४०८) अपचन

289) Spandane & Kavadase
४०८) अपचन

पार्टी रंगात आली होती. त्याला कारणही खूप महत्वाचे होते. कंपनीचा प्रोजेक्ट यशस्वीपणे नियोजित वेळेआधी पूर्णत्वास गेला होता. त्यातून मिळणाऱ्या उत्पादनाचा दर्जा सुद्धा चांगला होता. उद्या सुटीच होती त्यामुळे सर्व जण  आनंदात हास्य विनोद करत होते. एकमेकांचे अभिनंदन करत होते. वेळ कसा जात होता ह्याचे भान कोणालाच नव्हते.  आपण काय आणि किती खातोय आणि किती पितोय ह्याची मोजदाद नव्हती.

पार्टी  संपली. तो घरी परतला आणि झोपी गेला. रात्री झोपताना brush करण्याचा नियमही विसरला. पहाटे त्याची झोप चाळवली. पोट दुखत होते. पोटात gas झाला होता. बायकोने न सांगता लिंबू सोडा आणला. सोडा पिऊन परत तो लोळू लागला. झोप येत असूनही डोळ्यांनी असहकार पुकारला होता.
कारण त्याचे मन बालपणात शिरले होते. तेव्हासुद्धा त्याच्या पोटात असेच दुखत होते. त्यावेळी तो दुसरीत शिकत होता. काकूने श्रावण महिना असल्यामुळे पुरणाचे कडबू केले होते. त्याने खूप कडबू हादडले होते . काकू त्याची व इतर भावांची देखभाल करायला राहिली होती. वडील खूप आजारी असल्यामुळे त्यांना उपचारांसाठी खूप लांबच्या हॉस्पिटल मध्ये भरती  केले होते. निदान २-३ महिने तेथे राहणे गरजेचे होते. आई त्यांच्या बरोबरच होती.
परिस्थिती गंभीरच होती. सण  म्हणून काकूने हा घाट  घातला होता. काकूने गरम पाणी पिण्यास दिले त्यामुळे थोडे बरे वाटले. त्यानंतर काही वेळा कडबू खाण्याची वेळ आली पण ती चव नव्हती. ती परिस्थिती सुद्धा  नव्हती, कदाचित हे कारण असेल. !!!
त्यानंतर जेव्हा जेव्हा त्याला अपचन होत असे किंवा पोटात gas धरत असे, तेव्हा त्याला  हा बालपणीचा प्रसंग नक्की आठवत असे. बालपणीच्या खडतर परिस्थितीने त्याला मोलाचा घडा दिला होता कि पोटात gas  झाला तरी चालेल पण डोक्यात gas  जाऊ  देऊ  नकोस. त्याने  हा धडा चांगला गिरवला असल्यामुळे आजही तो तृप्त आहे.
मित्रानो, हे प्रसंग असतात लहान पण त्याचा impact  मात्र आयुष्यभर मनावर सोडतात.  ……(काल्पनिक)

सुधीर वैद्य
१४-०५-२०१५
Advertisements

0 Responses to “४०८) अपचन”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

May 2015
M T W T F S S
« Jan   Jul »
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: