४१०) स्पंदने आणि कवडसे – भाग ८

289) Spandane & Kavadase
४१०) स्पंदने आणि कवडसे – भाग ८
 
वाटा :
अनेक वाटांवरून आपला आयुष्याचा प्रवास सुरु असतो. काही वाटांवर फुले मिळतात, सावली मिळते. तर काही वाटांवर काटे असतात किंवा काट्यातून वाट काढावी लागते. आपल्या वाटेवर नक्की काय मिळेल  हे आपल्या पूर्व सुकृतावर – नशिबावर अवलंबून असते. वाट कोणतीही असो, ती स्वीकारणे आणि त्यावर मात  करून पुढे जाणे  हे जास्त महत्वाचे.
——————————–
आयुष्यात समस्या नसणे हि सुद्धा काही वेळा समस्या असते.  समस्या माणसाला जगायची – धडपड करण्याची प्रेरणा देते. बघा विचार करून .
पेनाने लिहिणे विसरले तरी चालेल पण बोटांना  विसरू नका म्हणजे झाले. 🙂

लेखन  करताना शब्दांचा फुलोरा जमला नाही तर स्वत:ची आणि लेखनाची शोभा होते. नवोदित लेखक म्हणून केलेले निरीक्षण.

आयुष्य साजरे करा – आयुष्य सादर करू नका :

अनेक वेळा अनेक जण स्वत:चे आयुष्य दुसऱ्याच्या डोळ्यात बघून व्यतीत करतात. कोणताही निर्णय घेण्याआधी दुसऱ्याच्या  नजरेत आपले  वागणे बरोबर ठरेल का?  ह्या विचाराचा पगडा मनावर असतो.

मित्रानो, असे वारंवार होत असेल तर   हे वागणे बरोबर नाही. जरी जग हा एका अर्थाने रंगमंच असला तरी आपले आयुष्य सादर  करू नका तर आपले आयुष्य साजरे करा.

आपल्या मनाचा कौल घ्या, सर्वकष विचार करा, फायद्या -तोट्याचे गणित मांडा, आपला निर्णय समाजाच्या – कायद्याच्या विरुद्ध नाही ह्याची खात्री करा आणि सरळ निर्णय घेऊन  मोकळा श्वास घ्या. एकदा हि जादू अनुभवाच.

——————————————————————————–

आपल्या आयुष्यातील पाच H :

आपल्या आयुष्यात House, Home, Hostel, Hotel and Hospital ह्या पाच H चे जवळचे संबंध असतात. आपला संपूर्ण प्रवास ह्या पाच H  च्या काठाने  होतो असे म्हटले तर ते वावगे होणार नाही.

ह्या सर्व H मध्ये एक गोष्ट समान आहे. (चार भिंती आणि छप्पर ) जर House  मध्ये राहणाऱ्या लोकांचे प्रेमाचे – जिव्हाळ्याचे – मनाचे संबंध असतील तर ते House चे  Home  होते. ह्या Home मध्ये Hostel ची शिस्त, Hotel  चा मोकळेपणा आणि Hospital मधील कार्य मग्नता – शिस्त पाळली गेली तर ह्या Home  मधील सर्वांचे आयुष्य सुखा  -समाधानात जाईल ह्यात शंका नाही.

ह्या विषयावरील माझा लेख वाचण्यासाठी लिंक देत आहे. http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/92_Five_Hrs_in_our_Life.pdf

——————————————————————————–

नवरा – बायकोतील वादविवाद आणि उपाय:

नवरा बायकोत वादविवाद – कुरबुर होतेच. काही वेळा भांडणसुद्धा होते. पण हे वादविवाद लवकर निवळत  नसतील, तर नातेसंबंध  तणावाचे आहेत हे नक्की.

ह्याच वेळी आपण लग्न का केले?, आपण  स्वातंत्र्य का गमावले? आपण लग्न करायची घाई केली का ? ह्यातून सुटका नाही का ? असे प्रश्न मनात पिंगा घालू लागले तर मात्र मामला गंभीर आहे ह्यात शंकाच नाही.

वैवाहिक जीवनातील तणावाचा मुकाबला करण्यासाठी एक सोपा उपाय अमलात आणा. हे बिघडलेले संबंध म्हणजे गढूळ पाणी आहे. गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी आपण त्यात तुरटीचा खडा तीन-चार वेळा फिरवतो आणि काही तासानंतर पाणी स्वच्छ झालेले असते. गाळ तळाशी बसलेला असतो. मग आपण भांड्यातील वरचे पाणी दुसऱ्या  भांड्यात ओतून घेतो.

नवरा – बायकोनी काही दिवस – काही आठवडे एकमेकांपासून वेगळे राहिले पाहिजे व आपल्याला जोडीदाराची किती वेळा आठवण येते? किती वेळा आपले जोडीदारावाचून नडते ह्याचा मागोवा घेतला पाहिजे. वेगळे राहणे शक्य नसेल तर घरातच मौनव्रत पाळा.

त्यानंतर आपले मनच पुढील निर्णय घेईल. बघा प्रयत्न करून. एक समुपदेशक म्हणून मी हा सल्ला  देत आहे . सासू – सून भांडणात मौनव्रताचा सल्ला चांगला लागू पडतो.
——————————————————————————–
ज्या माणसाला Values ची Value कळते , त्याचे पाय नेहमी जमिनीवर राहतात आणि तो आयुष्यात सुखी होतो असा माझा अनुभव आणि निरीक्षण आहे.

आजचा दिवस आपल्या सर्वाना सुखाचा आणि समाधानाचा जावो हि ईश्वर  चरणी प्रार्थना.
——————————————————————–
सावत्र
सावत्र शब्दाला आणि सावत्र नात्याला, सावत्रपणा का भोगावा लागतो?
सख्याचे नाते नेहमी प्रेमाचेच असते का ?
सावत्र नाते नेहमी सावत्रपणाचेच असते का?

प्रश्न — प्रश्न — प्रश्न ? ? ?

——————————————————————–


प्रयत्न – नशीब आणि यश – अपयश

प्रयत्ने वाळूचे रगडीता तेलही गळे असे म्हणतात. प्रयत्नांती परमेश्वर असे आपण म्हणतो. कर्म करणाऱ्याच्या पाठी देवही उभा राहतो असा विश्वास आपण बाळगतो.
प्रयत्न करण्यावाचून गत्यंतर नसतेच. परंतु प्रत्येक वेळी अपेक्षित यश मिळतेच असे नाही कारण यश मिळण्यासाठी नशिबाची साथ लागतेच.काहीवेळा अपयश सुद्धा मिळते.

कारण प्रयत्न आणि यश यांची ज्याच्या मुळे भेट होते किवा होत नाही, ते नशीब.

मित्रानो, चांगले व आपल्या गुणधर्मा नुसार ध्येय ठरवा, प्रयत्न करा , कर्माचा आनंद घ्या, देवावर विश्वास ठेवा आणि जादू अनुभवा. ह्या परिस्थितीत नशीब तुम्हाला नक्की साथ देते हा माझा अनुभव आणि निरीक्षण आहे.

आजचा आणि पुढील प्रत्येक दिवस सुख समाधानाचा ध्येय पुरतीच जावो  हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
——————————————————————————–

त्याने खुप वाचन केलं पण तो वाचला नाही. ह्याचे कारण कदाचित त्याच्या बालपणातील कटू आठवणीना / बालपणातील कठीण परिस्थितीत शोधावे लागेल. ह्या कटू अनुभवांनी त्याला माणसांची भीती वाटत असेल. कारण  माणूस हा असा प्राणी आहे कि जो विचार करतो एक , बोलतो दुसरेच  आणि करतो तिसरेच. त्यामुळे त्याने पुस्तकाला  आयुष्यात स्थान दिले असेल, कारण संवादाशिवाय जगणे  कठीण काम आहे. त्याला ह्या मानसिकतेतून काढायला  समाज कमी पडला असेच म्हणावे लागेल.

————————————————————–
Transactional Analysis नुसार आपण जस जसे  मोठे होतो, तसे आपले मार्ग आपण शोधू लागतो. त्या वाटेवर आपले  लहानपणाचे दिवस – अनुभव – बालवयात मनात ठसलेले मोठ्यांचे वागणे, त्यानंतर ह्यात शिक्षणाने झालेला बदल आणि सर्वात शेवटी आपल्या पालकांचे वागणे, अश्या मिश्रणातून माणूस आपल्या आयुष्यात वाटचाल करतो.
प्रत्येक सुखाबरोबर दु:ख येते. त्यामुळे लहानपणापासूनच मी हा मार्ग आखला आणि आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर माझ्यासाठी हा मार्ग बरोबर निघाला, एव्हडाच माझ्या प्रतिक्रियेचा अर्थ.
——————————————————————————-

जहा पे बसेरा हो , सवेरा वही है.
———————————————————————

आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा एखादी समस्या तुम्हाला भेडसावते, तेव्हा बरेच वेळा त्या समस्येचे कारण तरुणपणी तुम्ही वेळेवर न घेतलेला निर्णय किंवा सर्व बाजूने विचार न करता  घेतलेला चुकीचा निर्णय  कारणीभूत असतो, असे समुपदेशक म्हणून माझे  निरीक्षण आहे. बघा विचार करून.
——————————————————————————–
जहा पे सवेरा  हो , बसेरा वही है.
——————————————————————————–

सुधीर वैद्य

१८-०५-२०१५
Advertisements

0 Responses to “४१०) स्पंदने आणि कवडसे – भाग ८”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

July 2015
M T W T F S S
« May   Aug »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: