयुष्यात एक खास दिवस असतो. त्या दिवसाची तो आतुरतेने वाट बघतो. जस जसा तो मोठा होतो, तेव्हा त्या दिवसाचे आकर्षण ओसरू लागते.  अनेक वर्षांनी परत एकदा तो दिवस माणसाला वेगळ्या अर्थाने दिलासा देत राहतो.

———————–

मातृदिन

आज जागतिक मातृदिन …. सर्वांना मातृदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा …. !!
Happy Mothers Day…!!

खरेतर आपल्या भारतीयांसाठी रोजच मातृदिन  असतो.  वर्षातून मे महिन्यातील दुसऱ्या  रविवारी जागतिक मातृदिन साजरा केला जातो म्हणून आपणही हा दिवस social media मध्ये साजरा करतो. पण आईचे उपकार असा एखादा दिवस साजरा करून फिटू  शकणार नाहीत ह्याची जाणीव मात्र बाळगणे गरजेचे आहे.

आईची अनेक रूपे असतात, काही आपल्याला कळतात तर काही कळत नाहीत.

———————

स्वातंत्र्य

तुम्ही मुलाला – मुलीला किती स्वातंत्र्य देता? त्यांना निर्णय प्रक्रियेत सामील करता का ? माणूस म्हणून घडण्यासाठी त्यांना पुरेशी space देता का ? त्यांचे चुकले तर न घाबरता सांगता का? म्हातारपणाची गुंतवणूक म्हणून त्यांच्या मताप्रमाणे वागता का? त्यांच्या हो ला हो,  ती गोष्ट पटत नसेल तरी  हो म्हणता का  ? एखाद्या संध्याकाळी शांतपणे डोळे मिटून बसा आणि ह्यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधा.

—————-

अपघात 

अपघात म्हणजे अपघात असतो, प्रत्येकाचा वेगळा असतो.
अपघात शरीराचा असतो, अपघात मनाचा असतो.
अपघाताच्या जखमा मनावर कोरल्या जातात, शरीरावरच्या लवकरच पुसल्या जातात.
अपघाताने माणसे जवळ येतात, नाहीतर दुरावतात.
एकाचा अपघात दुसऱ्याचा फायदा असतो, त्याला कोणाचाच इलाज नसतो.
अपघातातून शिकायचं असत, पण याच भान प्रत्येकाला नसत.
बरेच अपघात  चुकीने होतात, पण शिक्षा मात्र दुसरेच भोगतात.

————————

समस्या – वेदना

आयुष्यात आपल्याला अनेक समस्या – वेदना असतात. काही सांगता येतात तर काही अव्यक्त राहतात / सांगताही येत नाहीत. काही समस्या – वेदना आपण स्वत:च ओढवून घेतलेल्या असतात.

समस्या – वेदना तुम्हाला सोसायचे बळ  देते, पण आपल्याला ते कळत नाही. आयुष्यातील प्रत्येक घटना – सुख – दु:ख, वेदना आपल्याला काहीतरी शिकवून जातात. परंतु अनेक वेळा आपल्या डोळ्यावर अभिमानाच्या – अनेक विकारांच्या पट्ट्या बांधलेल्या असतात त्यामुळे ह्या शिक्षणाला आपण पारखे होतो. ह्या वेदना मलाच का ह्या प्रश्नाचे उत्तर शोधत राहतो. असे करण्याने समस्या – वेदना कमी तर होत नाहीतच, उलटपक्षी समस्या – वेदना सहन करण्याची ताकद कमी होते.

वेदनेचा – समस्येचा परिणाम प्रत्येक माणसावर वेगवेगळा होतो. काही माणसे खंबीर  दिसतात. पण समस्या आली कि त्यांची अवस्था शिजवलेल्या गाजरासारखी होते. (गाजरे कच्ची असताना कडक, पण शिजवल्यावर मऊ) काही माणसे  हळवी असतात, पण समस्या आल्यानंतर ताठ मानेने सामोरी जातात. मनाने अधिक घट्ट होतात (त्यांची अवस्था उकडलेल्या अंड्यासारखी होते. ) अंडे कच्चे असताना नाजूक असते पण  उकडले कि घट्ट होते. काही माणसे कॉफी पावडर सारखी विरघळून जातात. वेदनेची वेदना होतात.

वेदना -समस्या सोडविण्यासाठी काय करावे लागेल ह्याची जंत्री करा. ह्या यादीतील आपण काय करू शकतो ह्याचा विचार करून कार्यवाही करा. समस्या सुटली नाही तर maximum कोणते आणि काय परिणाम होतील ह्याचा विचार मांडा. त्याच बरोबर असे होण्याची शक्यता किती हे ठरवा. असे खरचे झाले तर आपला कसा निभाव लागणार ह्याचा विचार करा. ह्या पूर्वीच्या समस्येतून आपण कसे सहीसलामत सुटलात ते नजरे समोर आणा. देवावर विश्वास ठेवा. समस्येचे उत्तर समस्येतच दडलेले असते. अश्या रीतीने विचार करून वेदनेची वेदना होण्याचा प्रयत्न करा.

वेदनेच्या सावलीत मी मोठा झालो….
वेदनेचीच  मी वेदना झालो.

————————–

भूतकाळ

भूतकाळ वर्तमानात जगायला प्रेरणा देईल ह्याची खात्री नसते, त्यासाठी भविष्यातील ध्येयच लागते.

भूतकाळातील चुकांपासून शिकून, भविष्यातील ध्येय लक्षात घेऊन वर्तमानात जगावे लागते.

भूतकाळात रमणारा माणूस हा मनाने म्हातारा असतो का?

भूतकाळातील अपमान विसरून अपमान करणाऱ्या माणसाला माफ करावे म्हणजे  वर्तमानातील जगणे मन:शांतीचे होऊ शकते. असेल  कदाचित !! पण माफ करायला आपण काय संत आहोत? आपण  तर साधी माणसे. ह्या अपमानापासून आपण अवश्य धडा शिकला पाहिजे कि जे वागणे आपल्याला आवडत नाही, तसे आपण समोरच्या बरोबर वागायचे नाही.

हा अपमान तुम्हाला जगण्याची उर्मी देतो. ह्या अपमानाची रोज उजळणी करायची नाही पण त्याचवेळी तो अपमान विसरला पाहिजे म्हणून प्रयत्न सुद्धा करायचे नाहीत.

————-

Investment in Macro Terminology:

To lead a Happy life, we should not only invest in financial security but also in the following: Education, Health, Family, Good Friends, Positive Attitude.

—————-

प्रयत्न

प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे असे म्हणतात. प्रयत्नांती परमेश्वर असे आपण म्हणतो. कर्म करणाऱ्याच्या पाठी देवही उभा राहतो असा विश्वास आपण बाळगतो.

प्रयत्न करण्यावाचून गत्यंतर नसतेच. परंतु प्रत्येक वेळी अपेक्षित यश मिळतेच असे नाही कारण यश मिळण्यासाठी नशिबाची साथ लागतेच.काहीवेळा अपयश सुद्धा मिळते.

कारण प्रयत्न आणि यश यांची ज्याच्या मुळे भेट होते किवा होत नाही, ते नशीब असते.

मित्रानो, चांगले व आपल्या गुणधर्मानुसार ध्येय ठरवा, प्रयत्न करा, कर्माचा आनंद घ्या, कर्माचे फळ मिळणार हा विश्वास मनी बाळगा, देवावर विश्वास ठेवा आणि जादू अनुभवा. ह्या परिस्थितीत नशीब तुम्हाला नक्की साथ देते हा माझा अनुभव आणि निरीक्षण आहे.

वास्तवाचे  भान ह्या सुखवस्तू पिढीला कधी येणार?

————————-

निसर्ग 

मनाची कवडे उघडी ठेवून निसर्गाला भेट द्या, त्याच्याशी हितगुज करा. मग बघा मन कसे पिसासारखे  हलके होते. ताजेतवाने व्हा आणि आपल्या ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करा. शक्य असेल तर वरचे वर एक – दोन दिवस कामातून सवड काढा. तेही नाही जमले तर आपल्या परिसरातील निसर्ग शोधण्याचा प्रयत्न करा करा. . आपल्या शहरातून सुद्धा सूर्यास्त दिसतो. आपल्या परिसरात सुद्धा झाडे असतात, पानगळ होते, नवीन पालवी फुटते त्याचा आनंद घ्या.

————————————–

कसा मी असामी मी

मी कधीच स्वत:ला काही समजले नाही. समाज मला सांगत गेला कि तू कसा आहेस. मी ऐकल्यासारखे केले आणि विसरून गेलो, कारण मला माहित आहे कि मी नेमका कसा आहे आणि असा का आहे?

—————————————–

मनाला दिलासा 

जेव्हा आयुष्यात तुम्हाला ऑफिसात. घरी  Frustration येईल तेव्हा पोस्टात चक्कर मारा – तेथील कर्मचाऱ्यांकडे बघा आणि जादू अनुभवा. तुमचे frustration नक्की नाहीसे झाले असेल किंवा कमी झाले  असेल. 🙂

—————-

काम 

जितक्या लवकर काम म्हणजे केवळ कॉम्पुटर, laptop, mobile  नव्हे, हे लहान मुलाला कळेल तेव्हा त्याची माणूस म्हणून सर्वांगीण प्रगतीची वाटचाल सुरु होईल. पालक म्हणून हि जबाबदारी निभावली जाते का, हा खरा प्रश्न आहे. नाहीतर शक्यता अशी कि माझ्या मुलाला computer , mobile माहित आहे म्हणून किती कौतुक करू? असो .

सुधीर वैद्य
२२-०७-२०१५

Advertisements

0 Responses to “४२३) स्पंदने आणि कवडसे – ९”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

July 2015
M T W T F S S
« May   Aug »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: