३७८) भेळ – चिंतन

378) Bhel
३७८) भेळ – चिंतन

काल  संध्याकाळी बरेच दिवसांनी घरी भेळेचा कार्यक्रम होता, अगदी साग्रसंगीत. mobile वर छानशी गाणी लावली होती. खोलीत मंद दिवे होते आणि हातात आवडती  भेळ  होती.  एकीकडे गप्पा चालल्या होत्या. जुन्या आठवणी  सहजपणे मनात फेर धरत होत्या.

मी अचानक बोलता  बोलता काही क्षण थांबलो. बायको लगेच म्हणाली कि काहीतरी चिंतन सुरु झालेले दिसतेय? तुम्ही उद्या फेसबुकवर पोस्ट अपलोड केली कि मग मला सांगालच ? बायकोचा काय विश्वास आहे माझ्यावर? असो.

मित्रानो, मी थोडे चिंतन करत होतो म्हणण्यापेक्षा, माझ्या मनात काही विचार चमकून गेले हे मात्र खरे.

भेळ  म्हटले म्हणजे आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभे राहते. त्यातील घटक  कमी – जास्त असतील, एव्हडाच काय तो फरक. कोणाला फरसाण जास्त आवडते, कोणाला भेळ  खूप ओली  चटणी घालून भावते तर कोणाला भेळेत ओली  चटणी कमी पण भरपूर कांदा आवडतो. प्रत्येकाची आवड निवड वेगळी.

पण भेळेचा व्यापक अर्थ बघितला तर मिसळ सुद्धा एका अर्थाने भेळच  आहे. अगदी
भाज्या घातलेले नुडल म्हणजे सुद्धा एकप्रकारे भेळच.

मित्रानो, आपले कुटुंब – समाज म्हणजे सुद्धा एका अर्थाने भेळच  आहे. वेगवेगळी माणसे, वेगवेगळ्या स्वभावाची – आवडी निवडी  असलेली, वेगवेगळ्या पंथाची, शिक्षणाची, वयाची, धर्माची, जातीची, गरीब-श्रीमंत वगैरे. त्यातही स्त्री – पुरुषांचे प्रमाण हा घटक महत्वाचा असतोच. हि वर्गवारी जो पर्यंत प्रमाणात असते –  गुण्या गोविंदाने नांदते तो पर्यंत कुटुंबात – समाजात शांतता असते. ह्यातील प्रमाणात बदल झाला कि समाज अस्वस्थ होतो, भेळेत तिखट चटणी जास्त झाली कि कसा आपला मूड बदलतो, त्याप्रमाणेच हा बदल होत असतो.

आपल्या आयुष्याचे सुद्धा असेच आहे. आयुष्यात सुख, दु:ख, राग, लोभ, हेवेदावे, मत्सर, स्पर्धा, हव्यास जोपर्यंत प्रमाणात आहेत  तो पर्यंत दिवस बरे असतात. पण हे प्रमाण बिघडले आणि आपण स्वत:ला वेळेवर सावरले नाही तर आपले आयुष्य मांजा कापलेल्या पतंगासारखे होते.
मित्रानो, भेळ  खाता खाता मी विचारात भलताच वाहवत गेलो. मी भानावर आलो तेव्हा  अजून भेळ हवी आहे का म्हणून बायको विचारात होती. मी मानेनेच हो म्हणालो कारण तोंडात  भेळेचा घास होता. बायको प्रसन्न हसली. बायकोच्या हसण्याचे एकदा चिंतन करावे लागेल , हे मात्र नक्की. 🙂

सुधीर वैद्य
२१-११-२०१४
Advertisements

0 Responses to “३७८) भेळ – चिंतन”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

November 2014
M T W T F S S
« Oct   Dec »
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: