४२२) डॉक्टर होण्याचे अपूर्ण राहिलेले माझे स्वप्न

422) Happy doctor's day                      422) images (1)

४२२) डॉक्टर होण्याचे अपूर्ण राहिलेले माझे स्वप्न

बालपणी आपल्या मनात काही स्वप्न  असतात. त्यातील काही खरी होतात, तर काही प्रत्यक्षात (काही कारणांनी) उतरत नाहीत. काही आपण वेगळ्या रीतीने सत्यात उतरवतो. अश्या नाजूक विषयावर  मी आज लिहिणार आहे.

माझे सर्वात मोठे स्वप्न म्हणजे मला मोठेपणी डॉक्टर व्हायचे होते. आता तुम्ही विचाराल कि मग  डॉक्टर झालात कि नाही? थांबा. मला डॉक्टर का व्हायचे होते हे प्रथम मी तुम्हाला सांगतो. ह्या स्वप्नाचे मूळ माझ्या बालपणात आहे.

माझे बालपण वडिलांच्या मृत्यूच्या छायेत गेले. मी ५-६ वर्षांचा होतो तेव्हा मला एक प्रखर वास्तव कळले की वडिलांचा सहवास आपल्याला फार काळ मिळणार नाही. वडील फार थोड्या वर्षांचे सोबती आहेत हे लहानपणी कळल्यानंतर  त्यांच्या मृत्युच्या छायेत मी मोठा झालो. मृत्युची भीती त्यांच्या डोळ्यात दिसत असे. मुलाबाळांची काळजी सुद्धा डोकावत असे. बाल वयातच मी मोठा झालो. गंभीर झालो. माझे वडिलांवर खूप प्रेम होते. मी जास्तीत जास्त वेळ त्यांच्या सहवासात घालवू लागलो. पुढे वडिलांची तब्बेत बिघडत गेली. 

३५ वर्षाहून अधिककाळ ते मधुमेहाने आजारी होते. तरी त्यांनी संसार रेटला. आम्हाला शिक्षण दिले. मी १८ वर्षांचा असताना ते वारले. त्याच्या मृत्युच्या भीतीने मी रोजच मरत होतो. मी पोरका झालो. आई आणि मोठे भाऊ होते पण माझे जीवाभावाचे वडील मात्र नव्हते.  ह्या परिस्थितीमुळे  मला त्यांची सेवा करायची संधी मिळाली.

मला मधुमेहाची वैद्यकीय माहिती लहानपणी कळली. वडिलांना रोज इन्सुलिनचे injection घ्यावे लागे. मी साधारण ८  वर्षांचा असल्यापासून त्यांना पुढील १०  वर्षे रोज injection देत असे. वडिलांच्या जेवणापूर्वी म्हणजे सकाळी ८.३० वाजता मी injection देत असे. त्यामुळे सकाळी चहा पिऊन झाला की injection ची syringe आणि सुई गरम पाण्यात शुद्ध करून ठेवावी  लागे. त्याकाळी disposable syringe मिळत नसत. सुई फारतर एक आठवडा चालत असे. त्यामुळे वेळच्यावेळी इन्सुलिन, syringe , सुई, स्पिरीट, कापूस  ह्याचा पुरेसा साठा ठेवावा लागे. दोन औषधे योग्य प्रमाणात syringe मध्ये बाटलीतून घ्यावी लागत. हे कठीण कामही मी लीलया करत असे.

तसेच वडिलांना रक्तदाबाच्या गोळ्या वेळच्यावेळी द्याव्या लागत. दर महिन्याला मी त्यांच्या बरोबर डॉकडे  जात असे. माझे भाऊ ह्या वैद्यकीय सेवेपासून दोन हात लांबच असत. रोज दंडावर injection घेतल्यामुळे त्यांच्या दंड सुजत असे. त्यामुळे संध्याकाळी iodex चोळणे, पाय चेपणे, कोठे कापले तर ड्रेसिंग करणे, ओषधे विकत आणणे वगैरे तत्सम कामे असत.

आता तुम्हाला कळले असेल की मला का डॉक्टर व्हायचे होते? परंतु कौटुंबिक परिस्थिती मुळे डॉक्टर व्हायचे स्वप्न मनातच राहून गेले. माझ्याकडे जरी पुरेशी बुद्धीमत्ता होती, तरी ह्या स्वप्नासाठी लागणारा पैसा आणि आधार माझ्याकडे नव्हता. मी परिस्थिती स्वीकारली. SSC  नंतर Commerce  ची निवड केली. माझे पहिले ध्येय B. Com  होणे. Jr  B . Com ला असतना वडील वारले. खरेतर मी इंटर Commerce ची परीक्षा बुडवणार होतो कारण वडील खूप आजारी होते. परीक्षेच्या काही दिवस आधी त्यांना हॉस्पिटल मध्ये भरती केले होते. पण परीक्षेच्या १-२ दिवस आधी ते घरी आले. त्याच मन:स्थितीत मी परीक्षा दिली. त्यानंतर मी मागे वळून बघितले  नाही आणि Commerce  शाखेतील अतिशय उच्च शिक्षण पूर्ण केले. (B.Com., F.C.A., A.C.S., D. M. A., D. F. M., D. O. R. M., D.E.M.) CA परीक्षेत मला All India Merit List मध्ये स्थान होते. इतर परीक्षेत University त मी पहिला – दुसऱ्या क्रमांकाने यश मिळविले.

पण माझे स्वप्न मी विसरलो नव्हतो. १९९७ साली एका प्रतिथयश डॉक्टर कडे Alternate Medicines (such as Acupressure, Magnet Therapy, Naturopathy, Homeopathy, Vitamin therapy, Dr. Bach Flower Remedy, interpretation of pathology reports) चे शिक्षण घेतले. त्यानंतर वैद्यकीय विषयाची अनेक पुस्तके वाचली, वैद्यकीय पुस्तके विकत घेतली, ह्या विषयावर लिखाण संकलित केले, डॉ मित्रांचे मार्गदर्शन घेतले. मग माझ्या शिक्षणाचा उपयोग कुटुंबासाठी, मित्र परिवारासाठी, सोसायटीतील लोकांसाठी करू लागलो. 

 
आठवड्यातून एक दिवस जेष्ठ नागरिक BP तपासायला येतात. Pathological reports बद्दल मी मार्गदर्शन करतो, काही उपाय सुचवतो. त्यांच्या मन :स्वास्थ्याची  काळजी घेतो, त्यांचे  वैयक्तिक प्रश्न सोडवायला मदत करतो, त्यांच्याशी फोनवर संपर्कात राहतो, कधी घरी चांगली नाटके, सिनेमा बघायला बोलावतो वगैरे. हे काम  १९९८ -१९९९ पासून विनामूल्य करत आहे. डॉक्टरची  Tuition फी आणि पुस्तके मिळून सहज २५००० रुपये खर्च झाले असतील.

पण माझे डॉक्टर होण्याचे स्वप्न मी काही प्रमाणात – वेगळ्या प्रकारे पूर्ण केले त्याचा मला आनंद – अभिमान आहे.

Happy Doctor’s day 01-07-2015

जगातील सर्व डॉक्टरना वैद्यांच्या सुधीरचा मनापासून नमस्कार. आपण सर्वजण मानवजातीची मनोभावे सेवा करत आहात म्हणून आम्ही निश्चिंत आहोत.

सुधीर वैद्य
०१-०७-२०१५
Advertisements

0 Responses to “४२२) डॉक्टर होण्याचे अपूर्ण राहिलेले माझे स्वप्न”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

July 2015
M T W T F S S
« May   Aug »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: