१२५) कथाश्री – दिवाळी अंक २०१४

Kathashi Diwali 2014 - Photo3721
१२५) कथाश्री – दिवाळी अंक  २०१४

ह्या वर्षीच्या अंकात  ‘गरज ‘ ह्या विषयावर अनेक मान्यवरांनी आपले विचार शब्दांकित केले आहेत.

गरज ह्या शब्दाकडे जेव्हा आपण बारकाईने बघतो तेव्हा  जाणवते की गरज आणि आपलेआयुष्य वेगळे काढताच येणार नाही. क्षणोक्षणी आपल्याला कसली तरी गरज लागते. ह्या गरजांची जंत्री  करायची म्हटले तर एक वेगळा लेख लिहावा लागेल. (उ. ह. आई-वडिलांच्या प्रेमाची, चांगल्या शिक्षणाची, नोकरीची , नोकरीतील बढतीची, भरपूर पैशाची, चांगल्या जागेची, मनपसंद जोडीदाराची, चांगल्या अपत्यांची, प्रेमाची , मायेची, सहजीवनाची, social media ची , सुखासीन वस्तूंची ……. हि जंत्री कितीही मोठी होईल. )

गरज हि शोधाची जननी आहे असे म्हटले जाते. अन्न , वस्त्र , निवारा ह्या मुलभूत गरज होत्या. पण आता  ह्या यादीत अनेक गोष्टींची भर पडली आहे. पूर्वी माणसे  खर्च करताना गरज – सुखासीन – ऐषाराम ह्या गोष्टी विचारात घेत. पण हल्ली हा मापदंड कालबाह्य झाला आहे कि काय ? असे वाटू लागले आहे. आता प्रत्येक वस्तू हि गरज बनली आहे.

१९९१ सालानंतर खा-उ-जा (खाजगीकरण – उदारीकरण – जागतिकीकरण) चे वारे भारतात वाहू लागले. उद्योग – व्यवसाय – नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या. लोकांच्या हातात पैसा खेळू लागला. मध्यम वर्गाची (नवश्रीमंत ) आर्थिक ताकद वाढली. जीवनमान सुधारले, पण मानसिक अस्थिरता, स्पर्धा , ताण -तणाव ह्यात कमालीची वाढ झाली.

ह्याच वेळी जाहिरातीचे नवीन मापदंड तयार झाले.  एखाद्या वस्तूची गरज नसताना सुद्धा ह्या वस्तूची गरज आहे असे पटविण्यात ह्या जाहिराती यशस्वी झाल्या. Mobile, फेसबुक नसताना सुद्धा माणसे  सुखात होती. पण आता दर वर्षी मी कसा नवीन mobile घेतो हे अभिमानाने सांगितले जाते. सणासुदीला जेवणाचे ताट देवासमोर ठेवून त्याला नेवैद्य दाखवून जेवणाला सुरवात होत असे. पण आता जेवणाच्या ताटाचा फोटो काढून फेसबुक वर अपलोड केल्याशिवाय चैन पडत नाही – जेवण घशाखाली उतरत नाही. .असे का? ह्या मानसिकतेची गरज काय? असा प्रश्न का मनात येत नाही. असो.

गरज ह्या विषयाचा आवाका किती मोठा आहे म्हणून हे सर्व विवेचन.अश्या अनेक गरजांवर मान्यवरांनी विचार share केले आहेत. ह्या लेखांसाठी हा अंक  नक्की वाचा.

अंक नेहमीप्रमाणे दर्जेदार आहे. नावाप्रमाणे ह्या अंकात उत्तम कथा आहेत. त्यातील काही कथात मनुष्य  स्वभावाचे अनेक कंगोरे अधोरेखित केले आहेत.


सुधीर वैद्य
१६-०१-२०१५
Advertisements

0 Responses to “१२५) कथाश्री – दिवाळी अंक २०१४”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

January 2015
M T W T F S S
« Dec   May »
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: