३७३) मनोगत – फेसबुक मित्रांबरोबर

10-1173842_224063144466579_1395133850_n
३७३) मनोगत – फेसबुक मित्रांबरोबर

काही फेसबुक मित्रांना, ब्लॉग – संकेत स्थळ follow करणारे वाचक वगैरे मंडळीना मला भेटावेसे वाटते. माझ्याशी फोनवर बोलावेसे वाटते. माझी profile blank असल्यामुळे त्यांचा नाईलाज होतो. ह्या भावनेचा मी आदर करतो. पण तुम्हाला खरे वाटणार नाही, पण आज एक सत्य सांगतोच.

१९९६ सालापासून (वय ४५ वर्षे) मी वानप्रस्थाश्रम स्वीकारला आहे. संसारात राहून वानप्रस्थाश्रम हि कठीण गोष्ट मी साध्य केली आहे.  🙂

१९९६ सालापासून मी कोणत्याही समारंभाला हजर राहत नाही. माझी बायको हे काम आनंदाने करते. मी फक्त email, Facebook, पत्र ह्याद्वारे अनेक नातेवाईकांच्या – लोकांच्या संपर्कात राहतो. १९९६ सालापासून मजेसाठी प्रवास करणे सोडले आहे.  त्यानंतर व्यवसायासाठी आणि गावाला जाणे एव्हडाच प्रवास मी करू लागलो. अगदी जवळच्या नातेवाईकांना (भाऊ आणि बहिण) वर्षातून एकदा प्रत्यक्ष भेटण्याचा प्रयत्न करतो. माझ्यापेक्षा १० वर्षाहून मोठ्या बहिणीला मी माहेरपणासाठी बोलावतो. माझा मोठा भाऊ आणि वहिनी  त्यांच्या  मुलीकडे आले  कि मला न विसरता भेटून जातात.

मुलगा-सून-मुलगी-जावई -नातवंड नियमितपणे भेटायला येतात. कधीतरी मी सुद्धा त्यांच्याकडे जातो. ह्या सर्वांशी वेळोवेळी फोनवर बोलणे – गप्पा चालू असतात.

मला जेमतेम ३ अगदी खास असे मित्र होते. काही वर्षापूर्वी ते देवाघरी गेले. त्यातील दोन मित्र तर माझ्यापेक्षा १० वर्षाहून मोठे होते. एक मित्र माझ्या वयाचा होता. त्याची माझी दोस्ती ५ व्या इयत्तेपासून होती. आम्ही दोघेही CA झालो, एकाच सहनिवासात राहिलो, एकत्र व्यवसाय केला. परंतु हा माझा सगळ्यात जिवाभावाचा मित्र जयंत २००८ साली वारला. 😦 असो .

मी लहानपणापासून स्वत:च्यात रमणारा माणूस आहे. मला दुसऱ्या  माणसाची कंपनी – सहवास लागतोच असे नाही. माझा वेळ मी मजेत घालवितो. व्यवसायात, छंदात आणि माझ्या लहान सहान सामाजिक सेवेत मी लोकांच्यात रमतो. आता व्यवसाय हि सोडला. परंतु ३ वर्षे कशी गेली हे कळलेच नाही.

मी  लहानपणापासून introvert आहे. मला वैयक्तिक पातळीवर ओळखी करायला फारसे आवडत नाही. परंतु नोकरी – व्यवसाय असताना ओळखी केल्या -झाल्या. पण मी ह्या ओळखी official पातळीवरच ठेवल्या.

आता ह्या वयात आभासी दुनियेतील ओळखी वैयक्तिक पातळीवर वाढविणे (भेटून, बोलून वगैरे) माझ्या तत्वात बसत नाही. त्यामुळेच माझी profile माझ्या संकेत स्थळावर – फेसबुकवर कोरी आहे. फोटो सुद्धा अपलोड केला नाही. माझे लिखाण हीच माझी ओळख. 🙂

सध्या माझा बराच वेळ लिखाणात, वाचनात, फिरणे, फोटोग्राफी, जेष्ठ नागरिकांबरोबर संवाद साधणे  – त्यांना धीर देणे – मदत करणे, वैद्यकीय अभ्यास करणे, ज्योतिष शास्त्राचे  वाचन वगैरे गोष्टीत कसा जातो हेच मला समजत  नाही.  असो.

कृपया गैरसमज करून घेऊ नये. आपली फेसबुक मैत्री अखंड राहो हीच इच्छा.

सुधीर वैद्य
२४-१०-२०१४

70 Million Advertisements displayed. Is yours there?
www.safentrixads.com


Advertisements

0 Responses to “३७३) मनोगत – फेसबुक मित्रांबरोबर”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

November 2014
M T W T F S S
« Oct   Dec »
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: