३७६) फटाके फोडण्याचा आनंद आणि त्याची व्याप्ती:

376) Diwali-Crackers
३७६) फटाके फोडण्याचा आनंद आणि त्याची व्याप्ती:

आमच्या गावात एकच शाळा आहे. शाळेत मुलेही भरपूर आहेत. दिवाळीची सुटी  लागायच्या आदल्यादिवशी देणगी देण्यासाठी मी शाळेत गेलो होतो. काम आटोपून  निघालो तेव्हा  एका वर्गातून चर्चा रंगल्याचा आवाज आला, म्हणून थबकलो.

वर्गात गुरुजी सांगत होते कि ह्यावर्षी फटाके फोडू नका. प्रदूषण होते वगैरे. बऱ्याच  विद्यार्थ्यांनी फटाके न फोडण्याचे कबुल केले व बचत केलेल्या पैशातून गरीब मुलांसाठी खाऊ – पुस्तके आणण्याचे ठरविले. परंतु एका मुलाला  हा प्रस्ताव मान्य नव्हता.

तो म्हणाला कि सर आपण म्हणता ते मला मान्य आह. पण तरीही मी फटाके फोडणार, कारण मला आनंद मिळतो. ह्या प्रश्नांच्या दुसऱ्या  बाजूचा कोणीच विचार करत नाही.

आवाज करून तुला आनंद मिळतो. आवाजाचा इतर लोकांना किती त्रास होतो ह्याची तुला कल्पना आहे का ? .

सर, मला पूर्ण कल्पना आहे. फटाक्याचे आवाज ३-४ दिवसच असतात. पण देशाच्या  सीमेवरील रहिवासी रोजच बंदुकींच्या गोळ्यांचे आवाज सहन करतात. गावातील – देशातील  लोकानी त्यांचा कधी विचार केला आहे का ? जीव मुठीत धरून ते कसे जगतात? ह्याचे भान ह्या लोकांना देण्यासाठी मी फटाके फोडतो.

अरे पण फटाके बनविण्यासाठी बाल मजुरांना काम करावे लागते. कायद्याने हा गुन्हा आहे.

सर हे मला माहित आहे. हे बिचारे बाल मजूर काम करतात व संसाराला हातभार लावतात. गरिबीमुळे त्यांना हे करावे लागते. पण स्वातंत्र्य मिळून एव्हडी वर्षे झाल्यानंतर सुद्धा हि परिस्थिती का ? ह्याचा विचार कोण करणार?

सर, आपल्या गावात एकतरी बाल मजूर आहे का? सगळी लहान मुले शाळेत येतात. कारण माहित आहे तुम्हाला? कदाचित नसेल, कारण तुम्ही ह्या शाळेत  नवीनच रुजू झाला आहात. माझे वडील ह्या गावाचे सरपंच आहेत. त्यांचा कटाक्ष असतो कि प्रत्येक मुलाने शाळेत गेले पाहिजे. गावाचा त्यांनी प्रयत्न पूर्वक विकास केला आहे त्यामुळे मोठ्यांच्या हाताला काम आहे व मुले शिकत आहेत. असा प्रयत्न प्रत्येक  राजकीय नेत्यांनी केला असता तर हि परिस्थिती आली नसती.

अरे पण फटक्यांमुळे कचरा होतो, त्याचे काय ?
सर, मला हा आरोप मान्य आहे. पण मग आपले कर्तव्य काय? फटाक्याचा कचरा मी उचलतो आणि मगच घरी जातो. आज आपण कचरेवाले आहोत आणि सफाई कामगार हा कचरा साफ करणारा सेवा कर्मी आहे. हि दृष्टी लोकांना देण्यासाठी मी फटाके फोडतो व फटाक्याचा कचरा गोळा करतो आणि मगच घरी जातो, जेणेकरून माझ्या ह्या वागणुकीतून इतरांना स्फूर्ती मिळेल.

फटाक्यांच्या धंद्यावर अनेक लोक अवलंबून आहेत. फटाके विकत घेऊन त्यांचे पोट भरायला मी थोडीफार मदत करत आहे.

सर म्हणाले कि मला तुझी बाजू मान्य आहे तरीही फटके फोडणे हा काही दुसऱ्या  बाजूवर उपाय नाही. मला तुझ्या वडिलांशी बोलावे लागेल.

सर , नक्की बोला. पण मला खात्री आहे कि वडील मला ओरडणार नाहीत. उलट ते माझे अभिनंदन करतील. त्यांची शिकवण आहे कि जे मनात असेल ते ओठावर आले पाहिजे. मनात एक, बोलायचे एक असे त्यांना मंजूर नाही. प्रत्येक परिस्थितीचा साकल्याने उलट बाजूने विचार केल्याशिवाय, समस्येचे निराकरण करता येत नाही. मला मान्य आहे कि फटाक्याच्या आवाजाने त्रास होतो, पण ह्या प्रश्नाची दुसरी बाजू कोण समजून घेणार?
मुलांनी आणि खुद्द सरांनी सुद्धा टाळ्यांचा गजर केला. हे विचार ऐकून मी सुद्धा आनंदात परत फिरलो. माझी देणगी सार्थकी लागेल ह्याचे मला समाधान वाटले. त्याच आनंदाच्या भरात मी दिवाळी पूर्वीच मिठाई विकत घेऊन घरी गेलो. आवडती मिठाई बघून बायकोला सुद्धा आनंद झाला.

अशी हि फटाके फोडण्यातील आनंदाची गोष्ट आणि तिची व्याप्ती. ……….
ता. क .
कथा काल्पनिक आहे. वास्तवाशी ह्याचा संबंध जुळला तर तो योगायोग समजावा हि विनंती. कोणावरही टीका करण्याचा माझा हेतू नाही आणि तसा अधिकारसुद्धा मला नाही. फक्त फटाक्याची दुसरी बाजू आणि वास्तव नजरेसमोर यावे ह्यासाठीच ह्या लेखाचे प्रयोजन.

सुधीर वैद्य

२५-१०-२०१४

70 Million Advertisements displayed. Is yours there?
www.safentrixads.com



Advertisements

0 Responses to “३७६) फटाके फोडण्याचा आनंद आणि त्याची व्याप्ती:”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

November 2014
M T W T F S S
« Oct   Dec »
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: