११६) ‘ पुरुष स्पंदन’ दिवाळी अंक २०१४

Purush Spandane 2014
११६) ‘ पुरुष स्पंदन’ दिवाळी अंक २०१४ / संपादक हरीश सदानी, रवींद्र रुख्मिणी पंढरीनाथ / रुपये १००/- पृष्ठे १९२ 

हा दिवाळी अंक ‘धर्म आणि नातेसंबंध’ ह्या  विषयाला वाहिलेला आहे.आपले आयुष्य हे नातेसंबंधाच्या धाग्याने विणलेले असते.  नातेसंबंध हा खूप गहन विषय आहे. नातेसंबंध का जुळतात, कसे जुळतात, कधी तुटतात, का तुटतात ह्या विषयाचा कितीही अभ्यास केला, तरी नेमके उत्तर मिळेल ह्याची खात्री देता  येत नाही. नात्यांचे गणित सोडविणे हे बरेच वेळा  अवघड असते .

ह्या अंकात धर्म आणि नातेसंबंध, यांची सांगड घालायचा प्रयत्न केला आहे. विशेषत: वेगवेगळ्या धर्मातील स्त्रीपुरुष नाते यांचा वेध घेतला आहे. स्त्री – पुरुष समानतेच्या गोष्टी फक्त केल्या जातात – चर्चा सत्र रंगतात, पण ती चर्चा अंमलात आणण्याची मानसिक तयारी मात्र नसते. 😦

१९९१ सालानंतर खा-उ-जा (खाजगीकरण – उदारीकरण – जागतिकीकरण) चे वारे भारतात वाहू लागले. उद्योग – व्यवसाय – नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या. लोकांच्या हातात पैसा खेळू लागला. मध्यम वर्गाची (नवश्रीमंत ) आर्थिक ताकद वाढली. जीवनमान सुधारले, पण मानसिक अस्थिरता, स्पर्धा , ताण -तणाव ह्यात कमालीची वाढ झाली. काळ्या पैशातही वाढ झाली. भ्रष्टाचारचा  राक्षस वाढू लागला.

त्याच सुमारास धर्मावरून समाजात केंद्रीकरण होऊ लागले. मिडियाची शक्ती उदयास आली. देवाच्या मालिका, सिनेमे, गाणी  ह्याचे market तयार झाले. भक्तीयात्रा हा व्यवसाय उदयास आला. पाप क्षालनासाठी  दानपेटीचा पर्याय देवस्थानांनी उपलब्ध करून दिला. मन:शांतीसाठी कर्मकांडात खूप प्रमाणात वाढ झाली. देवस्थानच्या कारभारात राजकारणी रस घेऊ लागले. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे देव नाही देवळात अशी अवस्था निर्माण झाली.

आजच्या काळात प्रत्येकाचे आयष्य खूप तणावाचे झाले आहे. ह्या  ताणतणावाने  कोणताही भेद भाव न करता सर्वाना ग्रासले आहे. त्यामुळे धर्माचे आकर्षण वाढले आहे हे सत्य नाकारता येत नाही.ह्याच दृष्टीकोनातून धर्माचे विधायक आणि विघातक अशी दोन्ही रूपे उलगडण्याचा प्रत्यत्न ह्या अंकात केला आहे.

देव हा माणसातच लपलेला असतो. त्याची भक्ती केली तरी पुरते. आज धर्मातील यम तत्व मागे पडले आहे आणि नियम म्हणजेच धर्म अशी समजूत झाली आहे. नियमा मागील तत्व आणि खरा अर्थ  समजून घेण्याचा कोणी प्रयत्न करत नाही.

कुटुंब हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.  मानवी संबंधाच्या बाबतीत कुटुंब हा महत्वाचा मुद्दा असतो. माणसा माणसा मधील (स्त्री किवा पुरुष) संबंध घडविण्यात – बिघडवण्यात कुटुंबातील संकेत, मुल्ये आणि संस्कार कारणीभूत असतात.

सर्वच लेख वाचनीय आहेत. लेख वाचून आपल्या विचारांना चालना मिळते. अस्वस्थेची भावना मनात घर करते, कारण धर्म -नातेसंबंध- स्त्रीपुरुष नाते ह्या शब्दांची  विविध रूपे बरेच वेळा आपल्या लक्षातही आलेली नसतात.

मासिकातील पुरुषाने, पुरुषांवर (पुरुषांसाठी ) केलेल्या कविता तर ज्वलंत आहेत.

चित्रकार श्री अनिल दाभाडे ह्यांनी  काढलेल्या मुखपृष्ठाचा आशय  कवितेत मांडला आहे.
तो: प्रधान, ती: प्यादे.
तो: देव, ती: धर्म म्हणून तिच्यासारखाच

धर्मही त्याचा बटिक: वापरला जाणारा.

हे सर्व लेख वाचून आपल्या मनात सह वेदना जागृत झाली, तर ह्या अंकाचा उद्देश सफळ झाला असे म्हणावे लागेल. समाज जीवनाच्या जाणीवा प्रगल्भ करण्यासाठी हा दिवाळी अंक वेळात वेळ काढून नक्की वाचा. तुमचा वेळ सार्थकी लागेल याची खात्री मी देतो.सुधीर वैद्य
३०-१०-२०१४

Advertisements

0 Responses to “११६) ‘ पुरुष स्पंदन’ दिवाळी अंक २०१४”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

October 2014
M T W T F S S
« Jul   Nov »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: