लेख १७ – एक संध्याकाळ – निसर्गाच्या सान्निध्यात :

P1110435

Spandane Photo Gallery :
लेख १७ – 
एक संध्याकाळ – निसर्गाच्या सान्निध्यात :

डिसेंबर २०१३ मधील एक संध्याकाळ.~~~~~~ रात्र जास्त आणि दिवस कमी असा हा महिना. ~~~~~ समुद्राच्या साक्षीने ~~~~ सूर्यास्ताच्या किनाऱ्यावरील झाडांच्या  लांब पसरलेल्या सावल्या ~~~~~ उंच सुरुंच्या पानातून दिसणारे आकाश ~~~~~~ समुद्राला आलेली ओहोटी ~~~~~ उंच सुरुंच्या पानांची सळसळ ~~~~~ पक्षांचे सुमधुर संगीत ~~~~ शांत आळसावलेला समुद्र किनारा ~~~~~समुद्रात विसावलेल्या  मासेमारी बोटी ~~~~ सूर्यास्तापूर्वी हजेरी लावलेला चंद्र ~~~~~~ मावळतीच्या सूर्याचे प्रत्येक क्षणी बदलणारे रूप ~~~~ मस्त गार वारा ~~~~  लांबवर लुकलुकत असलेला दीपस्तंभ ~~~~~ आयुष्याच्या संध्याकाळी मनात दाटलेली विचारांची गर्दी ~~~~ भ्रमणध्वनी वरील साथ देणारी जुनी गाणी ~~~~~
सुख सुख म्हणजे आणखी काय हवे? ~~~~~असे वाटले कि अशा रम्य संध्याकाळी देवाने आपल्याला बोलवावे.  ~~~~ वाटणे आपल्या हातात असते ~~~~~~पण तसे होणे थोडेच आपल्या हातात असते? ~~~~~~असे झाले नाही आणि म्हणूनच हा अनुभव तुमच्याशी share करत आहे.

नकळतपणे मी हात जोडले आणि मावळत्या दिनकराला सांगितले कि मी तुला वंदन करतो. आजचा दिवस सुखाचा गेला. उद्याच्या दिवसाचे गुपित स्वत:कडे ठेवून तू मावळतो आहेस. पण उद्या तुझ्या पहिल्या किरणाचे स्वागत करण्याचे भाग्य आम्हाला लाभू दे. येईल तो दिवस स्वीकारायची मनोभूमिका आम्हाला दे आणि स्व-धर्माचे पालन आमच्या हातून होऊ दे हीच आजची प्रार्थना.

विचारांचा मागोवा घेताना वेळ कसा गेला कळलेच नाही. सुर्य कधीच मावळला होता. रात्र आपले साम्राज्य पसरवत होती. अंधार झाल्यामुळे चंद्राची कळी खुलली होती. मी उठलो आणि जड अंतकरणाने परतलो.

हा Album ची लिंक : https://picasaweb.google.com/118438918093032772576/umCFCH?authuser=0&feat=directlink

सुधीर वैद्य
२२-१२-२०१२

Advertisements

0 Responses to “लेख १७ – एक संध्याकाळ – निसर्गाच्या सान्निध्यात :”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

October 2014
M T W T F S S
« Jul   Nov »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: