१२७) गंगाजल / लेखिका इरावती कर्वे

127) Gangajal - Photo3964
१२७) गंगाजल / लेखिका इरावती कर्वे / प्रकाशक देशमुख आणि कंपनी प्रा लि. / प्रथम आवृत्ती १९७६ / चौथी आवृत्ती २००९ / रुपये १२०/- पृष्ठे १५७ / 
ललित –  निबंध /

हे निबंध १९६० ते १९७० साली लिहिलेले आहेत. हे पुस्तक लेखिकेच्या मृत्यूनंतर एक वर्षांनी प्रकाशित झाले  आहे.
ललित लेखांचा एक किनारा हा वैचारिक  असतो तर दुसरा किनारा हा कथा – कादंबरीच्या स्वरुपात असतो. कथेचा आभास निर्माण करीत अनेक विषयांवर केलेले हे वैचारिक लेखन आहे.

पुस्तकाला  प्रा. नरहर कुरुंदकर ह्यांनी प्रस्तावना दिली आहे . लेखिकेच्या जीवाभावाच्या मैत्रिणीने डॉ  सुलोचना देशमुख ह्यांनी चार शब्द लेखिकेबद्दल लिहिले आहेत. ह्या पुस्तकाचे नाव त्यांनी ठेविले आहे. लेखिका अनेक विषयांवर मैत्रिणीजवळ चर्चा करीत. त्यामुळे डॉ  सुलोचना देशमुख ह्यांनी ह्या लेखांच्या  मागची परिस्थिती उलगडली आहे. अर्थात हे प्रकरण आणि प्रस्तावना पुस्तकाच्या शेवटी छापली आहे. जर आपण हे प्रथम वाचले तर पुस्तकातील विषयाचे गांभीर्य – आवाका – आणि लेखिकेच्या मनातील स्पंदने समजणे  सोपे जाईल. असो.
पुस्तक मन लावून वाचावे लागेल. लेख जरी लहान असले तरी त्यातील आशय हा वैश्विक आहे. प्रत्येकाला हे पुस्तक आवडेल असे नाही. पण हे चाकोरी बाहेरील विचार कदाचित आपल्यालाही एखाद्या विषयावर खोल विचार करण्यास प्रवृत्त करतील. !!!

सुधीर वैद्य

१३-०५-२०१५
Advertisements

0 Responses to “१२७) गंगाजल / लेखिका इरावती कर्वे”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

May 2015
M T W T F S S
« Jan   Jul »
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: