३६८) स्पंदने – कौटुंबिक सल्लागाराचे अनुभव कथन

P1050215        10731174_831930173494566_4607728193225555396_n
३६८) स्पंदने – कौटुंबिक सल्लागाराचे अनुभव कथन

ह्या घडीला मागे वळून बघताना असे वाटते कि सल्ला देण्याचा वारसा मला वडिलांकडून मिळाला आहे. माझे आणि वडिलांचे खूप जिव्हाळ्याचे संबंध होते. मला त्यांचा सहवास फक्त १८ वर्षे मिळाला. मी खूप गोष्टी त्यांच्याकडून शिकलो. एखाद्या गोष्टीचा सर्व बाजूने  कसा विचार करावा हे मी त्यांच्याकडून आत्मसात  केले.  पुढे अति उच्च शिक्षण पूर्ण करून मी व्यावसाईक सल्लागार झालो, त्यावेळी ह्या लहानपणी शिकलेल्या गोष्टींचा मला खूप उपयोग झाला.

हिशेब तपासणीचे काम करताना आढळलेल्या त्रुटीचा अभ्यास करून मी माझ्या अहवालात उपाय योजनाही सुचवत असे.

CA, Insurance Survey, Management Consultant चा व्यवसाय सांभाळून, Counselling चे काम हि करत होतो. ज्येष्ठ नागरिकांच्या, तरुणांच्या  छोट्या, मोठ्या  खाजगी –  कौटुंबिक Problem चा गुंता सोडवत होतो. आजही हे काम गेल्या कित्येक वर्षापासून चालू आहे. Counselling चे काम करताना मी ज्योतिषशास्त्राचा आणि पर्यायी वैद्यक शाखेच्या अभ्यासाचा उपयोग करतो.  तसेच body language , handwriting interpretation चाही काही वेळा उपयोग करतो.

१९८७ साली ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला. आजहि अभ्यास चालू आहे. माझ्या आयुष्यातील प्रश्नांची उत्तरे शोधली. (माझ्या लहानपणी कोणताही ज्योतिषी ह्या प्रश्नांवर उजेड पाडू शकला नव्हता. )  सध्या वैद्यकीय ज्योतिष शास्त्राचा अभ्यास चालू आहे.

१९९७ साली पर्यायी वैद्यक शाखेचा अभ्यास केला व १९९८ पासून नियमितपणे Society तील लोकांचे  BP  & Pathological Reports  तपासू लागलो.  (विना मोबदला) आजारी माणसाला वैद्यकीय सल्ला व  धीर देऊ लागलो. म्हाताऱ्या लोकांसाठी वेळ काढू लागलो. बरेच ज्येष्ठ नागरिक माझ्याकडे येऊन मन मोकळे करतात. नाहीतरी त्यांचे ऐकायला घराच्या मंडळीना वेळ कोठे असतो? हे व्रत आजतागायत चालू आहे.
गरजवंताला मानसिक आधार देणे हा समाजापुढील गंभीर प्रश्न आहे. प्रत्येकानेच आपल्या हातून होईल ती सर्व मदत अश्या अभागी जीवाला दिली पाहिजे. प्रौढी म्हणून सांगत नाही, पण मी १९९८ सालापासून समुपदेशनाचे काम सहनिवासातील मुले -मुली – जेष्ठ नागरिक, सुना – सासवा ह्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी करत आहे. माझ्या लेखनात काही अनुभव मी share केले आहेत.

कौटुंबिक सल्लागार म्हणून मी कोणतेही प्रशिक्षण  घेतले नाहीये. पण वस्तुनिष्ठ विचार करण्याची पद्धत आत्मसात केल्यामुळे मी हे काम आवडीने करू लागलो.
…. विना मोबदला.

माझ्या अनेक लेखात आयुष्याबद्दलचे विचार शब्दबद्ध होतात. समस्येकडे कसे बघितले पाहिजे – कसा विचार केला पाहिजे वगैरे गोष्टींचे मार्गदर्शन सुद्धा असते. माझ्या संकेत स्थळावर आणि ब्लॉग  वर हे लेख उपलब्द्ध आहेत. तसेच संकेत स्थळावर आणि ब्लॉग वर Life Philosophy असा section आहे, ज्यात अनेक बोधप्रत पोस्ट अपलोड केल्या आहेत. ह्या लिखाणाचा फायदा कदाचित तुम्हाला सुद्धा होऊ शकेल?

सुधीर वैद्य

२४-१०-२०१४
ता. क.
एक अनुभव सांगण्यासारखा आहे. एका माणसाचा मला फोन आला. माझ्या आत्येपुतण्याचा तो मित्र होता. त्याची ८  वीत शिकणारी मुलगी खूप depressed झाली होती. मी तिच्याबद्दल जुजबी माहिती विचारली आणि त्यानंतर फोन वर त्या मुलीबरोबर ३० मिनिटे संवाद साधला. मित्र चकित झाला कि आई – वडिलांशी बोलायला नकार देणारी मुलगी माझ्याबरोबर ३० मिनिटे कशी बोलली. मी फक्त ऐकण्याचे काम केले. तिचे काही मुद्दे बरोबर होते. काही चूक होते. हे सर्व तिला व वडिलांना समजावून सांगितले. त्यांनतर दर महिन्याला मी फोन करत असे. flower remedy सुचवली. त्या मुलीची मानसिक स्थिती चांगली झाली. आज ती मुलगी Architecture च्या तिसऱ्या वर्षाला आहे . सगळ्यात मोठी   गंमत म्हणजे आजपर्यंत मी त्या मित्राला आणि त्याच्या मुलीला भेटलो नाहीये. हा मित्र माझ्या नेहमी संपर्कात असतो आणि कोणतीही समस्या – तब्बेतीची – संसाराची माझ्या बरोबर share करतो आणि सल्ला विचारतो.

70 Million Advertisements displayed. Is yours there?
www.safentrixads.com


Advertisements

0 Responses to “३६८) स्पंदने – कौटुंबिक सल्लागाराचे अनुभव कथन”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

November 2014
M T W T F S S
« Oct   Dec »
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: