३६२) १५-१०-२०१४ – विधान सभा मतदान

362) Voting
३६२) १५-१०-२०१४ – विधान सभा मतदान

आज सकाळी (१५-१०-२०१४) फिरून येताना मतदान करून आलो. खूप गर्दी होती. मी मतदान केंद्रावर सकाळी ६.५० ला पोचलो, पण केंद्रावर मतदारांची गर्दी उसळली होती. त्यामुळे सातवा नंबर लागला. अंदाजे १०० हून अधिक मतदार Q मध्ये उभे होते. त्यातील बहुसंख्य जेष्ठ नागरिक होते. २४-०४-२०१४ रोजी लोकसभा निवडणुकीला मतदानासाठी माझा पहिला नंबर लागला होता.

आमच्या केंद्रावर अंदाजे ९० % मतदान होते असा अनुभव आहे, त्यामुळे दिवसभर रांग  संपत नाही.

ह्यानंतर मला मतदान करावे लागू नये अशी देवाकडे प्रार्थना आहे. मला मतदानाचा अधिकार वयाच्या २१ व्या वर्षी मिळाला. त्यावेळी मी CA चा अभ्यास करत होतो .

लोकसभेसाठी १९७७ साली मी प्रथम मतदान केले. सुरवातीच्या काळात नगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा अशी निवडणूक एकाच वेळी -एकाच दिवशी होत असे. तसे एकदम  मतदान करण्याचा मी अनुभव घेतला आहे. गेले ते दिवस. आता सुरक्षेच्या कारणामुळे संपूर्ण  राज्यात  एका दिवशी मतदान घेणे  अशक्य झाले आहे, पण ह्या वर्षी मात्र दोन राज्यात एकाच दिवशी मतदान आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचे अभिनंदन.

लोकशाही हा शब्द ऐकला कि कॉलेजच्या पहिल्या दिवशी प्राध्यापकाने सांगितलेली व्याख्या आठवते आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ६७ वर्षांनी सुद्धा ती कशी बरोबर आहे  ह्याची प्रचीती येते. अर्थात त्या व्याखेत मी एक अर्थपूर्ण बदल केला आहे. पण जाऊदे तो विषय. आज नको — परत कधीतरी.

मित्रानो, तुम्ही मतदान केले कि नाही ?

आजचा दिवस सर्वाना आनंदाचा, सुखा-समाधानाचा आणि भरभराटीचा जावो….

सुधीर वैद्य

१५-१०-२०१४
Advertisements

0 Responses to “३६२) १५-१०-२०१४ – विधान सभा मतदान”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

November 2014
M T W T F S S
« Oct   Dec »
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: