४०३) मुलांची काळजी …लवकरच

403) bicycle-boy-young-learning-to-ride-bike-training-wheels-park-34708717                 403) bicycle-boy-young-learning-to-ride-bike-training-wheels-park-34708717 (1)
403) learning-to-ride-bike-father-son-bicycle-beach-having-fun-together-34708659             403) learning-to-ride-bike-father-son-bicycle-beach-having-fun-together-34708697
४०३) मुलांची काळजी 
काही दिवसांपूर्वी संध्याकाळी गावाबाहेरील तळ्यावर फिरायला गेलो होतो. मी मित्राबरोबर नेहमी तळ्यावर फिरायला  येत असे. मित्राची साथ सुटली आणि माझे तळ्यावर येणे कमी झाले. संध्याकाळ झपाट्याने अंगावर येत  होती. रवि आपले कार्य आटोपून निघण्याच्या तयारीत होता. गार वारा सुटला होता. पक्षी आपल्या घरट्यात परतण्यासाठी आतुर झाले होते. तळयाशेजारील मैदानात काही मुले सायकल चालवत होती ,

काही मुलांचे पालक त्यांना सायकल शिकवीत होते. सायकलवर  कसे बसायचे, सायकलचे handle कसे धरायचे, तोल कसा सावरायचा वगैरे . मी कधी सायकल शिकलो नाही आणि वडिलांच्या आजारपणामुळे ते मला सायकल शिकवू शकले नाहीत. असो. पण त्यांच्याकडून मी जे शिकलो, ती शिदोरी मला आजपर्यंत पुरली  आहे.

सुरवातीला सायकल घट्ट धरून त्याच्या मागे धावणारे बाबा, हळू हळू सायकलची पकड सैल करतात. मुलगा घाबरतो आणि बाबांना हात सोडू नका असे बजावतो. बाबा हो म्हणतात, पण मुलाचे ऐकत मात्र नाहीत. काही वेळाने ते हात सोडतात आणि सायकल मागे धावायचे थांबतात. मुलगा काही वेळाने मागे बघतो आणि बाबांना सायकल चालविता आल्याबद्दल handle वरील एक हात सोडून अभिवादन करतो. हात सोडल्याबद्दल बाबा ओरडतात. अशी हि सायकल शिकवणीची कहाणी. पण हा लेखाचा विषय नाही.

अशीच काळजी बाबा आणि आई आपल्या जन्मापासून घेत असतात. आपले पालन पोषण करतात. चांगले शिक्षण मिळेल ह्यासाठी झटतात. चांगला  नागरिक बनविण्यासाठी संस्कार करतात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला  चांगली नोकरी मिळण्यासाठी कासावीस होतात. आपण संसारात स्थिरावल्यानंतर त्यांचे चित्त ठिकाणावर येते. परंतु ह्या सर्व प्रवासात काही वेळा ते मुला-बाळांच्या आयुष्यात जास्त दखल अंदाजी करतात. काही वेळा मुलांना हे अडचणीचे वाटते. मुलांच्या निर्णय क्षमतेवर परिणाम होतो. त्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच होतो. कोणी बगावत करतो, तर कोणी दबून राहतो व नको त्या वेळी गैरसमज करून  घेतो. हा धक्का पचविणे पालकांना कठीण असते.

सायकल शिकवण्याची पद्धत बाबा प्रत्यक्ष व्यवहारात का वापरत नाहीत, हे मला तरी न सुटलेले कोडे आहे? कारण मी मुलाला – मुलीला स्वातंत्र्य दिले, व्यवहार शिकवला, अभ्यास हि त्यांची जबाबदारी आहे हे सांगितले, वेळेचे व्यवस्थापन  शिकविले, माणसांची पारख कशी करावी हे सांगितले, त्यांचे निर्णय त्यांना घेण्यास शिकविले व बरोबर असल्यास त्याला संमती दिली. ह्यामुळेच मोठे  झाल्यानंतर आयुष्यातील मोठे निर्णय त्यांनी लीलया घेतले. त्याबद्दल मला त्यांचा अभिमान वाटतो.

तुम्ही मुलाला – मुलीला किती स्वातंत्र्य देता? त्यांना निर्णय प्रक्रियेत सामील करता का ? माणूस म्हणून घडण्यासाठी त्यांना पुरेशी space देत का ? चुकले तर न घाबरता सांगता का? म्हातारपणाची गुंतवणूक म्हणून त्यांच्या मताप्रमाणे वागता का? त्यांच्या हो ला हो  ती गोष्ट पटत नसेल तरी  हो म्हणता का  ? एखाद्या संध्याकाळी शांतपणे डोळे मिटून बसा आणि ह्यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधा.
सुधीर वैद्य
२९-०४-२०१५
Advertisements

0 Responses to “४०३) मुलांची काळजी …लवकरच”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

May 2015
M T W T F S S
« Jan   Jul »
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: