४०९) डोंगरमाथा

409) 100_1454   409) 100_1456
४०९) डोंगरमाथा 
थंडीचे दिवस होते. नुकताच ऑक्टोबरचा उन्हाळा सरून वातावरणात गारवा येत होता. दिवस लहान लहान होत होता.
आज सकाळपासून त्याला अस्वस्थ वाटत होते. त्याला डोंगर माथ्यावर जाण्याचे वेध लागले होते. खूप जवळच्या मित्राचे निधन झाल्यानंतर तो डोंगर माथ्याकडे फिरकला नव्हता. फिरण्यासाठी डोंगर माथा आणि तळे हि त्यांची आवडती ठिकाणे होती. एक दोनदा तो तळ्याकडे जाऊन मित्राच्या सहवासातील क्षणांची उजळणी करून आला. पण डोंगर माथ्यावर मात्र जाणे त्याने टाळले होते.
मनात विचारांची गर्दी झाली होती. अश्या मानसिक अवस्थेत संध्याकाळी घाई घाईने तो घरातून बाहेर पडला. जाताना कोठे जातोय हे सांगण्याची सवय सुद्धा मोडली गेली होती. जाताना  ‘येतो’ म्हणणारा तो ‘जातो’  असे म्हणाला. घरातून बायको ओरडली कि आज हे काय भलतेच? कोठे जाताय आणि कधी परत येणारात? पण उत्तर देण्यास तो होताच कुठे तिथे?
मंद वारा वाहत होता. झाडे – वेली  वाऱ्याबरोबर पक्षांच्या संगीताच्या साथीने नाचत होत्या. आकाशात पौर्णिमेच्या चंद्राने हजेरी लावली होती, पण सूर्य  अजून मावळला नसल्यामुळे त्याचे अस्तिव जाणवत नव्हते. विचारांच्या तंद्रीत तो कधी डोंगर माथ्यावर पोचला हे त्याला कळलेच नाही. डोंगराच्या उतारावर नेहमीच्या जागी तो बसला आणि त्याला प्रकर्षाने मित्राची आठवण आली. डोळे अश्रुने डबडबले. थोड्याच वेळात आठवणींचा आवेग ओसरला आणि तो मानसिक अस्वास्थ्याचे विश्लेषण करू लागला.
आज तो एकटा पडला आहे ह्याची त्याला प्रकर्षाने जाणीव झाली. तसे तोड देखले अनेक जवळचे नातेवाईक होते. पण त्या गर्दीतही तो मात्र एकटा  होता. लहानपणापासूनच ह्या एकटेपणाचा  भरपूर अनुभव त्याच्याकडे होता. तरुण वयात त्याला एकटेपणाचा कधीच त्रास झाला नाही. खडतर बालपणामुळे त्याने लग्न  न करण्याचे  ठरविले होते. परंतु एका गाफील क्षणी तो ह्या निर्णयावर ठाम राहू शकला नाही. आयुष्यात  रखरखीत सकाळ आणि टळटळीत दुपारीनंतर प्रथमच आलेला तो मोहाचा क्षण तो टाळू शकला नाही.
परंतु दुपार थोडी गारव्यात गेल्यानंतर, आलेली संध्याकाळ मात्र दाहक स्वरूप घेत होती. एक कारण प्रकर्षाने जाणवले. बालपणातील परिस्थितीमुळे  व वडिलांचा सहवास पुरेसा न मिळाल्यामुळे त्याने आयुष्याकडे नेहमी गंभीरतेच्या चष्म्यातून बघितले होते. शिस्तबद्ध आयुष्य, वेळेचे नियोजन, प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम, स्वधर्म, सेवा भाव ह्या वाटेवरून त्याने स्वत:चा यांत्रिक मानव केला होता. प्रत्येक वेळा बुद्धीने विचार करणे जवळच्या मंडळीना खटकत होते. नेहमी दुसऱ्याचा  विचार करून त्याच्या भल्यासाठी  ‘श्रेयस्कर ‘ बोलणे अनेकांना  ऐकायला आवडत नव्हते.
त्याचे ‘PRO ACTIVE’ वागणे अनेकांना कोड्यात टाकत असे. पण एखाद्या गोष्टीची दुसरी बाजू विचारात न घेतल्यामुळे  भविष्यातील त्रास  त्याला  दिसत असे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण त्याच्या डोक्यात आकार घेत असे व हे जवळच्या व्यक्तीला सांगणे हे आपले कर्तव्य आहे अशी त्याची ठाम धारणा होती. परंतु हे अव्यक्त पण उपयुक्त प्रेम फार कमी लोकांना कळत असे.
व्यवसायात सुद्धा हा अनुभव अनेक वेळा त्याला आला. Client  सल्ला न मानण्याची चूक, आर्थिक फटका बसल्यानंतर कबूलही करत.  तोच प्रकार नात्यात दिलेल्या श्रेयस्कर सल्ल्याची. त्याची विचार प्रणाली कालांतराने खरी ठरत असे पण हि पश्चात बुद्धी होती. तो विजयी होऊन सुद्धा पराजित होता. कदाचित हेच त्याचे दु:ख होते.
‘प्रिय’ सल्ला तो देऊ शकत नव्हता कारण प्रिय सल्ला दिल्यानंतर व नुकसान झाल्यानंतर त्याच्या शिक्षणाचा पराजय तो सोसू शकत नव्हता. कात्रीत पकडल्या सारखी त्याची अवस्था झाली होती व हेच त्याच्या एकटेपणाचे प्रमुख कारण होते.
अंधाराची चादर पसरून सूर्य अस्ताला गेला होता. चंद्राचा शीतल प्रकाश जाणवायला लागला. तेव्हड्यात त्याच्या पायाखालचा दगड निसटला आणि आवाज करत दरीत पडला. आपणही असेच घसरलो तर, असा विचार त्याच्या मनात चमकून गेला आणि तो हादरला. आयुष्यात त्याने कधीच पळ  काढला नव्हता. जन्म आपल्या हातात नाही, पण जगणे आपल्या हातात आहे ह्या गोष्टीवर त्याचा पूर्ण विश्वास होता. भानावर येतो तोच पायाजवळून एक मोठे जनावर (साप) सळसळत गेले.
तो गडबडीने उठला व काठी आपटत घराकडे निघाला. अजून एक दिवस संपला होता. किती दिवस बाकी असतील ह्याचे  गणिते करत तो भर भर घरी परतला. अंगणात बायको जप करीत त्याची वाट बघत होती असे त्याला उगाचच वाटले.
(काल्पनिक कथा )
 
सुधीर वैद्य
१८-०५-२०१५

Time Permitting, Follow me on …..

https://spandane.wordpress.com/
www.spandane.com

Advertisements

0 Responses to “४०९) डोंगरमाथा”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

July 2015
M T W T F S S
« May   Aug »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: