१२०) हे ही दिवस जातील / डॉ. आनंद नाडकर्णी

This too will pass - Photo3616

१२०) हे ही  दिवस जातील / डॉ. आनंद नाडकर्णी / मनोविकास प्रकाशन / द्वितीयावृत्ती १७-०१-२०१४ / रुपये १०० /- पृष्ठे १३० / कादंबरी


दोन शब्द लेखकाबद्दल:

डॉ. आनंद नाडकर्णी मनोविकार तज्ञ आहेत. समाजाचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे आणि त्यासाठी मनोविकार ह्या विषयाकडे संकुचित नजरेने बघता  येणार नाही असे त्यांचे मत आहे आणि ह्यासाठी ते आपल्या जीवाचे रान करतात. त्यांच्या ह्या प्रवासात त्यांना अनेक मान्यवरांची साथ मिळते. मनोविकारांबद्दल समाजात जागृती करण्याचे कार्य डॉक्टर करतात . मनोविकारासाठी नेहमीच्या उपचाराबरोबर डॉक्टर इतरहि  कलांचा (साहित्य, संगीत, चित्रकला, संवाद ) सुरेख उपयोग करतात.

डॉ नी  ह्या विषयावर अनेक लेख आणि नाटके लिहिली आहेत. आजपर्यंत त्यांनी १६ पुस्तके लिहिली आहेत. त्यांना मनोविकार शास्त्र, व्यसनमुक्ती आणि सामाजिक कार्य ह्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

समाजाच्या प्रश्नांची उत्तम जाण असलेल्या आणि त्यासाठी आपले संपूर्ण आयुष्यपणाला लावणाऱ्या डॉक्टरना माझा प्रणाम. असे छान  पुस्तक प्रसिद्ध केल्याबद्दल मनोविकास प्रकाशनचे अभिनंदन.

कथानक:
 
कथानायक ‘ मोहन’ हा १८ वर्षांचा अनाथ मुलगा आहे. गावाला मामीकडे राहून, तिला मदत करून, फावल्यावेळात काम करून शिक्षणासाठी पैसे मिळवून ताठ मानेने आयुष्य जगणाऱ्या अश्या ह्या मुलाची हि गोष्ठ आहे. मामी त्याला ओळखीच्या बाईकडे मुंबईला तिच्या मुलाचा (सुहास) caretaker म्हणून पाठवते.

सुहास जिन्यावरून पडतो आणि त्याचे पायाचे हाड मोडते. दिवसभर हॉस्पिटल मध्ये राहून त्याची सेवा करणे हे मोहनचे काम असते. महिना दीड महिन्याच्या काळात मोहन त्या हॉस्पिटलच्या दुनियेत रममाण होतो. निरीक्षण करतो, सुहासची चांगली काळजी घेतो. तसेच हॉस्पिटल मधील इतर आजारी मुला-मुलीना धीर देतो, त्यांच्या पालकांना मनात कोणतीही अपेक्षा न ठेवता मदत करतो.

ह्या वाटचालीत मोहनला  आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन गवसतो. परिस्थितीचा  सामना कसा केला पाहिजे हे तो शिकतो.  अंगभूत गुण आणि अवगुण ह्याची पारख त्याचे मन नकळतपणे  करू लागते. ह्या विचारधारेतून त्याला आयुष्याचे ध्येय गवसते. असे हे कथासूत्र.

 
पण हे कथासूत्र लेखकाने खूप सुंदर शब्दात मांडले आहे. कादंबरीचा बराचसा भाग संवाद रुपात आहे, त्यामुळे हे सर्व प्रसंग आपल्या डोळ्यासमोर घडत आहेत असा भास होतो.

मोहनच्या ह्या वाटचालीत आयुष्याची अनेक प्रमेय आपल्यासमोर येतात आणि तोच ह्या कादंबरीचा मुख्य आत्मा आहे.

जन्म आपल्या हातात नसतो पण जगणे आपल्या हातात असते. कर्मावर विश्वास ठेवून ध्येयाकडे वाटचाल केली तर आयुष्यात यश मिळवता येते हे सूत्र आपल्याला मिळते.

प्रत्येक माणसाने प्रत्येक क्षणी (सुखाच्या, दु:खाच्या, वेदनेच्या वेळी ) जर  पुढील
४ शब्द लक्षात ठेवले, तर त्या माणसाचे पाय आपोआपच आयुष्यभर जमिनीवर राहतील, जेणेकरून माणूस म्हणून जन्म मिळाला असला तरी त्याचे माणूसपण सिद्ध होईल. ते जादूचे शब्द आहेत ” This too will pass.” ( हे ही  दिवस जातील )

ह्या शब्दांमुळे माणसाला कधीही कोणत्याही क्षणी अति आनंद, अति दु:ख, अति वेदना होणार नाहीत. हि शिकवण आपल्याला कादंबरीतून मिळते.

माणूस आणि माणुसकी ह्या दोन शब्दात फक्त एका अक्षराचा फरक आहे. ते अक्षर म्हणजे ‘ की.’ हि की किंवा किल्ली प्रत्येकाकडे  असते पण तिचा वापर होतो कि नाही ह्याची परीक्षा हि कादंबरी घेते. माणूस दुसऱ्याला मदत करतो . परंतु बरेच वेळा त्या मदतीमागे काहीतरी स्वार्थ असू शकतो. जेव्हा स्वार्थाच्या पलीकडे जाऊन आपण जेव्हा दुसऱ्याला मदत करतो, तेव्हा ती समाज सेवा होते. अश्या सेवेची नशा माणुसकीची साक्ष देते.

भूतकाळ, वर्तमानात जगण्यासाठी प्रेरणा देईलच ह्याची खात्री नाही , त्यासाठी वर्तमान काळातील ध्येयच लागते. असे ध्येय मोहनला गवसते.

No pain no gain चे प्रमेय तर आपल्या ओळखीचे आहे.

समस्येचा स्वीकार आणि त्याचा  खल करत न बसता, भविष्यात ह्यातून बाहेर कसे पडायचे हा विचार खूप काही शिकवून जातो.

काही प्रसंगात काम आणि कामाचे मोल ह्याचा तिढा कसा सोडवायचा अश्या संभ्रमात मोहन अडकतो. आपणही बरेच वेळा ह्या विचारचक्रात अडकतो.

सख्खे नातेवाईक नसताना सुद्धा केवळ चांगल्या वागण्यामुळे मोहनला त्याच्या आजारपणात मानलेली नातेवाईक मंडळी मदतीला धावतात हे बघून तो अचंबित होतो. नातेसंबंध ह्या विषयावरील प्रबोधन आपल्याला विचार मग्न करते.

मोहनचे आणि आजारी मुलांचे विचार बघून आपल स्मार्ट मुलगा – मुलगी , खरेच स्मार्ट आहेत का ह्याचा सुद्धा अंदाज आपल्याला घेता येतो.
कादंबरीचे लेखन एव्हडे प्रभावी आहे कि मोहन आपल्या मनाचा  ताबा घेतो आणि आपण सुद्धा निमुटपणे त्याच्या डोळ्यांनी हे सर्व प्रसंग पाहतो. असे करताना आपले डोळे कधी पाणावतात हेच आपल्याला कळत नाही. हे अश्रू म्हणजे आपले मन संवेदनशील असण्याची ती खुणगाठ असते.
हि कादंबरी  कोणी वाचली पाहिजे?

डॉ  नी हि कादंबरी घरातील सर्वांनी व शक्य असल्यास एकत्र आणि मोठ्याने वाचली पाहिजे असे नमूद केले आहे.

कादंबरीचा Font मोठा आहे त्यामुळे कादंबरी एका बैठकीत वाचून होते. कादंबरीतील रेखाचित्रे डॉ नी स्वत:काढली आहेत व ती कादंबरीतील मजकुराला पूरक आहेत.
 
कादंबरीचे सार कवितेत शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.

वेदना

वेदना म्हणजे वेदना असते.
प्रत्येकाची वेदना मात्र वेगळी असते.

वेदना मनाची असते.
वेदना शरीराची असते.

माझी वेदना आहे नि:शब्द …
तिला साथ देण्या मी शोधतो आहे शब्द.
म्हणूनच करतो आहे हा काव्य प्रपंच.

वेदना मला का म्हणून विचारले नाही …
दुसऱ्याला का नाही म्हणून दु:खी झालो नाही.

वेदनेचे उमटले वळ.
भोगायला मिळाले त्यातूनच बळ.
वेदनेने केले घायाळ.
कारण माझी वेदना होतीच तशी खट्याळ.

वेदनेला स्वीकारत गेलो…
भोगून बाकी शुन्य करायला गेलो.
पण ते जमलेच नाही….
तीच वेदना घेऊन मी निघणार आहे लांबच्या प्रवासाला.
अशी वेदना कोणाला देऊ नको हे देवाला सांगायला.

वेदना इतकी झाली की त्याचेच झाले हसू.
मात्र माझ्या डोळ्यात होते आसू.

वेदनेच्या सावलीत मी मोठा झालो….
वेदनेचीच  मी वेदना झालो.

 
मित्रानो, वेळात वेळ काढून हि कादंबरी वाचा.  आपले विचार प्रगल्भ व्हावेत असे वाटत असेल, तर हे पुस्तक जरूर वाचा. तुमचा वेळ सार्थकी लागेल ह्याची मी खात्री देतो.

सुधीर वैद्य

१२-१२-२०१४

Advertisements

0 Responses to “१२०) हे ही दिवस जातील / डॉ. आनंद नाडकर्णी”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

January 2015
M T W T F S S
« Dec   May »
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: