१२३) मनाच्या अंगणात / लेखक अरुण वि. देशपांडे

123) Arun Deshpande

123) Photo3656

१२३) मनाच्या अंगणात / लेखक अरुण वि. देशपांडे / ३०-०३-२०१३/
रुपये १२५ /- पृष्ठे १०४ / ललित लेख:

हल्लीच्या पिढीला ‘ अंगण ‘ म्हणजे काय हे कदाचित  माहित नसेल किंवा ते विसरले असतील, अश्या पिढीबरोबर  लेखकाने  मनाच्या अंगणात निवांत गप्पा मारण्यासाठी मस्त मैफिल जमविली आहे.

दोन शब्द लेखकाबद्दल:

लेखक State bank of Hyderabad नोकरीला होते व त्यांनी २००६ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. १९८६ पासून साहित्य क्षेत्राशी  त्यांचा संबंध आला. तेव्हापासून  ते नियमितपणे भरपूर लिखाण करत आहेत. आजपर्यंत त्यांनी ३४ पुस्तके लिहिली आहेत. बँकेत नोकरी करत असताना सुद्धा लेखनाचा व्यासंग जोपासणे हि गोष्ट तरुण पिढीने विचार करण्यासारखी आहे.

लेखांचे विषय:

एका अर्थाने देशपांडे सरांची हि ‘ मन कि बात ‘ आहे. मन हा एक गहन विषय आहे.
१९९१ सालानंतर खा-उ-जा (खाजगीकरण – उदारीकरण – जागतिकीकरण) चे वारे भारतात वाहू लागले. उद्योग – व्यवसाय – नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या. लोकांच्या हातात पैसा खेळू लागला. मध्यम वर्गाची (नवश्रीमंत ) आर्थिक ताकद वाढली. जीवनमान सुधारले, पण मानसिक अस्थिरता, स्पर्धा, ताण -तणाव ह्यात कमालीची वाढ झाली. काळ्या पैशातही वाढ झाली. भ्रष्टाचारचा राक्षस वाढू लागला.

माणूस जास्त आत्म केंद्रित झाला. मी आणि माझे पलीकडे त्याला दिसेनासे झाले. ह्या गडबडीत मन कोठे हरवले हे त्याला समजलेच नाही. अश्या  मन हरवलेल्या वर्गासाठी हि ‘ मन कि बात ‘ सांगण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे.

चांगला माणूस बनण्यासाठी सुद्धा आपल्याला feedback आवश्यक असतो.समाजमन बदलणे हे काही सोपे काम नाही. पण समाजाची सुरवात स्वत:च्या कुटुंबापासून  होते,त्यामुळे हा गप्पांचा फड जमविला आहे.

लेखकाने प्रामुख्याने नाते संबंध, विवाह – वैवाहिक आयुष्य, वेळेचे व्यवस्थापन, निवृत्ती – समाजसेवा, आणि मनाचे विकार ह्यावर लिहिले आहे. ह्या प्रश्नांवर लिहिताना काही सोपे उपाय सुद्धा सुचविले आहे.  वर्तणुकीत नेमके कोणते बदल आणि कसे केले पाहिजेत ह्या संबंधी मोलाचा सल्ला सुद्धा दिला आहे.

एका अर्थाने मनाचे पेस्ट कंट्रोल करण्याची गरज अधोरेखित केली आहे. हे पटवून देताना कवितेचा आधार सुंदर रीतीने घेतला आहे.

अहंकार हा माणसाचा मोठा शत्रू आहे. अभिमान आणि अहंकार ह्यातील सीमारेषा खूप धुसर आहे. माणसाला अहंकार वाटू लागला कि समोरची व्यक्ती, परिस्थिती आणि वस्तू यांचे आकलन करण्याची शक्ती धुसर होते. निर्णय चुकतात, पण तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते.

पुस्तकातील मनावरील विचारांचे संकलन कवितेत मांडण्याचा प्रयत्न करतो. मी काही हाडाचा कवी नाही हे मुद्दाम नमूद करतो.

मन म्हणजे मन असते. तुमचे आणि आमचे सेमच असते.
पण मन दुसऱ्याला दाखविता येत नाही हे दु:ख असते.
तर मन दुसऱ्याला कळत नाही हि व्याकूळता असते.

मन म्हणजे काय असते?
मन म्हणजे फांदीवरल्या पक्षासारखे असते.
एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडत असते.

मन म्हणजे उमलणाऱ्या कळीसारखे असते.
कधी कधी उमलण्याआधीच कोमेजून जाते.
तर कधी उमलल्यानंतर पाकळीसकट गळून जाते.

मन म्हणजे शंकरावर अभिषेक करणाऱ्या अभिषेकपात्रासारखे  असते.
विचारांची धार चालूच असते.

मन कोठे असते?
कोणी म्हणतात की मन हृदयात असते.
पण काही माणसाना हृदयच नसते.

सुखी व्हायचे असेल तर शरीर मनाच्या ताब्यात पाहिजे,
आणि मन बुद्धीच्या ताब्यात पाहिजे.

पण मग बुद्धी कोठे असते?
बुद्धी मेंदूत असते. पण काही लोकांना ~~~~~~~ 🙂

निर्णय घेण्यास बुद्धी पाहिजे की मन? की दोन्ही ?
निर्णय घेतला बुद्धीने तरी मनाचा कौल पाहिजे.
कारण  काही वेळा बुद्धी फसगत करू शकते.
त्यामुळे देवाच्याकौलापेक्षा मनाचा कौल तुमचे आयुष्य तारू शकते.

तुम्ही कधी विचाररहित मन अनुभवले आहे का?
नसेल तर नक्की प्रयत्न करा.
असे विचाररहित मन करणे वाटते तेव्हडे कठीण नसते.
विचाररहित मन करताना खूप मजा येते.
आणि जमले तर आयुष्याच बदलून टाकते.

मित्रानो, सांगाल मला की मन म्हणजे काय असते आणि ते कोठे असते?

उजेडात असणारी सोबत हि नेमकी किती खरी आणि किती खोटी हा प्रश्न उरतोच. अंधारात सोबत नसते पण आपले मन आपल्याला कधीच सोडून जात नाही.मन जेव्हा अस्वस्थ असेल तेव्हा मनाचे मन व्हा आणि मनाची समजूत काढा म्हणजे सर्व गोष्टी सोप्या होतात. आपल्या मनाबरोबर संवाद साधा असे लेखक पदोपदी सांगत आहे.
एकत्र कुटुंब आणि नातेसंबंध ह्या विषयी लिहिताना लेखक भाऊक होतो. एकत्र कुटुंब जपले पाहिजे असे मनावर कोरण्याचा प्रयत्न करतो. परंतु मोठ्या शहरातून हे शक्य होतेच असे नाही. त्याला अनेक संयुक्तिक कारणे आहेत . (उ. ह. लहान जागा , privacy च्या विस्तारित कक्षा, तरुण पिढीच्या मौज – सुख ह्याच्या बदललेल्या व्याख्या, कामाचा ताण, श्रीमंतीने मनात बोकाळलेली स्वार्थी वृत्ती) माणसाने कळपातून फुटणे हा  अतिरेकी  व्यक्ती स्वातंत्र्याचा परिणाम आहे बहुतेक. माझ्या मते जरी वेगळे राहिले तरी मने जुळलेली असावीत.

कुटुंब व्यवस्थेचा पाया हा कुटुंबातील व्यक्तीच्या उपयुक्ततेवर ठरतो असे माझे मत आहे. प्रत्येक माणसाचा अग्रक्रम असतो आणि त्याच्यासाठी तो बरेच वेळा बरोबरही असतो. जेव्हा अग्रक्रमाचा मेळ कुटुंबात, समाजात, बसत नाही, तेव्हा झगडा सुरु होतो. दुसऱ्याला सांभाळून घेण्यासाठी स्वत:चा इगो आकारात असणे गरजेचे आहे. जर प्रत्येक माणसाला सहवेदनेचे महत्व कळले आणि त्याने हि भावना अंमलात आणली, तर कुटुंबात, समाजात, देशात आणि जगात सुख -शांती नांदायला वेळ लागणार नाही.

नातेसंबंध हा खूप गहन विषय आहे. रक्ताचे नाते असताना सुद्धा संबंध बरेच वेळा चांगले नसतात. त्या उलट रक्ताचे नाते नसताना सुद्धा संबंध खूप चांगले असतात. असे का होते? नातेसंबंध का जुळतात, कसे जुळतात, कधी तुटतात, का तुटतात ह्या विषयाचा कितीही अभ्यास केला, तरी नेमके उत्तर मिळेल ह्याची खात्री देता  येत नाही. माझ्या मते नातेसंबंध मनात उमलले पाहिजेत. मनात उमललेले नातेसंबंध आपल्याला आयुष्यभर साथ देतात आणि आपले आयुष्य सुगंधी करतात

लेखक विवाहाबद्दल लिहिताना खूप हळवा होतो. हे पवित्र संबंध का तुटतात ह्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. परिस्थिती खरेच गंभीर आहे. नवरा-बायकोचे प्रेम हे ओंजळीत धरलेल्या पाण्यासारखे असते. खूप प्रेम – खूप प्रेम म्हणून ओंजळ बंद करायला गेलात, तर space न मिळाल्यामुळे वैवाहिक जीवनात प्रश्न निर्माण होतात.

स्त्रियांनी खालील वाक्याचा मनापासून विचार करावा हि विनंती .
A woman’s strength amazes men. She can handle trouble and carry heavy burdens. She holds happiness, love and opinions. She smiles when she feels like crying, cries when she’s happy and laughs when she’s afraid. Her love is unconditional!! There’s only one thing wrong with her, she sometimes forgets what she is worth….

खऱ्या प्रेमात त्याग करायची तयारी असावी लागते. हिंमती शिवाय प्रेम सफल होत नाही. दुसऱ्याला सांभाळून घेण्यासाठी स्वत:चा इगो आकारात असणे गरजेचे आहे.

आपले आयुष्य म्हणजे असंख्य घटनांची साखळी असते. काही घटना अनपेक्षित असतात, काही घटना घडणार हे माहित असते, पण त्याची वेळ माहित नसते, काही घटनांची वेळ माहित असते. प्रत्येक घटनेच्या वेळी बरेच वेळा आपण ‘ प्रतिक्रिया ‘ (Reaction ) देत असतो . त्याऐवजी आपण Response देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे आयुष्यातील बरीच tensions कमी होण्यास मदत होते. अर्थात ह्या साठी त्या घटनेवर आधी विचार करावा लागतो.

ज्या वेळी महिलांना बरोबरीचा दर्जा खऱ्या अर्थाने प्राप्त होईल, त्या वेळी जागतिक महिला दिन साजरा करण्याची गरज भासणार नाही. खरेतर नवरा -बायकोनी  माप ओलांडून गृह प्रवेश केला पाहिजे, कारण कुटुंबाचे सुख , शांती आणि मर्यादा सांभाळण्याची  जबाबदारी दोघांची आहे .

नवरा – बायकोच्या नात्यात इतर लोकांच्या अपेक्षांमुळे गुंता होतो. तेव्हा लग्नापूर्वी एकमेकांच्या मुलभुत अपेक्षांची चर्चा करा. इतरांच्या कोणत्या अपेक्षा आहेत याचाही विचार करा, पण त्या अपेक्षांना अवाजवी महत्व देऊ नका. अश्या अपेक्षांच्या बाबतीतील कृती योजना तयार करा. कुटुंबियांना सुद्धा तुम्ही व तुमची पत्नी  कोणत्या  अपेक्षा पूर्ण  करू शकणार नाही किवा कशा रीतीने पूर्ण कराल याची कल्पना द्या.

आयुष्यात मानसिक शांती हवी असेल तर नाही ऐकायची आणि नाही म्हणण्याची सवय केली पाहिजे. आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर, मी काय करू शकतो, मी काय करणार, किती – कुठपर्यंत तडजोड करणार, स्वत:ला काय नको, मी काय करणार नाही, हे नक्की हवे. बरेच वेळा हृदयाचा आवाज (आतला आवाज- मनाचा कौल ) ऐकणे फायद्याचे ठरते. सुखी वैवाहिक जीवनासाठी त्याग करायची तयारी आहे का ? असल्यास किती ह्याची सीमा रेषा आखा आणि त्याग करण्याची सवय अंगी बाणवा. त्यानंतरच लग्नाचा विचार करा.

लेखक सौंदर्याबद्दल काही मते मांडतो. Beauty is not what you see in the mirror. चेहऱ्या मागील चेहरा हि ओळख जर तुमच्या वर्तनातून लोकांना दिसली तर त्यांचे तुमच्या चेहऱ्याकडे लक्षच जाणार नाही. तुमचा चेहरा कदाचित ते कालांतराने विसरतील, पण तुमचा खरा चेहरा मात्र त्यांच्या मनात कायमचा कोरला जाईल .

निवृत्ती हि निवृत्ती असते व्यवसायातून / नोकरीतून, सेवेसाठी.आयुष्यभर जे समाजाने दिले ते भरभरून परत देण्यासाठी.  प्रत्येक माणसाने निवृत्ती नंतरच्या आयुष्याचा विचार करून छंद जोपासले पाहिजेत आणि  जमेल ती समाजसेवा केली पाहिजे असे आग्रहाने सांगतो.

लेखक तरुण पिढीसाठी वेळेच्या व्यवस्थापनासंबंधी चांगल्या सूचना करतो.

लेखक अनेक विषयावर गप्पा मारतो, पण तुम्ही पुस्तक वाचणारच आहात त्यामुळे माझे विवेचन आटोपते घेतो.
पुस्तकातील चित्रे:

पुस्तकातील चित्रे आशयाला पूरक आहेत. पृष्ठ क्रमांक १२ वरील मनाच्या अंतरंगात डोकावू कि नको असा विचार करणारा माणूस मला खूप भावला. मनाचे चित्ररूप छान  वाटले. पृष्ठ क्रमांक ३२ आणि ८१ वरील फोटो हि खूप आवडले .

पुस्तकाचा Font मोठा आहे. पुस्तक एका बैठकीत वाचून होते.
गंमतीने असे म्हणावेसे वाटते कि ह्या गप्पा रात्रीच्या शांत वेळी एव्हड्या रंगतात कि पहाटेच्या गार वाऱ्याने  आपण भानावर येतो. ‘ प्रभाकराची उषा ‘ पूर्व क्षितीजावर रंगाची उधळण करायला आतुर झालेली असते आणि चंद्र काढता पाय घेण्याच्या तयारीत असतो. पक्षांची किलबिल कानाला गप्पांचा परिणाम वाढवणारी असते.

नवीन आवृत्तीत लेखकाच्या परवानगीने खालील दुरुस्ती करावी अशी प्रकाशकाला नम्र विनंती: 

वैचारिक  लेखांच्या पुस्तकात प्रकरण क्रमांक आणि अनुक्रमणिकेत पृष्ठ क्रमांक असेल तर वाचताना बरे पडते, कारण अनेकवेळा एखादा विषय अनेक लेखात येत असतो आणि त्यामुळे वाचताना त्या विषयाला न्याय मिळण्यासाठी हे सोयीचे होते.

प्रकरण क्रमांक १२- घरकुलाचे  वैभव, नवीन पानावर सुरु न करता पृष्ठ क्रमांक ५३ वर शीर्षक न देत छापले आहे.ह्याची कृपया प्रकाशकाने नोंद घ्यावी.
समारोप:

वर्तमानात जगा, भूतकाळात गुंतू नका, भविष्याची अति काळजी करू नका.
भूतकाळातील चुका वर्तमानात टाळा आणि भविष्याचा आराखडा तयार करा व वर्तमानात कामाला लागा.

आयुष्य हे चौरस आहारासारखे असले पाहिजे. शिक्षण, नोकरी -व्यवसाय, पैसा-संपत्ती, आई-वडील- इतर कुटुंबीय, मित्र , तब्बेत – व्यायाम -आहार , आराम. छंद – करमणूक, ह्या सर्व गोष्टींना योग्य प्रमाणात स्थान देता  आले तर दिवसाची प्रत्येक संध्याकाळ तुम्हाला निवांतपणे घालवता येईल. बघा विचार करून. 🙂

आयुष्य
आयुष्य म्हणजे असतो नात्यांचा खेळ,
खेळता खेळता कळतही नाही, कधी संपतो वेळ,
आणि उभे ठाकते ती वेळ 😦
इतरांचा खेळ चालूच रहातो,
आपण पुन्हा जन्म घेतो, मांडाया नवीन खेळ

आठवणी
आठवणी ह्या आठवणी असतात.
प्रत्येकाच्या वेगळ्या असतात.
काही आठवणी गोड असतात तर काही आठवणी कटू असतात.
पण गोड आणि कटू गोष्टी शरीराला आवश्यकच असतात.

मित्रानो, वेळात वेळ काढून हे पुस्तक नक्की वाचा. आपल्या मनाचा कानोसा घ्या. पुस्तक मात्र मनाची कवाडे बंद न करता वाचा.

असे छान पुस्तक – लेख लिहिल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन. अशी उत्तम पुस्तकांची  निर्मिती सरांच्या लेखणीतून व्हावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

सुधीर वैद्य

२२-१२-२०१४

Advertisements

0 Responses to “१२३) मनाच्या अंगणात / लेखक अरुण वि. देशपांडे”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

January 2015
M T W T F S S
« Dec   May »
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: