३९९) भूतकाळ – वर्तमान – भविष्य

३९९) भूतकाळ – वर्तमान – भविष्य

भूतकाळ वर्तमानात जगायला प्रेरणा देईल ह्याची खात्री नसते, त्यासाठी भविष्यातील ध्येयच लागते.

भूतकाळातील चुकांपासून शिकून, भविष्यातील ध्येय लक्षात घेऊन वर्तमानात जगावे लागते.

भूतकाळात रमणारा माणूस हा मनाने म्हातारा असतो.

मित्रानो हि सर्व वाक्ये मीच लिहिली आहेत. माझ्या लेखात तुम्ही हि वाक्ये वाचली असतील.

असे हि म्हटले जाते कि भूतकाळातील अपमान विसरून अपमान करणाऱ्या माणसाला माफ करावे म्हणजे  वर्तमानातील जगणे मन:शांतीचे होऊ शकते. असेल  कदाचित !! पण माफ करायला आपण काय संत आहोत? आपण  तर साधी माणसे. ह्या अपमानापासून आपण अवश्य धडा शिकला पाहिजे कि जे वागणे आपल्याला आवडत नाही, तसे आपण समोरच्या बरोबर वागायचे नाही.

हा अपमान तुम्हाला जगण्याची उर्मी देतो. ह्या अपमानाची रोज उजळणी करायची नाही पण त्याचवेळी तो अपमान विसरला पाहिजे म्हणून प्रयत्न सुद्धा करायचे नाहीत.

ह्या अपमान  करण्याच्या प्रोसेसला मी Negative  Inspiration असे नाव दिले आहे. परंतु ह्यातील धोका असा असतो कि अपमान करताना त्याची सीमारेषा ओलांडली जाते आणि फायदा होण्यापेक्षा त्या माणसाचा तोटा होतो.  अपमान सहन झाला नाहीतर त्या मणसाला Depression येऊ शकते. पण योग्य प्रमाणातील अपमान किंवा निर्भयपणे दाखवून दिलेल्या चुका माणसाला – मुलाला सुधारण्याची संधी देतो. ह्या method चा वापर मी आयुष्यात खूप प्रमाणात केला.

परंतु मित्रानो, माझ्यावर जे अपमानाचे प्रसंग आले ते ह्या प्रोसेसला अनुसरून नव्हते. ह्यामुळे  मी कदाचित depression मध्ये गेलो असतो ह्याची  जाणीव त्या मंडळीना नव्हती. पण मी पेटून उठलो, त्या माणसांपेक्षा जास्त शिकलो, प्रामाणिकपणा जपला, माणसे जोडली, अनेक विषयात यशस्वी मुसाफिरी केली. हे सर्व ती हुशार मंडळी करू शकली असती. पण ability असणे आणि त्यानुसार प्रगती करणे ह्यासाठी प्रयत्न – जिद्द घरावी लागते. त्यामुळे माझ्या आत्मचरित्रात मी ह्या माणसांचे आभारच मानले आहेत.

म्हणूनच माझा असा ठाम विश्वास आहे कि भूतकाळातील अपमान तुम्हाला जगण्याची उर्मी देतो. मी हे सिद्ध केले आहे.

मित्रानो विचार करा आणि ठरवा तुमचा मार्ग.

सुधीर वैद्य
०५-०४-२०१५
Advertisements

0 Responses to “३९९) भूतकाळ – वर्तमान – भविष्य”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

May 2015
M T W T F S S
« Jan   Jul »
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: