४०० ) माझा लेखन प्रवास — चिंतन

299) P1090352
४०० ) माझा लेखन प्रवास — चिंतन 
मी काही हाडाचा लेखक नाही. त्यामुळे लेखन प्रवास असे जरी लेखाचे शीर्षक असले तरी घाबरून जाऊ नका. मराठीशी माझा संबंध फक्त SSC पर्यंत होता. त्यानंतर प्रथम & द्वितीय वाणिज्य शाखेत मराठीच्या दोन कादंबऱ्या अभ्यासाला होत्या. त्यानंतर उच्च शिक्षणामुळे मराठी लेखनाचा संबंध तुटला. मराठी वाचन करायला हि फारसा वेळ मिळत नसे.  शाळेत असताना मी मराठी निबंध चांगले लिहित असे. सर माझा निबंध वर्गात नेहमी वाचून दाखवीत. उगाच अंगावर  मुठभर मास चढल्यासारखे वाटे. आमच्या शाळेत प्रत्येक वर्ग एक मराठी मासिक (हस्तलिखित) स्वरुपात प्रसिद्ध करत असे. ह्या कामात माझा पुढाकार असे. माझे अक्षर चांगले – वळणदार असल्यामुळे मासिकाचे हस्तलिखित करण्याची जबाबदारी मी आणि माझ्या दोन मित्रांवर असे. (आमची शाळा फक्त मुलांची होती. ) बरीच वर्षे आमच्या वर्गाला बक्षीस मिळत असे. असो.

कालांतराने उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर(CA ) मोठ्या कंपनीत नोकरी (१९७५) करू लागलो. तेव्हाही मराठीसाठी वेळ काढू शकलो नाही कारण नोकरी बरोबर उच्च शिक्षण (CS, DMA, DFM, DORM, DEM. ) चालू होते. त्यानंतर १९८१ साली Indo – Japanese प्रोजेक्ट मध्ये Financial Controller म्हणून रुजू झालो. हि नोकरी प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर सोडायची असे सुरवातीला ठरवून टाकले होते. ह्या नोकरीत सर्व पत्रांवर मी मराठीत सही करू लागलो. त्यानंतर १९८३ साली प्रोजेक्ट पूर्ण झाला आणि मी नोकरी सोडली.

त्यानंतर मी परत एकदा दुसऱ्या  कंपनीत Financial Controller  & कंपनी सेक्रेटरी म्हणून रुजू झालो. ह्या कंपनीत हि मी पत्रांवर मराठीत सही करू लागलो. हि नोकरी स्वीकारताना मनाशी ठरवले कि फक्त दोन वर्षे नोकरी करायची आणि त्यानंतर CA Profession स्वीकारायचे. १९८५ ला मी हि नोकरी सोडली आणि CA Practice सुरु केली.

पुढे व्यवसायात अनेक प्रकारच्या Assignments (Audit, Management consultant, Insurance surveyor, Faculty member, Paper setter, Examiner etc.) पार पाडून ठरविल्याप्रमाणे १५  मे २०११ रोजी व्यवसायातून निवृत्ती स्वीकारली.

त्याआधी काही वर्षे मी Professional काम कमी करत होतो आणि वाचलेला वेळ Astrology आणि Alternate  Medicine  ह्या विषयांचा अभ्यास करू लागलो. परत एकदा मराठीशी संबंध आला. मराठीत Notes काढू लागलो.

त्याच वेळी २००७ पासून मराठी लिखाणाची उर्मी आली व मी लिहू लागलो. त्याच काळात माझ्या Audit विषयातील पुस्तके लिहू लागलो (इंग्लिशमध्ये) मग संकेत स्थळाची निर्मिती करावी असा विचार आला आणि २००८ साली ह्या विचाराची अंमलबजावणी झाली.  त्यानंतर दर ३ महिन्यांनी नवीन लेख संकेतस्थळावर अपलोड करू लागलो. पुस्तके आणि लेख लिहिण्याचे जणू वेडच लागले. कालांतराने ब्लॉगची निर्मिती केली.

मला लहानपणातील गोष्ट आठवली . माझ्या वडिलांनी SSC झाल्यानंतर त्यांच्या ज्योतिष मित्राला माझी पत्रिका दाखविली होती. त्याने सांगितले कि मी Commerce चे शिक्षण घ्यावे. मी मोठेपणी लिखाण करीन असेही ते म्हणाले होते. मी असेच समजत होतो कि माझे Audit Reports, Insurance Survey Reports म्हणजेच माझे लिखाण. पण माझ्या हातून खरेच लिखाण झाले.

१५  मे २०११ ला  निवृत झाल्यानंतर लिखाणाला थोडा वेग आला. नवीन विषय सुचत गेले. फेसबुक वरील कविता वाचून मी सुद्धा कविता करू लागलो. पुस्तक परीक्षण लिहू लागलो.

आज हे सर्व तुम्हाला सांगण्याचे कारण कि आज   मी ४०० वा  लेख आज अपलोड केला आहे. गेल्या ७ वर्षात मी २० हून अधिक विविध विषयांवरील पुस्तके, ४०० लेख, १२५ पुस्तक परीक्षणे, माझ्या फोटोवरील लेखमाला आणि ६६ कविता केल्या ह्यावर माझाच विश्वास बसत नाहीये. हे सर्व मी केवळ माझ्या वाचकांच्या प्रोत्साहनामुळे करू शकलो.

माझ्या संकेत स्थळाला आजपर्यंत १५ लाखाहून अधिक hits मिळाल्या आहेत. तसेच ६० हून अधिक देशातील १८५००० हून अधिक लोकांनी संकेत स्थळाला भेट दिली आहे. ह्या लिखाणामुळे मला फेसबुकवर अनेक माझ्याहून चांगले लिहिणारे मित्र मिळाले, हे मी माझे भाग्य  समजतो. वेळोवेळी त्यांनी माझ्या लिखाणावर प्रतिक्रिया दिल्या, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. Linked in वरील काही मित्रांनी माझे writing skill endorse केले आहे .

वयाच्या ६० व्या वर्षी ४०० पानांचे आत्मचरित्र (इंग्लिश ) माझ्या नातवंडांसाठी लिहून ठेवले नातवंडे जेव्हा मोठी होतील तेव्हा त्यांना मराठीची कितपत गोडी असेल हा विचार करून हे आत्मचरित्र इंग्लिश मध्ये लिहिले. 🙂

असा हा माझा लेखन प्रवास. तुम्हाला कसा वाटला हे वाचायला मी अधीर आहे.

वाचकांचे प्रेम असेच राहावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना.


सुधीर वैद्य
०८-०४-२०१५
Advertisements

0 Responses to “४०० ) माझा लेखन प्रवास — चिंतन”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

May 2015
M T W T F S S
« Jan   Jul »
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: