३७५) भाऊबीज . ……एक चिंतन

375) Photo3487
३७५) भाऊबीज . ……एक चिंतन

काही महिन्यापूर्वी नारळी पोर्णिमा आणि रक्षाबंधन झाले. लहानपणी आमच्या घरी हा सण  कधीच साजरा झाला नाही. मला मोठी बहिण आहे. ती माझ्यापेक्षा ११ वर्षांनी मोठी आहे. रक्षाबंधनाचा सण  आमच्या कुटुंबाला कधीच साजरा करावासा वाटला नाही. कारण माहित नाही. मोठे झाल्यावर सुद्धा आम्ही हा सण साजरा केला नाही. 🙂 असो. असे असताना सुद्धा आम्हा सर्व भावां – बहिणीचे संबंध उत्तम आहेत.

आज भाऊबीज आहे. ह्या दिवशी भाऊ बहिणीकडे जातो.  बहिण त्याचे औक्षण करते. भाऊ बहिणीचे रक्षण करण्यासाठी तत्पर असतो. वगैरे वगैरे …. भाऊ बहिणीला मिठाई – भेट वस्तू देतो. पाहुणचार घेतो. वगैरे वगैरे. असो.
भाऊबीज (त्याच दिवशी) साजरे करणाऱ्या सगळ्याच भावा – बहिणी मध्ये खऱ्या प्रेमाचे – जिव्हाळ्याचे संबंध असतात का?

 भाऊबीज (त्याच दिवशी) साजरे न करणाऱ्या सगळ्याच भावा – बहिणी मध्ये प्रेमाचे – जिव्हाळ्याचे संबंध नसतात का?

मित्रानो तुम्हाला काय वाटते ? तुमचा काय अनुभव आहे ? मनाची कवाडे उघडी ठेवून उत्तर द्या.

जर एकमेकांची मने जुळली असतील तर नातेसंबंध टिकविण्यासाठी बाह्य उपचारांची गरज नसते असे माझे मत आहे .

अनेक वर्षे आम्ही सर्व भाऊ ताईच्या घरी भाऊबीजे साठी जात होतो. काही वेळा भाऊबीज भावाकडे साजरी होत असे. संसारात पडल्यानंतर सुद्धा हा उपक्रम चालू होता. पुढे काही काळाने, काही परिस्थितीमुळे हा उपक्रम बंद झाला. मोठा भाऊही काही वर्षापूर्वी वारला. दुसरा भाऊ व मी, आपापल्या सोई नुसार वेगवेगळे जाऊन येतो. बहिण माझ्यापेक्षा ११ वर्षे मोठी. तिलाही एकटीला उरकत नाही. आमचे जावई (बहिणीचे यजमान ) काल  ८३ वर्षांचे झाले. त्यांचीही जबाबदारी असते. असो.

आज धर्मातील यम तत्व मागे पडले आहे आणि नियम म्हणजेच धर्म अशी समजूत झाली आहे. नियमा मागील तत्व आणि खरा अर्थ  समजून घेण्याचा कोणी प्रयत्न करत नाही असे मला वाटते.

कोणाच्याही भावना दुखविण्याचा माझा हेतू नाही. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.

सुधीर वैद्य
२५-१०-२०१४
Advertisements

0 Responses to “३७५) भाऊबीज . ……एक चिंतन”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

November 2014
M T W T F S S
« Oct   Dec »
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: