१२४) नाते जन्माचे / लेखिका शोभा बोंद्रे

Nate Janmache - Photo3720
१२४) नाते जन्माचे / लेखिका शोभा बोंद्रे / पारख  प्रकाशन / ऑक्टोबर १९९३/
पृष्ठे २२४ / रुपये ५०
/ डॉक्टरांच्या मुलाखती:
दोन शब्द लेखिकेबद्दल:

लेखिका गेल्या २५ वर्षाहून अधिक काळ लेखन करत आहेत. त्यांची  ११ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. १९९६ साली त्यांच्या ‘सातासमुद्रापार’ ह्या उद्योग जीवनावरील कादंबरीला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला होता. त्यांनी काही लोकप्रिय TV मालिकांचे संवाद लेखन केले आहे. काही पुस्तकांचे त्यांनी शब्दांकनहि केले आहे.

पुस्तकाचा विषय:
आपल्या जन्माबरोबर अनेक नाती जन्म घेतात. त्यातील काही आपली साथ देतात, काही तुटतात – कोमेजतात – दुरावा निर्माण करतात.काही नाती एखाद्या कारणासाठी निर्माण होतात. काही नाती काही काळापुरती साथ देतात. तर काही नाती जन्म भरासाठी निर्माण होतात. सर्वच नाती संपताना मनाला चटका लावून जातात. आयुष्य असेच चालू राहते म्हणून तर जगण्यात गंमत  आहे.

परंतु असे एक नाते आहे कि जे आपल्याला निभावावे  लागते.  हे नाते आहे डॉक्टर बरोबरचे. मला कल्पना आहे कि हे वाचून तुम्ही विचारात पडणार आहात. हे नाते आपल्या जन्माबरोबर – पहिला श्वास घेण्याआधी पासून सुरु होतेआपल्या  पहिल्या रडण्याला डॉक्टर साक्षीदार असतो. तसेच आपण  हे जग सोडले आहे ह्याचे death certificate शेवटी डॉक्टरच देतो. मित्रानो , आता तरी तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसला असेल. 🙂

लेखिकेने १७ वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर डॉक्टरांच्या मुलाखती घेऊन त्यांना बोलते केले आहे.  ह्या डॉक्टरनी सुद्धा स्वत:च्या व्यवसायाबद्दल, आजाराबद्दलचे समज – गैर समज, रोग्यांच्या प्रतिक्रिया – भीती ह्या विषयी माहिती दिली. लेखिकेने ह्या माहितीला योग्य प्रकारे गुंफून हे पुस्तक लिहिले आहे.

पुस्तक वाचून आपल्याला अनेक रोगांची माहिती मिळते व अनेक प्रश्नांची  उत्तरे सुद्धा मिळतात. रोगाबद्दलची मनातील भीती थोडी कमी होण्यास मदत होते. डॉक्टर सुद्धा एक माणूस आहे  हा विचार करायला आपण जेव्हा डॉक्टरना भेटतो तेव्हा वेळ नसतो. हि जाणीव आपल्या मनात रुजवायला  हे पुस्तक नक्की प्रवृत्त करते.

२२ वर्षापूर्वीचे पुस्तक आहे, त्यामुळे काळ किती बदलला आहे हे वाचताना कळते. हे पुस्तक ग्रंथालयात  नक्की मिळेल.

पुस्तकाचा font  जरा लहान असल्यामुळे पुस्तक वाचायला थोडा वेळ जास्त लागतो.  पुस्तक वाचनीय आहे ह्या बद्दल शंका नाही .

सुधीर वैद्य
१४-०१-२०१५
Advertisements

0 Responses to “१२४) नाते जन्माचे / लेखिका शोभा बोंद्रे”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

January 2015
M T W T F S S
« Dec   May »
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: