११८) चार चौघी दिवाळी २०१४ / संपादिका रोहिणी हट्टंगडी

char choghi 2014

११८) चार चौघी दिवाळी २०१४ / संपादिका रोहिणी हट्टंगडी

ह्या अंकाने २१ व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. अंक नेहमी प्रमाणेच दर्जेदार आहे.

ह्या अंकातील परिसंवाद (स्वभावाला औषध आहे ) मात्र वाचलाच पाहिजे. दोन मान्यवरांनी सर्व बाजूने  ह्या प्रश्नाचा उहापोह केला आहे. कुटुंबातील प्रत्येक स्त्रीने आणि पुरुषाने हे लेख वाचणे आवश्यक आहे .

आपण  नेहमी स्वभावाला औषध नाही असे म्हणतो, ह्याचे कारण आपण समोरच्याला नेमके ओळखलेले नसते. आपले काही अनुभव , पूर्वग्रह ह्यांच्या आधारे आपण अश्या विक्षिप्त माणसाला टाळायला लागतो.  हे लेख वाचल्यानंतर अश्या माणसाना ओळखणे सोपे जाईल असे मला वाटते. अश्या माणसांचे नेमके स्वभाव वर्णन आणि आपण कसे वागले पाहिजे ह्याचे मार्गदर्शन केले आहे.

अशी माणसे नेमकी कशी ओळखायची ह्यासाठी एका लेखात जंत्री दिली आहे. मान्यवरांनी एका अर्थाने आपल्या समोर आरसा धरला आहे. प्रत्येकाने आरश्यात डोकावून बघायला हरकत नाही कारण दुसऱ्या कोणाला सुद्धा आपण विक्षिप्त वाटत असू?

अंकात कथा सुद्धा आहेत. मी दिवाळी अंकातील कथा वाचत नाही, परंतु ह्या अकातील काही कथा मी वाचल्या. सर्व कथा महिलांच्या वेगवेगळ्या वयाच्या, आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरील आणि समस्येवरील आहेत. ह्या कथांमधून काय अर्थबोध महिलांनी घेतला पाहिजे ह्याचे उत्तम मार्गदर्शन नकळतपणे मिळाले आहे.

ह्या अंकात आपल्या फेसबुक मित्र परिवारातील मैत्रीण मोहना कारखानीस ह्यांची एक कथा आहे. संसारसुख म्हणजे नेमके काय ? ह्या प्रश्नाचे  उत्तर मिळण्यासाठी हि कथा नक्की वाचा.

सुधीर वैद्य
१५-११-२०१४
Advertisements

0 Responses to “११८) चार चौघी दिवाळी २०१४ / संपादिका रोहिणी हट्टंगडी”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

November 2014
M T W T F S S
« Oct   Dec »
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: