४२१) Smart – स्मार्ट

317) Question Mark
४२१) Smart – स्मार्ट

काही शब्दांची काही काळ चलती असते. सध्याचा परवलीचा शब्द आहे ‘ स्मार्ट ‘ (smart )

हा शब्द कधीपासून नेमका प्रसिद्ध झाला माहित नाही. स्मार्ट फोन, स्मार्ट  मुलगा , स्मार्ट शाळा , स्मार्ट college , स्मार्ट  कंपनी, स्मार्ट  बॉस, स्मार्ट  सुनबाई , स्मार्ट  सासू , …… हि यादी कितीही लांबेल. सध्या स्मार्ट  घर, ते बांधणारा स्मार्ट  बिल्डर. हि गाडी सध्या स्मार्ट  सिटी पर्यंत पोचली आहे.

पण आज तर कहर झाला. सकाळी फिरून येताना प्रदर्शनाचा फलक वाचला. प्रदर्शन शाळेची  पुस्तके, वह्या , छत्र्या वगैरे वस्तूंचे होते. फलकावर लिहिले होते कि स्मार्ट  विचार करा आणि प्रदर्शनाला भेट द्या.

माझी कल्पना होती कि माणूस जेव्हा विचार करतो , तो सर्व परिस्थितीचा विचार करूनच. तर हा विचार स्मार्टच  असतो. ह्या व्यतिरिक्त स्मार्ट विचार वेगळा असतो का?

मी साधा फोन वापरतो. अनेक लोक मला विचारतात कि काका तुम्ही स्मार्ट  फोन विकत का घेत नाही ? माझे उत्तर असते कि मी स्वत: स्मार्ट  फोन पेक्षा स्मार्ट  असल्यामुळे, मला त्याच गरज वाटत नाही . असेही दोन स्मार्ट लोकांचे जमत नाही , हाच नियम वस्तूलाही लागू पडतो.

अशी हि smart शब्दाची कहाणी. स्मार्ट ला पर्यायी  शब्द ‘ चलाख ‘ आहे ना? पण चलाख शब्दाला जरा  वेगळा वास येतोका? कारण फार  कमी वेळेला  हा शब्द वापरला जातो.

सुधीर वैद्य
२९-०६-२०१५
Advertisements

0 Responses to “४२१) Smart – स्मार्ट”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

July 2015
M T W T F S S
« May   Aug »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: