१२९) एका पुनर्जन्माची कथा / लेखक डॉ. मनोज भाटवडेकर

129) Photo4089

१२९) एका पुनर्जन्माची कथा / लेखक डॉ. मनोज भाटवडेकर / राजेंद्र प्रकाशन / पहिली आवृत्ती २५-०४-२०१३/ पृष्ठे १४२ / रुपये १५० / – 

लेखकाचा परिचय:
 
शिक्षण M D, D P M. मानसोपचार expert / अंधेरी येथे कार्यरत /
१९८६ साली MD  परीक्षेत सुवर्ण कमळ / मनोविकार विषयक भरपूर लेखन / संगीतकार, कवी आणि गायक (पं  यशवंत देव ह्यांचे शिष्य), ओशो ध्यान प्रणालीचे अभ्यासक व प्रशिक्षक.
पुस्तकाबद्दल:
 
पुस्तकाचे शीर्षक थोडे बुचकळ्यात टाकते. मनात पुनर्जन्म असतो का वगैरे प्रश्न फेर धरू लागतात. परंतु पुस्तक वाचायला सुरवात केल्यानंतर आपल्या प्रश्नांचे निराकरण होते.
हे पुस्तक म्हणजे डॉ  नी  एका असाध्य रोगाशी केलेल्या लढ्याचे शब्दांकन आहे. एका अर्थी तो त्याचा पुनर्जन्मच होता. त्यांच्यातला ‘मी’ (आजारपणातून बरे होईपर्यंत ) आता ‘तो’ झाला होता. त्यामुळे हि कहाणी सांगताना डॉ  सुरवातीला स्वत:चा उल्लेख ‘तो’ म्हणून करतात.
डॉ ना  तरुणपणी – उमेदीच्या काळात RA ( Rheumatoid  Arthritis ) हा आजार होतो. आमवात  आजार असाध्य आहेच, पण खूप वेदनामय आहे. वेदना सहन करणे खूप कठीण होते. जास्त प्रमाणात Medicine  घेता येत नाही. शरीराच्या इतर महत्वाच्या अवयवावर (Kidney , Liver ) वर परिणाम झाला आहे का? हे सातत्याने बघावे लागते.
आजाराचे वर्णन अंगावर  शहारे  आणते. त्यांच्या शब्दात एव्हडी ताकद आहे कि आपण डॉ च्या वेदनेशी एकरूप होतो. कसे सोसले असेल डॉ नी, हा विचार मन पोखरत राहतो.
वेदनेचा शेवट जर सुखमय असेल किंवा वेदना किती काळ सोसावी लागेल हे माहित असेल, तर अशी वेदना माणूस स्वीकारतो आणि  सहन सुद्धा करतो. परंतु ज्या वेदनेला वैद्यकीय भाषेत शेवट नाही, अशी वेदना भोगणे कठीण असते. ह्या लढ्यामध्ये डॉ  ना  त्यांच्या  डॉ पत्नीची साथ मिळते.
वेदना सहन करत असताना सुद्धा  डॉ  आपले कर्तव्य विसरत नाहीत. शरीरातील सर्व सांधे भयानक दुखत असताना सुद्धा ते आपला व्यवसाय सुरु ठेवतात.
ह्या वेदनामय प्रवासाच्या एका वळणावर पं  यशवंत देव यांच्या बरोबर ते ओशोच्या ध्यान शिबिरात जातात आणि त्यांचे आयुष्य बदलून जाते. ध्यान प्रक्रियेत ते स्वत:ला झोकून देतात आणि त्यांची वेदना कमी होत आहे असे त्यांना जाणवते. ध्यान आणि शरीर ह्यांचा  वैद्यकीय परिभाषेत सांगड घालयचा प्रयत्न करतात. ओशोंच्या ध्यान साधनेचा ते अभ्यास करतात व आपल्या रोगावर विजय मिळवतात. आजारातून बरे झाल्यानंतर १० वर्षांनी त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
मित्रानो, हे पुस्तक वाचनीय आहे. ह्या आजाराची  खूप माहिती मिळते व तसेच ध्यान साधनेचे महत्व व ध्यानक्रिया ह्याबद्दल कुतूहल निर्माण होते. ध्यानक्रियेची माहिती http://www.osho.com वर उपलब्ध आहे.

सुधीर वैद्य

१७-०६-२०१५
Advertisements

0 Responses to “१२९) एका पुनर्जन्माची कथा / लेखक डॉ. मनोज भाटवडेकर”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

July 2015
M T W T F S S
« May   Aug »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: