३९६) Privacy – भाग १ & २

३९६) Privacy – भाग १ & २

मित्रानो, Privacy – भाग १  हा लेख ०३-०९-२०१२ राजी फेसबुक वर अपलोड केला होता . काही मित्रांच्या प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत. आज ह्या लेखाचा भाग २ लिहावा लागत आहे. प्रथम भाग एक वाचा.

—————————————-
Privacy – भाग १

काही दिवसापूर्वी एका मित्राच्या घरी गेलो होतो. मनसोक्त गप्पा झाल्या. चहा – फराळ झाला. मी निघायच्या वेळेला मित्राचा नातू आला. माझ्याशी बोलला. शाळेतल्या गमती – जमती सांगितल्या. मग मी अच्छा करून निघालो. एवढ्यात त्या नातवाने मला विचारले की आजोबा, तुम्ही माझी खोली बघितली का? मी म्हणालो नाही कारण त्या खोलीच्या दारावर एक नोटीस चिकटवली होती, म्हणून मी आत गेलो नाही. नातू म्हणाला अहो आजोबा, तुम्ही तर घरचेच आहात. ती नोटीस बाहेरच्या लोकांसाठी आहे. मग त्याने मला कौतुकाने खोलीत नेले आणि त्याची खोली, अभ्यासाचे टेबल, कपाट वगैरे दाखविले.

मित्रानो, नोटीस वाचा. माझा मित्र म्हणाला की Mall मध्ये खरेदीला वडिलांबरोबर गेला होता, तेव्हा नातवाने हा wall paper विकत घेतला व आपल्या खोलीच्या दारावर लावला. खरेतर नातू खूप प्रेमळ आहे. wall paper वरील मजकूर त्याच्यासाठी गौण होता. काय सांगावे पुढे मागे त्याचा मुलगा ह्या wall paper प्रमाणे वागायचा?

सुधीर वैद्य
०३-०९-२०१२

——————————————————————

ह्या लेखावरील काही प्रतिक्रिया:

त्या लहान मुलाने जे काही चुकीचे केले आहे त्यात त्याची चूक समजूतदार पणे दाखवून देणे हे त्याच्या घरातल्या मोठ्यांचे हे कर्तव्य आहे …आताच जर त्या गोष्टीला त्यांनी महत्व दिले किंवा दुर्लक्ष केले तर पुढे त्या मुलाचा स्वभाव कसा होईल कोणास ठाऊक ??? लहान पनापासूनच काय बरोबर आहे काय चुकीचे आहे हे मुलांना पटवून दिले पाहिजे …..असे माझे मत आहे …मग प्रसंगी थोडे कठोर व्हावे लागले तरी चालेल …
——————————————————————————

हेच वय असत मुलांचे जेव्हा त्यांच्यावर योग्य संस्कारांचे आणि मार्गदर्शनाचे सिंचन करण्याची आवश्यकता असते.. काय योग्य आणि काय अयोग्य हे त्यांच्या मनात पटवून देणे हे पालकांचे कर्तव्य असते … जेव्हा त्याने माय रूम … हे पोस्टर घेतले तेव्हाच … त्या मुलाची संकुचित विचारांचे दर्शन झाले, त्या ऐवजी अवर स्वीट हाउस हे सुद्धा पोस्टर मिळाले असते… लहानपणीच जर मुलाला माझे माझे हा अहंकार मनात रुजला तर … मोठेपणी मुलाने आपल्याला सांभाळावे किव्वा त्याचा आधार मिळेल हि अपेक्षा पालकांनी तेव्हाच विसरून जावी कारण स्वार्थीपणाचे बीज मुलांमध्ये लहानपणीच रुजत आहे.. हे पालकांनी लक्षात घ्यावे ..
————————————————————————————————————–

Privacy भाग दोन :

गेल्या आठवड्यात माझ्या मित्राची सून घरी आली होती . बोलता  बोलता  सहज म्हणाली कि काका काल  काय झाले माहित आहे ? माझ्या मोठ्या मुलाने (मुलगा ७ वीत शिकत आहे) आम्ही बाहेर गेलो असताना तिसऱ्या  बेडरूमचा  ताबा घेतला. मुलाने  सांगितले कि आजपर्यंत मी धाकट्या भावाबरोबर बेडरूम share  करत होतो, पण आजपासून मला स्वतंत्र बेडरूम पाहिजे. स्टीलचे कपाट सोडून त्याने सर्व पुस्तके, school bag, laptop, खेळणी शिफ्ट केली होती.

मी सहज म्हटले  कि पूर्वी दारावर पोस्टर लावले होते त्याच मुलाने बेडरूम पटकावली ना ? सुनेने हसल्या सारखे केले. तिला माझी प्रतिक्रिया माहित होती. पोस्टर लावल्यानंतर मी तिच्याशी चर्चा केली होती. तिला काही मुलाचे हे वागणे फार खटकत नव्हते, उलट हे सांगण्यात अभिमान डोकावत होता. धन्य तो मुलगा आणि त्यांचे अति सुखवस्तू पालक.

आज शाळेतील भावांचे (वयातील अंतर ३ वर्षे ) पटत नसेल तर समाजात एकोपा – बंधूभाव कसा नांदेल ? आजपर्यंत हि बेडरूम पाहुण्यांसाठी राखीव होती. आता आजी आजोबा आले तर ह्या मुलाची प्रतिक्रिया काय असेल ? अजून २-३ वर्षे सांगितल्यावर तो बेडरूम पाहुण्यांसाठी काही दिवस सोडेल पण college त गेल्यानंतर काय? मला उगाच ओरश्न पडत राहिले.

आज अनेक लोक लहान घरात राहतात. तिथेच मुले अभ्यास करतात. उच्च शिक्षण घेतात. नोकरी लागल्यानंतर आपले घरटे बांधतात. ह्या प्रकरणात दोन मुले एक बेडरूम share करत होती. दोघांसाठी स्वतंत्र कपाटे, अभ्यासासाठी डेस्क , laptop , AC,  double बेड, असा सर्व जामानिमा आहे. पण स्वतंत्र व्हायची किती घाई? मोठे झाल्यानंतर ह्यांची मानसिकता काय असेल ? प्रश्न — प्रश्न आणि प्रश्न. वास्तवाचे  भान ह्या सुखवस्तू पिढीला कधी येणार?
मित्रानो, तुमच्या काय प्रतिक्रिया? नक्की कळवा.
सुधीर वैद्य
१०-०३-२०१५
Advertisements

0 Responses to “३९६) Privacy – भाग १ & २”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

May 2015
M T W T F S S
« Jan   Jul »
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: