१२१) पुनर्विकास भूलभुलैया / लेखक महेश यशराज

121) Photo3651
१२१) पुनर्विकास भूलभुलैया / लेखक महेश यशराज / रुपये १३०/- पृष्ठे १०४

पुस्तकाचे शीर्षक थोडे बुचकळ्यात टाकणारे आहे. पण त्यामुळेच हे पुस्तक मी चटकन खरेदी केले. प्रथम दर्शनी असे वाटले कि लेखकाचा कदाचित पुनर्विकासाला विरोध असेल आणि त्यामुळे त्याने हे पुस्तक लिहिले असावे. पण पुस्तक वाचायला  घेतल्यानंतर मात्र लेखकाचा  उदात्त उद्देश समोर आला.

पुनर्विकास हा सध्या परवलीचा शब्द झाला आहे. जुन्या इमारतीत राहणारा प्रत्येक जण Tower मध्ये राहण्याचे स्वप्न बघू  लागला आहे. हे लिहित असताना मला प्रसिद्ध लेखक व . पु . काळे ह्यांच्या  एका वाक्याची आठवण झाली. (कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही….पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं…कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही)

पुनर्विकासाच्या स्वप्नांचे पंख लावून उताविळपणा केला जात आहे.  पण आपल्या सहनिवासाकडे आणि सभासदांकडे ती ताकद आहे का? ह्याचा मात्र गांभीर्याने विचार होत नाही . :(उ. हा . Property Title clear आहे का? Conveyance झाला आहे का? सहनिवासात एकोपा – विश्वासाचे वातावरण आहे का? developer कडील मागण्यात सभासदांची एकवाक्यता आहे का? ह्या गोष्टींचा विचार गांभीर्याने होत नाही हि वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अश्या वातावरणात सुरु केलेला पुनर्विकास हा भूलभुलैया – दिवास्वप्न ठरते आणि हिच  बाब समाजमनावर बिंबवण्यासाठी हे पुस्तक लेखकाने लिहिले आहे.

लेखक पुनर्विकास योग्य रीतीने होण्यासाठी मोफत परिसंवादाचे आयोजन करतो. ह्या आगळ्या वेगळ्या समाजसेवेला माझा प्रणाम.

पुनर्विकासासाठी सरकारने बंधनकारक मार्गदर्शक प्रणाली तयार केली आहे. सहनिवासानी ह्या Circular नुसार पुनर्विकास करणे अपेक्षित आहेत. परंतु अनेक वेळा ह्या circular चे letter आणि spirit प्रमाणे पालन होत नाही व त्यामुळे पुनर्विकास वेळेत होत नाही व अनेक सभासदांना बेघर व्हावे लागते. नवीन बांधकामाच्या तक्रारी २-३ वर्षात सुरु होतात आणि मग लक्षात येते कि आपली जुनी इमारत ह्यापेक्षा बरी होती. पण हि पश्चात बुद्धी असते. पुनर्विकास म्हणजे केवळ जास्त जागा. मुबलक corpus fund नव्हे, तर वेळेत – नियमानुसार आणि परत दुरुस्तीचा त्रास नसावा असे झाले पाहिजे.

ह्या पुस्तकात पुनर्विकासाचे काम नियमानुसार कसे केले  पाहिजे ह्या बद्दल मार्गदर्शन केले आहे. ह्या वाटचालीत सभासदांची developer कडून होणारी फसवणूक कशी टाळावी, हे सुद्धा नमूद केले आहे. त्याचप्रमाणे PMC – Developer ची निवड कोणत्या निकषावर करावी ह्या महत्वपूर्ण गोष्टीचा सांगोपांग विचार मांडला आहे. (PMC हा सहनिवास आणि developer मधील मुख्य दुवा असतो व ज्याच्यामुळे सभासदांचा इंटरेस्ट protect होतो. )

लेखकाला एक नम्र सूचना करावीशी वाटते कि त्यांनी नवीन  आवृत्तीत सरकारने issue केलेले circular  द्यावे, जेणे करून पुस्तकाची उपयुक्तता अजून वाढेल.

दोन शब्द लेखकाबद्दल :

१) PMC म्हणून पुनर्विकासासाठी महत्वपूर्ण सेवा.

२) ३२ वर्षांचा बांधकाम व अंतर्गत सजावट कामांचा सर्वांगीण अनुभव .

३) लेखकाकडे स्वत:ची  बांधकाम संदर्भातील ५ patents .

४) समाज प्रबोधन करणाऱ्या अनेक पुस्तिकांचे लेखन .

५) मोफत परिसंवादाद्वारे लोकांना पुनर्विकासाबद्दल जागृत करणे .

संपर्क :

Mobile: 9223419450
SMS: 7303055782

अश्या लोकापयोगी विषयावर पुस्तक लिहिल्याबद्दल सर्व वाचकांच्या तर्फे मी लेखकाचे आभार मानतो व तो करत असलेल्या कार्याला अनेक शुभेच्छा देतो.
लेखकाने बांधकाम शास्त्राची सोपी ओळख असे पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकाची किंमत रुपये १५० आहे. दोन्ही पुस्तकांची एकत्रित किंमत जरी [१५० +१३० = २८०/- रु.] असली तरी एका ट्रस्टला मदत करण्यासाठी ती दोन्ही पुस्तके ना नफा ना तोटा तत्वावर फक्त १२०/- रुपयांना [दोन्ही] विकली जातात.

सुधीर वैद्य
२०-१२-२०१४
Advertisements

0 Responses to “१२१) पुनर्विकास भूलभुलैया / लेखक महेश यशराज”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

January 2015
M T W T F S S
« Dec   May »
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: