३९३) मी आणि पोस्ट ऑफिस – चिंतन

393) Post Office- 1       393) Post Office - 2
३९३) मी आणि पोस्ट  ऑफिस – चिंतन 

माझे आणि पोस्टाचे खूप जुने संबंध आहेत. माझ्या आयुष्याच्या वाटचालीत आणि यशात पोस्ट  ऑफिसचा खूप  मोठा वाट आहे. अर्थात  ह्या काळात हे वाचायला थोडे विचित्र वाटेल, पण हे खरे आहे. हा कालखंड  म्हणजे माझ्या बालपणापासून (१९५१) ते जवळ जवळ २००० पर्यंतचा. पूर्वी पोस्टाला पर्याय नव्हता. त्यानंतर courier सेवा सुरु झाली आणि आता तर हि courier सेवा आहे म्हणून नाहीतर आपले काही खरे नव्हते. आज जरी virtual communication चा जमाना असला तरी, प्रिंटेड पत्रव्यवहार हा काही वेळा अपरिहार्य असतो.

साधारण ७ वर्षांचा असताना (१९५८) माझे वडील (दादा) आजारी पडले. ते  तळेगावच्या हॉस्पिटल मध्ये उपचार घेत होते. आई त्यांच्याबरोबरच होती. आम्ही सर्व भावंडे काही काळ पुण्याला काकांकडे होतो. त्यांनतर आमची मोठी काकू आम्हाला सोबत करायला आमच्या घरी आली. त्याच वर्षी मी प्रथमच शाळेत जायला लागलो होतो. मला एकदम दुसरीत प्रवेश दिला गेला. पहिलीचा  अभ्यास मी शाळेत न जाता घरीच केला होता.

शाळा सुरु झाली तेव्हा मला शाळेत सोडायला आजच्यासारखे आई – बाबा माझ्या बरोबर नव्हते. अश्या वेळी वडिलांचे हॉस्पिटल मधून पत्र आले कि सर्व प्रथम मी वाचत असे. त्यांची खुशाली वाचून मन आनंदित होई, डोळ्यात अश्रू  कधी जमा होत हे कळत नसे. पोस्टमन मला  देवदूतासारखा वाटे. त्याकाळी टपालाचे वितरण दिवसातून ३ वेळा होत असे. हळू हळू टपाल वितरणाचे प्रमाण दिवसातून  १ वेळा आणि सध्या तर आठवड्यातून १ वेळा असे झाले आहे. मी पोस्टमन काकांची वाट बघत असे व दादांचे पत्र आहे का अशी विचारणा करत असे. रोज कसे पत्र येणार हे माहित असूनही हा वेडेपणा मी करत असे.

त्याकाळी काही दुख:द घटना झाली तर तार  येत असे. अश्या एक दोन तारा मी घरी कोणी नसताना स्वीकारल्यासुद्धा आहेत.

पोस्ट  ऑफिसबरोबरच्या ओळखीचा हा श्रीगणेशा होता. पुढे हि ओळख बाळसे धरू  लागली.

SSC चा result (१९६७) मला result  घोषित होण्यापूर्वीच माझ्या चुलत भावाने inland letter ने कळविला होता.

मोठे झाल्यानंतर पोस्टात गुंतवणुकीसाठी बराच घरोबा वाढला. परंतु ह्या वर्षी थोड्या नाराजीने पोस्ट  ऑफिस  MIS मधून पैसे  परत घ्यावे लागले कारण ECS द्वारा मिळणाऱ्या व्याजाची सोय अचानक बंद करण्यात आली.

B.Com झाल्यानंतर मी CA चा अभ्यासक्रम सुरु केला. त्यामुळे पोस्ट ऑफिस  बरोबर संपर्क वाढतच गेला. एक प्रसंग माझ्या चांगलाच लक्षात आहे. Inter CA चा अभ्यासक्रम (Home  Study ) मी पूर्ण केला होता, त्याचे प्रमाणपत्र, परीक्षेचा अर्ज पाठविण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आले नाही. त्यामुळे मी सकाळी जाऊन परीक्षेचा अर्ज ICAI च्या Delhi ऑफिसला Regd AD ने पाठविला. मी घरी आलो आणि बघतो तो काय? माझे प्रमाणपत्र सकाळच्या डाकेने आले होते. मी परत  तसाच पोस्ट ऑफिस मध्ये गेलो व पोस्ट मास्टरला सगळी कहाणी सांगितली. थोड्या वेळापूर्वी मी दिलेला लिफाफा (परीक्षेचा अर्ज) अजून तिथेच पडून होता. परंतु नियमानुसार त्याने मला प्रमाणपत्र मुळ लीफाल्यात घालायला नकार दिला. मी परत एक पत्र लिहून ते प्रमाणपत्र जोडून पोस्टाच्या हवाली केले आणि विनंती केली कि दोन्ही पत्रे एकदम पाठवायात यावी. आता मला चिंता होती कि जर का माझा अर्ज आणि प्रमाणपत्र एकदम Delhi ला पोचले नाही तर परीक्षेचे Hall Ticket कसे येईल? ह्याच काळजीत मी पुढील ३० दिवस अभ्यास केला. परीक्षेच्या आधी एक आठवडा मला पोस्टाने Hall Ticket आले आणि माझा जीव भांड्यात पडला. मी पोस्टमन काकांना थांबवून ते पत्र उघडले आणि त्यांचे आभार मानले. एव्हडे खुष होण्यासारखे त्यात काय होते असा प्रश्न त्यांना पडला? साहजिक आहे कारण त्यांना कोठे माझी कर्म कहाणी माहित होती. !!!

CA  पास झाल्यानंतर मी वरिष्ट पदावर नोकरी करू लागलो व त्याच वेळी CS चा अभ्यासक्रम सुरु केला (१९७८-१९८०). परीक्षेचा अभ्यास (Home  Study )म्हणून विद्यार्थ्याला जवळ जवळ ४० पेपर लिहावे लागत व तपासण्यासाठी ICSI Delhi ला पाठवावे लागत. मी प्रत्येक सोमवारी ५ पेपर लिहून ऑफिसला जाताना पोस्टात जाऊन ते मोठे parcel पाठवीत असे. तपासून झालेले पेपर उलट टपाली घरी येत. अक्षरश: हि हमाली होती. माझ्या ५ पेपरचे वजन ४-५ किलो असे. ह्या सर्व यशात पोस्टाकडून मिळालेल्या ह्या सेवेचा खूप मोठा वाटा  आहे.

शिक्षण पूर्ण केल्यावर मनात विचार आला कि आपले पेपर जसे कोणीतरी तपासले व मोलाच्या सूचना दिल्या, तसेच परीक्षकाचे मी सुद्धा केले पाहिजे म्हणजे एका अर्थाने हे पुण्याचे काम ठरेल. मी ICAI, ICSI, ICWA  चा Examiner म्हणून काम करू लागलो. त्याच बरोबरीने IIB चा सुद्धा examiner म्हणून माझी नेमणूक झाली. माझ्या मुळे पोस्टाचे काम खूप वाढले. प्रत्येक आठवड्याला पोस्टमन माझ्या घरी पेपरचे २-३ गठ्ठे आणू  लागला. (अंदाजे वजन १० किलो) ते पेपर तपासून मी पोस्टाच्या माध्यमातून परत पाठवीत असे. मी आणि पोस्टमन आम्ही दोघेही पेपर उचलण्यासाठी हमालाच होतो. परंतु पेपर तपासण्याची हमाली मला वेगळी मिळत होती. . हे पेपर मी माझ्या  relaxation च्या वेळात तपासात असे. १५ वर्षे हा उपक्रम चालला. कालांतराने हे काम बंद करावे लागले व पोस्ट ऑफिसची माझ्या तावडीतून सुटका झाली.

अनेक वर्षे माझे Income Tax Refund पोस्ट  ऑफिसने वेळेवर आणल्यामुळे मी त्यांचा अत्यंत आभारी आहे.  तसेच Dividend warrant , Annual Report वितरणाचे काम सुद्धा त्यांनी केले.

आता हे काम कमी झाले आहे परंतु सरकार  अनेक कामे पोस्ट ऑफिसच्या माथी मारत असते.
उ. ह. passport स्वीकारणे , IT Return स्वीकारणे, फोनची, मोबाईलची बिले, विजेची बिले स्वीकारणे वगैरे. पोस्ट ऑफिस बँकिंग वगैरे गोष्टी आहेतच. अजून पोस्ट ऑफिसला बँकिंग व्यवसाय करण्याचा परवाना मिळाला नाहीये. मी लहान असताना radio चे license काढावे लागे व वर्षाला जानेवारी महिन्यात त्याकाळी १५ रुपये भरावे लागत. खूप मोठी रांग असे.

सगळ्यात वाईट एकाच गोष्टीचे वाटते कि पोस्ट  ऑफिस  कर्मचाऱ्यांकडे सगळे जण  कामचुकार म्हणून बघतात. परंतु त्यांच्या working conditions चा कोणीच विचार करत नाही. टपाल वितरणासाठी त्यांना किती पायपीट करावी लागते?, किती ओझे उचलावे लागते? ह्या गोष्टींकडे कानाडोळा केला जातो. इमारतीचे अनेक मजले त्यांना चढ उतार करावी लागते. काही वेळा त्यांना लिफ्टचा वापर करायला मनाई केली जाते.

काही वर्षापूर्वी प्रत्येक रहिवाश्यांनी स्वतंत्र टपाल पेटी इमारतीच्या खाली बसवावी असा फतवा काढण्यात आला, पण लोकांच्या विरोधामुळे तो रद्द करण्यात आला. ज्या इमाटती जुन्या आहेत त्यामुळे अशी पेटी बसविण्यासाठी पुरेशी जागा नाही हे  म्हणणे मान्य आहे. पण त्या तारखेनंतर बांधलेल्या इमारतीत हा नियम का राबवला नाही?

नवीन मोठी वसाहत बांधली कि बिल्डरकडून पोस्ट  ऑफिस , पोलीस  स्टेशन, फायर स्टेशन का बांधून घेतले जात नाही? असा  मला नेहमी प्रश्न पडतो.

माझ्या मनात पोस्टमन बद्दल नक्कीच हळवा  कोपरा आहे. दिवाळीला मी पोस्टमनला भरपूर दिवाळी आणि  मिठाई देतो व हे माणुसकीचे नाते जपण्याचा प्रयत्न करतो. अनेक  वर्षांपूर्वी एक पोस्टमन माझ्या घरी आला व बायकोच्या Piles च्या operation साठी त्याने ओषधासाठी रुपये ५०० ची मागणी केली. सार्वजनिक इस्पितळात operation फुकट होणार होते. ह्या पोस्टमन ने ४ वर्षे माझ्या पेपरची ओझी वाहिली होती. मी त्याला लगेच पैसे काढून दिले. जास्तीची दिवाळी ह्या खात्यात डेबिट करून टाकली. पगार झाल्यानंतर ५०० रुपये परं करीन असे सांगून तो गेला. अर्थात त्याने पैसे परत केले नाहीत. असो . गरज माणसाला खोटे बोलायला भाग पाडते का? असो.
मित्रानो, पोस्ट  ऑफिसबद्दल तुमचा काय अनुभव आहे? जेव्हा आयुष्यात तुम्हाला ऑफिसात Frustration येईल तेव्हा पोस्टात चक्कर मारा – तेथील कर्मचाऱ्यांकडे बघा आणि जादू अनुभवा. तुमचे frustration नक्की नाहीसे झाले असेल किंवा कमी झेल असेल. 🙂

सुधीर वैद्य
०२-०२-२०१५


Advertisements

0 Responses to “३९३) मी आणि पोस्ट ऑफिस – चिंतन”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

May 2015
M T W T F S S
« Jan   Jul »
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: