४१२) गोष्ट माझ्या डोळ्यांची, गोष्ट माझ्या मित्रांची:

412) P1010132     412) Photo3980
४१२) गोष्ट माझ्या डोळ्यांची, गोष्ट माझ्या मित्रांची:
लेखाचे शीर्षक जरा  बुचकळ्यात पाडणारे आहे ना ? हि गोष्ट खरेतर माझ्या जन्मापासून सुरु झाली  असणार, परंतु काही वर्षांनी मी १० वर्षांचा असताना हि गोष्ट उघडकीस आली. (१९६१ साली ) त्यावेळी मी ५ वीत शिकत होतो. त्याकाळी चष्मा वापरावा लागणे म्हणजे समाजात मान खाली घालावी लागे. मुख्य चिंता लग्न कसे होणार? मुलगी असेल तर आयुष्य बरबाद अशी पालकांची धारणा होई. चष्म्याची दुकाने सुद्धा शोधावी लागत. काळ किती बदलला आहे, आता खूप प्रमाणात  आपल्याला लहान मुले सुद्धा चष्मा लावलेली दिसतात.
५ वीत high school मध्ये प्रवेश घेतल्यानंतर माझ्या कमी उंचीमुळे मला पहिल्या बाकावर जागा मिळाली. माझ्या बाजूला माझ्याच उंचीचा एक मुलगा होता. त्याचे नाव नाव होते ठाणेकर. त्याला – ३ नंबरचा चष्मा होता. पहिल्या बाकावर बसून सुद्धा मला फळ्यावरील अक्षर स्पष्ठ दिसत नसे. ठाणेकरच्या वहीत बघून मी लिहित असे. मधल्या सुटीत मी त्याचा चष्मा  ५ मिनिटांसाठी लावत असे व दिसणे म्हणजे नक्की काय हे अनुभवत असे.
शाळेत दरवर्षी medical टेस्ट होत असे. मी नजर तपासण्यासाठी वापरात येणारा तक्ता पाठ केला होता. आजही तो मराठीतील तक्ता मला पाठ आहे. मी अनेक वेळा आईला सांगितले कि मला चष्मा  वापरावा लागेल, तू दादांना हि गोष्ट सांग. आई हो म्हणायची, पण दादांना हि गोष्ट सांगण्याचा तिला धीर होत नव्हता. घरात कोणालाच चष्मा  नव्हता. घराण्यात चष्म्याचा मीच पहिला बळी होतो. शेवटी एकदा मीच धीर करून दादांना त्यांचा मूड बघून हि गोष्ठ सांगितली. थोडावेळ ते काहीच बोलले नाहीत. गंभीर झाले. आता माझे कसे होणार आणि खर्च उपटला अश्या कात्रीत ते सापडले होते.
मग एक दिवस दादा मला धर्मादाय हॉस्पिटल मध्ये डोळ्याचा नंबर काढण्यासाठी घेऊन गेले. नंबर खूप जास्त निघाला. (- ३) हॉस्पिटलच्या धर्मादाय दुकानातून अत्यंत कमी पैशात चष्मा करून घेतला. हा चष्मा  काही मला आवडला नाही. फ्रेम खूप साधी होती. पण त्या दिवसापासून मला चांगले दिसायला लागले.
परंतु माझा चष्म्याचा नंबर दरवर्षी वाढत गेला. ९ त असताना दादा मला आमच्या भागातील प्रसिद्ध डॉ सरदेसाई यांच्याकडे घेऊन गेले. त्यावेळी माझा नंबर झाला होता -१०. शाळेत पहिल्या ३ त नंबर मिळवणारा मी कमजोर डोळ्यांमुळे हतबल झालो होतो.
डॉ म्हणाले कि तू हुशार आहेस, पण तुझे डोळे कमजोर आहेत. तू जास्त डोळ्यांना ताण  देऊ नकोस. जास्त शिकू नकोस नाहीतर एक दिवस तू नजर गमावशील. इतके प्रखर वास्तव ऐकून मी वेडापिसा झालो. मी डॉना  विचारले कि जास्तीत जास्त किती नंबरचा चष्मा बनवता येतो. ते म्हणाले कि – २० पर्यंत चष्मा बनवता येतो. मला खूप आनंद झाला, कारण मला शिक्षण चालू ठेवता येणार होते. खूप शिकायचे होते. मोठेपणी आंधळा झालो, तर बसून खाता येईल एव्हडे पैसे मिळवायचे होते.
पण कालांतराने माझा डोळ्यांचा नंबर स्थिर झाला. मग मी मागे वळून बघितले नाही. CA ची परीक्षा पास झाल्यानंतर नंतर मी डोळे तपासून घेतले. नंबर -११ झाला होता. त्यानंतर उच्च शिक्षण चालूच होते. Management Accountant म्हणून MNC त  नोकरी करताना, CS, DMA, DFM, DORM, DEM  असे बरेच शिक्षण पार पाडले. Accounting profession असल्यामुळे डोळ्यांवर खूप ताण येत असे. १० वर्षे उच्च पदावर नोकरी केल्यानंतर CA Profession ला वाहून घेतले. १९९७ साली संगणक घेतला. ( P  -१ / २ GB Hard Disk / २५६ MB RAM आणि किंमत रु . ५१०००/-  ) संगणक घेतल्यानंतर डोळ्यावर अत्याचार अजून वाढले.
नोकरी लागल्यानंतर contact lens वापरण्याचा प्रयत्न केला. पण नंबर जास्त असल्यामुळे contact lens वापरण्याचा confidence वाटला नाही.  त्यावेळच्या contact lens ह्या हार्ड असत. त्या डोळ्याला लावणे म्हणजे खूप प्रयत्न करावे लागत. एक दिवस डोळ्याला थोडे खरचटले. मग मी contact lens चा नाद सोडून दिला.
वयाच्या ५६ व्या वर्षी डाव्या डोळ्यात काळे ठिपके (फ्लोटर) दिसू लागले. त्यावर उपाय नाही असे डॉ नी  सांगितले. जास्त नंबर असल्यामुळे डोळा सुखतो व त्यामुळे हा त्रास सुरु होतो व  ह्याची तुम्हाला सवय करावी लागेल. हि सवय होईपर्यंत वयाच्या ६० व्या वर्षी उजव्या डोळ्यात हाच त्रास सुरु झाला. अर्थात त्याच वर्षी मी CA  Profession मधून निवृत्ती घेतली.
२००७ पासून दर वर्षी एप्रिल महिन्यात मी डोळे, Retina, नंबर तपासून घेतो. अजून डोळे शाबूत आहेत. Retina वर कोणाही परिणाम झाला नाहीये. नंबर सुद्धा थोडा कमी झाला आहे. मोतीबिंदू – काचबिंदू होण्याची सध्या तरी लक्षणे दिसत नाहीत.
आजही मी डोळ्यांवर पूर्वी सारखेच अत्याचार करत असतो. (वाचन, संगणकावर लिखाण वगैरे ) TV  मात्र बातम्या सोडून फारसा बघत नाही.
परंतु लहानपणापासून मी डोळ्यांची खूप काळजी घेत आहे. नियमितपणे डोळ्यांचा व्यायाम, डोळ्यावर गुलाब पाण्याच्या घड्या ठेवणे, डोळे न चोळणे वगैरे. आजही हे सर्व उपचार चालू असतात.
अशी हि गोष्ट माझ्या डोळ्यांची, गोष्ट माझ्या जिवलग मित्रांची.
गेली ५४ वर्षे साथ देणाऱ्या माझ्या जिवलग मित्रांचे  (चष्मे ) मनापासून आभार.
{ पहिला चष्मा — नेहमी वापरण्याचा / दुसरा चष्मा —- संगणकावर काम करण्यासाठी / तिसरा चष्मा —– वाचनासाठी }
चष्म्यामुळे मी कमजोर डोळ्यांवर विजय मिळविला, पण बालपणातील अनुभवाने मला आयुष्याकडे बघण्याची Vision  शिकवली.
सुधीर वैद्य
२१-०५-२०१५
Advertisements

0 Responses to “४१२) गोष्ट माझ्या डोळ्यांची, गोष्ट माझ्या मित्रांची:”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

July 2015
M T W T F S S
« May   Aug »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: