३६३) सुटलो एकदाचा आणि अंकगणित

362) Voting
३६३) सुटलो एकदाचा आणि अंकगणित

निवडणूक आली आणि गेली !!!!

दर एक – दोन वर्षांनी कोणतीतरी निवडणूक येते आणि जाते….

प्रचाराचा – आरोप – प्रत्यारोपाचा धुरळा मात्र उडवते ……

आणि मतदाराला श्वसनाचा विकार देऊन जाते. 😦

आश्वासनांची खैरात करते~~~~

पण गेल्या  निवडणुकीत दिलेली आश्वासने विसरूनच जाते.

कधीतरी राजकारणात वादळ येते — कधी पाऊस  पाडते तर कधी दुष्काळ . 😦

निवडणुकीच्या काळात सामान्य माणसांची करमणूक होते…

जाहिरातदार, Media , इतर सेवा देणारे, सामान्य कार्यकर्ता यांना पैसा देऊन जाते.

पेरले कि उगवते.

निवडणुकीत केलेला खर्च चांगला परतावा देते.

निवडणुकीत कोणी हरतो – कोणी जिंकतो ….

पण निवडणुकीत हरुन सुद्धा विजयाचा आनंद घेता  येतो …
कारण तुमच्या हरण्याने तुमचा शत्रू पण हरलेला असतो.

जिंकणारा परत हरणाऱ्या उमेदवाराशी हात मिळवणी करतो.

निकाल लागतो …. उमेदवारांचा आणि मतदारांच्या अपेक्षांचा.
काळ कोणासाठी थांबत नाही !!!

बघता  बघता सरकारचा कार्यकाळ  संपतो.
मतदानाचा हक्क मिळालेल्या पहिल्या निवडणुकीतील काही आश्वासने
म्हातारपणा पर्यंत अपूर्ण राहतात ….
कारण नेत्यांना माहित असते कि मतदारांची आठवण  कमजोर आहे.

१३-१०-२०१४ ला वाटले  एकदाचा सुटलो, 🙂

पण ४८ तासात परत अडकलो. 😦

उपाय म्हणून अंक गणिताचे पुस्तक काढले आणि

बेरीज – वजाबाकीची गणिते सोडवत राहिलो.

समाधानकारक उत्तर  काही मिळेना, मग

उत्तर बघून प्रश्न बनवीत राहिलो.

अजून ४८ तासानी उत्तर मिळेल सुद्धा

पण मनाची बेरीज परत होईल केव्हा?

तलवार – बाणांनी घायाळ मनाच्या जखमा भरतील,

पण व्रण मात्र मागे सोडून जातील. 😦

राजकारणात काहीच स्थिर नसते,
शत्रू मित्र होतो आणि एक क्षणात मित्र शत्रू बनतो.

हार-जीतचा सिलसिला चालूच राहतो.
जाहीनामा पुस्तकातच विसावतो.
परिस्थिती बदलेल ह्या आशेवर आला दिवस ढकलत राहायचे

कालची परिस्थिती बरी होती म्हणत मनाला उभारी आणायची
आणि उद्याची परिस्थिती ह्याहून वाईट होऊ नये म्हणून काळजी करायची.  😦

सुधीर वैद्य

१७-१०-२०१४
Advertisements

0 Responses to “३६३) सुटलो एकदाचा आणि अंकगणित”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

November 2014
M T W T F S S
« Oct   Dec »
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: