३६७) स्पंदने आणि कवडसे – भाग ७

252) Spandane & Kavadase

३६७) स्पंदने आणि कवडसे – भाग ७

स्पंदने म्हणजे vibrations, मनातील कंपने. आपल्या मनात अनेक विचार येत असतात. काही विचार मनात घर करतात. वाचताना – दुसऱ्याशी  बोलताना हि विचार धारा सुरु होते आणि काही काळ मनात हि विचारांची कंपने जाणवत राहतात. काही वेळा हि मनातील विचारांची कंपने उन्हाच्या कवडश्यासारखी शब्दरूप धारण करतात. अशीच काही मनातील विचारांची कंपने आणि कवडसे भाग ७ आपल्या समोर सादर करत आहे.

————————————————————————————————-

गैरसमज नातेसंबंध जास्त बळकट करतात किंवा जास्तच बिघडवतात. गैरसमजातून जरी नातेसंबंध परत जुळले तरी, मनात सल – व्रण राहतोच, असा माझा अनुभव आणि निरीक्षण आहे.

———————————————————————————————
आयुष्य

आपले आयुष्य म्हणजे एखाद्या वहीसारखे  असते. जन्माच्या वेळी देव आपल्याला एक कोरी वही देतो. पहिल्या पानावर आपली जन्म तारीख – वेळ – कुटुंबीय यांची माहिती लिहिलेली  असते.  शेवटच्या पानावर आपल्या मृत्यूची बातमी अदृश्य शाईने लिहिलेली असते. मधली पाने कोरी असतात. ह्या पानावर आपण लिहिणे अपेक्षित असते.

जन्म आपल्या हातात नसतो पण जगणे आपल्या हातात असते. कर्मावर विश्वास ठेवून ध्येयाकडे वाटचाल केली तर यश मिळवता येते.

———————————————————————————————–
माणूस हा जन्मजात वाईट असत नाही. पण मोठे होण्याच्या काळात त्याच्यावर जे काही संस्कार घरातून – बाहेरून होतात, त्यामुळे अनेक माणसांचे अंतरंग बिघडून जाते.

असे म्हणता येईल कि माणूस म्हणजे जन्माला येतो तेव्हा तीळासारखा असतो. साखरेचा पाक थोडा थोडा घालून मंद अग्नीवर  आच दिल्यानंतर मस्त असा हलवा तयार होतो.

पण पण …. साखरेच्या पाकात गडबड झाली (जात -पात -धर्म – आर्थिक विषमता – उच्च -नीच भेदभाव, निरर्थक मताचे राजकारण, EGO वगैरे ) तर मात्र तयार होणारा माणूस हा काही हलव्यासारखा गोड असणार नाही. ह्या तिळावर फुलणारे काटे हे मात्र दुसऱ्याला  टोचणारे असतील ह्यात शंका नाही .

मूळ स्वरूप निर्मळ असणाऱ्या मनुष्य जातीचा हा भोग आहे. पण आशेवर तर जग  चालते. 🙂
———————————————————————————————
रंग मनाचा , रंग रंगाचा , रंग अंतरंगाचा , रंग शरीराचा , रंग घराचा , रंग वागणुकीचा ,  रंगात रंगला .
—————————————————————————————

डॉ. औषध देतो, देव बरे करतो.

—————————————————————————————-

पदाची किंमत (पगारा व्यतिरिक्त ) वसूल केली जाते तेव्हा भ्रष्टाचार होतो.

———————————————————————————————–
इतिहास आपल्याला खूप काही शिकवतो. राज्यकर्ते स्वत:च्या सोयीचे तेव्हडे अनुकरण करतात हे आपले दुर्भाग्य आहे.
——————————————————————————-
आयुष्यात किती परीक्षा दिल्या याची मोजदाद नाही. कोणत्याही परीक्षेची काळजी वाटली नाही. देव तर आयुष्यभर परीक्षाच घेत राहिला. शेवटी त्याचे ‘ Question  paper ‘ च संपले. 🙂
——————————————————————————
Look at the + tive side. लग्न केल्यामुळे घरी जेवण मिळते.  🙂
——————————————————————————————६ दिवस कामाचे आणि रविवार आराम करून ताजेतवाने होण्यासाठी. रविवार एकच  आहे ना म्हणजे आठवड्यातील ७ दिवसात अल्पसंख्यांक. मग धमाल का नाही येणार ?
———————————————————————————————-
ATTITUDE may be OK. But what about संयम? प्रेमात त्याग आणि संयम असणे गरजेचे आहे असे मला वाटते.
————————————————————————————————आज प्रत्येक गोष्टीचे अवमूल्यन होत आहे. तोच नियम कोणत्याही सणासाठी . खेदाने हि परिस्थिती पाहणे एव्हडेच सध्या आपल्या हातात आहे. पण हेही दिवस जातील अशी आशा करूया.
—————————————————————————–
नम्रतेचा गैरफायदा घेतला जातो हे वास्तव आहे, अगदी घरापासून ते कचेरी, समाजापर्यंत.
————————————————————————————
आपल्या आयुष्यात काही प्रसंग घडून गेल्यानंतर मनाला चुटपूट लागते.  काही करणे आवश्यक असते, पण आपल्या हातून ते घडत नाही. मला वाटते की हे क्षण निसटण्याचे  कारण म्हणजे त्या क्षणी आपल्या मनाचा होणारा अंतर्गत झगडा. एक सोपा उपाय मी बरेच वेळा करतो. एखाद्या गोष्टीवर मनात येणारा पहिला विचार अमलात आणतो. कधी असे केले नाही आणि त्या गोष्टीचा सर्व बाजूने खल केला तरी कित्येक वेळा आपल्या पहिला  विचारच प्रबळ ठरतो.
————————————————————————-

कष्टाशिवाय काहीच मिळत नाही. जे कष्टाशिवाय मिळते, त्याची किंमत माणसाला कळत नाही आणि तो वाममार्गाला जाण्याची शक्यता असते.  आपण जो एक कप चहा पितो, त्यासाठी लागणारे पदार्थ म्हणजे पाणी, दुध, साखर, चहा. ह्यातील प्रत्येक वस्तू तयार करण्यासाठी किती लोक घाम गाळतात, याचे भान जरी आपण ठेवले तरी आपले पाय जमिनीवर राहू शकतील. मित्रानो, तुम्हाला काय वाटते? 🙂

————————————————————————————————–

आजच्या जगात जर प्रत्येकाने E N  T (Ear) (Nose) (Throat)  ह्या शब्दांचा  खरा अर्थ समजून घेतला तर एकोप्याचे संबंध ठेवणे  शक्य आहे. बघा विचार करून.

E लोकांचे बोलणे शांतपणे ऐकुन

N ह्या बोलण्याला कसला वास यात नाही ना हे पारखून
T आपले मत गोड बोलून देणे.
—————————————————————-

आजही ६४ वर्षानंतर बालपणीचे ठसे मी पुसू शकलो नाहीये.  कोणते ठसे आपण बालमनावर उमटवत आहोत ह्याचे भान मोठ्यांनी ठेवणे गरजेचे आहे असे मला वाटते.

माझ्या अनुभवावरून, दुसऱ्याच्या मनावर चांगलेच ठसे उमटवायचा मी प्रयत्न केला आहे.  ————————————————————————-
Power cut झाला किवा इंटरनेट connection चालू नसेल की virtual प्रेमाची – मैत्रीची समाप्ती. 🙂 हा हा हो हो हु हु हि हि
———————————————————-

जिंकण्यात सुद्धा भविष्यातील हार असते आणि हरण्यात सुद्धा उद्याचे जिंकणे असते.
————————————————————————-

देवाने दिलेल्या चार दिवसातील दोन दिवस कसे जगावे हे ठरविण्यात आणि दोन दिवस वाट बघण्यात फुकट गेले तर आयुष्याचा काय उपयोग ? प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस असे समजून कर्तव्य पार पाडा आणि मजा  करा. 🙂
————————————————————————————–

जगणं जगणं म्हणजे काय असतं? जगणं जगणं म्हणजे आपलं ज्ञान, माहिती, अनुभव share करणं असतं.
————————————————————————————
मानलेली नाती:

आयुष्यातील मोकळ्या जागा (नाती) भरण्यासाठी मानलेली नाती तयार होतात . अर्थात असे होणे – न होणे हे व्यक्तीसापेक्ष आहे . जर दोन्ही बाजूने मोकळ्या जागा (नाती) असतील तर हि मानलेली नाती घट्ट होतात. नाहीतर कालांतरे त्यातील स्नेह – ओढ  कमी होते. नात्याच्या दोन्ही तीरावर एकाच समान पातळीवरील (आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक वगैरे) माणसे असतील तर नाती टिकतात, कारण त्यांच्यात inferiority complex निर्माण होण्याची शक्यता कमी असते.
——————————————————————————

स्मार्ट फोन वापरणारे सगळेच स्मार्ट असतात का ?
स्मार्ट फोन न वापरणारे सगळेच बावळट असतात का ?

माणसाचा स्मार्टनेस नेमका कशावर अवलंबून असतो?
कधीतरी चिंतन केले पाहिजे ह्या स्मार्टपणावर. 🙂
———————————————————————–

सुधीर वैद्य

२४-१०-२०१४
Advertisements

0 Responses to “३६७) स्पंदने आणि कवडसे – भाग ७”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

November 2014
M T W T F S S
« Oct   Dec »
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: