३९५) निसर्ग आणि आयुष्य – चिंतन

३९५) निसर्ग आणि आयुष्य – चिंतन

निसर्ग म्हणजे निसर्ग असतो…

तुमचा आमचा सेमच असतो. 🙂

माणूस निसर्गात शहर वसवतो,

तेथील रहिवाशांची आणि निसर्गाची लावून  वाट.

शहरात  मात्र निसर्ग शोधावा लागतो, बाल्कनीतील तुळस आणि
काही फुलझाडांच्या एक -दोन कुंड्यांत. 😦

निसर्ग आपला मित्र आहे. आपल्या आयुष्याच्या वाटचालीत निसर्गाचा खूप मोठा वाटा  आहे. निसर्ग आपल्या आजूबाजूला सुद्धा असतो पण त्याकडे आपण दुर्लक्षच करतो. वर्षातून एकदा सुटी  घेऊन निसर्गरम्य ठिकाणी जातो पण तेथे जाऊन आपले शौक पुरे करतो. 😦

आपल्या अत्याचाराला कंटाळून निसर्ग आपल्यावर सूड उगवतो. मग आपण आपल्या सुपीक डोक्याने निसर्गावर आणखी अत्याचार करतो.

मनाची कवडे उघडी ठेवून निसर्गाला भेट द्या, त्याच्याशी हितगुज करा. मग बघा मन कसे पिसासारखे  हलके होते. ताजेतवाने व्हा आणि आपल्या ध्येय पूर्तीसाठी प्रयत्न करा. शक्य असेल तर वरचे वर एक – दोन दिवस कामातून सवड काढा. तेही नाही जमले तर आपल्या परिसरातील निसर्ग शोधण्याचा प्रयत्न करा करा. . आपल्या शहरातून सुद्धा सूर्यास्त दिसतो. आपल्या परिसरात सुद्धा झाडे असतात, पानगळ होते, नवीन पालवी फुटते त्याचा आनंद घ्या.

निसर्ग डोळ्यात साठवा, कॅमेऱ्यात बंदिस्त करा. डोळ्यातील निसर्ग मनात रुजवा म्हणजे तो आपल्या चेहऱ्यावर पसरेल आणि आपल्या सर्व ताण  – समस्येवर शीतल छाया धरेल. बघा  प्रयत्न करून.

माझ्या आयुष्यातील समस्या – ताण  -तणाव मी निसर्गाच्या साथीने सोडवले.  सूर्यास्त बघणे हा माझा खूप जुना छंद आहे.

नुकताच  कॅमेऱ्यात बंदिस्त केलेला  निसर्ग तुमच्यासाठी आणला आहे. फोटो बघून तुम्हाला असे वाटेल कि ह्या फोटोंमध्ये काय वेगळेपण आहे? हे तर सामान्य फोटो दिसतात. हे फोटो share करण्याचे प्रयोजन काय? मित्रानो, तुमचे प्रश्न बरोबरच आहेत. हे फोटो खरेच सामान्य आहेत.

काही दिवसापूर्वी निसर्गाच्या सहवासात ४ दिवस घालवले. ह्यावेळी असे ठरवले कि ज्या फोटोत आयुष्याचे प्रतिबिंब दिसेल असेच फोटो काढायचे. प्रत्येक फोटोचे आणि आयुष्याचे एक अदृश्य नाते ह्यावर आपण विचार केलात तर, हेच फोटो तुम्हाला वेगळे वाटू लागतील ह्याची खात्री मी देतो. मन एकाग्र करून फोटोची मजा घ्या, पण आपला  अभिप्राय द्यायला विसरू नका.


सुधीर वैद्य
२६-०२-२०१५
Advertisements

0 Responses to “३९५) निसर्ग आणि आयुष्य – चिंतन”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

May 2015
M T W T F S S
« Jan   Jul »
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: