३६०) ‘ संध्या छाया भिवविती हृदया ‘ – चिंतन ……

????????????????????????????????????????????????????????????????     360) Old Age - 2 360) Old Age - 3

३६०) ‘ संध्या छाया भिवविती हृदया ‘  – चिंतन ……

आज ०१-१०-२०१४ जेष्ट नागरिक दिवस आहे. त्यानिमित हा लेख. सध्या
जेष्ट नागरिकजेष्ट नागरिकांचे लोकसंख्येतील प्रमाण ८.२ % आहे.
माणसाला मरणाची नेहमी भीती वाटत असते. हे स्वाभाविकपण आहे. खरेतर हि भीती मरणाची असतेच पण त्याहून जास्त भीती असते कि आपण लोळत पडणार का? आपली कोण सेवा करणार.? पत्नी आधी वारली असेल तर हि चिंता पराकोटीची असते. ह्यामुळेच ‘मरण’ हा शब्द उच्चारायला पण माणूस घाबरतो. विनोदाने बोलायचे तर आयुष्यात दोन गोष्टी नक्की आहेत, त्या म्हणजे मरण आणि कर. (Taxation) 🙂

आपले आयुष्य म्हणजे जन्म आणि मृत्यू ह्या मधील प्रवास आहे. ह्या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाहीत. Pascal (तत्ववेत्ता) म्हणतो कि मृत्यू नक्की आहे, फक्त वेळ अनिश्चित आहे. मग मृत्यूबद्दल काळजी करण्यात काय अर्थ आहे?

कै. विनोबा भावेनी आपल्या ‘भगवत गीता ‘ ह्या पुस्तकात मृत्यूबद्दल छान विवेचन केले आहे. माणसाला शांतपणे मरण येण्यासाठी ४ देवतांची कृपा आवश्यक  आहे.

१) Fire / अग्नी म्हणजे काम. माणसाने शेवटपर्यंत कार्यमग्न राहिले पाहिजे.
२) Moon / चंद्र म्हणजे चांगले, क्षमाशील मन असले पाहिजे.
३) Sun  / सूर्य म्हणजे सतत नवीन शिकणे. शिक्षणाचा / अनुभवाचा उपयोग लोकांसाठी करणे.
४) Space  /अवकाश म्हणजे वासना मेली पाहिजे. (detached attitude )

ह्या देवतांची मर्जी संपादन करण्यासाठी तरुण वयातच अभ्यास सुरु करावा लागेल.
हा अभ्यास वाटतो तेव्हडा सोपा नाही. पूजा अर्चा, कर्म कांड एकवेळ निभावता येईल, पण क्षमाशील मन, कार्यमग्नता, सेवेतील आनंद आणि वासनेवर विजय संपादन करणे, खूप कठीण.

माझ्या परीने मी ह्या विषयाचा अभ्यास तरुण वयात केला. कदाचित माझ्या बालपणातून मी हे शिकलो असेन.  खूप पूर्वीच मी ह्या विषयावरील लेख माझ्या संकेत स्थळावर upload  केला आहे. लिंक: http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/Behaviour_Therapy_for_Senior_Citizens.pdf

आजारपणांत लोळत न पडता वेदनारहित मृत्यू आपल्या नशिबात असेल कि  नाही हे आपण सांगू शकत नाही. पण एखादा जीवघेणा आजार झाला तर उगाच उपचार करू नयेत हि इच्छा (Living Will ) आपण  नातेवाईकांना सांगून  ठेवू शकतो.

वृद्धापकाळ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील कसोटीचा कालखंड असतो.
तो पूर्वसुकृतानुसार प्रत्येकाला भोगावाच  लागतो. कोणाचीही ह्या स्थितीपासून सुटका नाही. दोन पिढीतील वाढते अंतर – दुरावा, तरुण पिढीची बदललेली जीवन शैली, लहान जागा, आर्थिक परिस्थिती, वाढलेले आयुष्यमान, बदल न स्वीकारण्याची तरुण आणि आधीच्या पिढीची प्रवृत्ती अश्या अनेक कारणांनी वृद्धाश्रमाची गरज निर्माण झाली आहे.

वृद्धाश्रमात जावे कि नाही आणि कोणत्या वयात वृद्धाश्रमात जाण्याचा  निर्णय घ्यावा, ह्या प्रश्नांची उत्तरे शोधणे वाटते तेव्हडे सोपे नाही. त्यासाठी आर्थिक – मानसिक तयारी करावी लागते. माणूस म्हातारपणासाठी आर्थिक नियोजन करतो, पण निवृतीनंतरच्या आयुष्याचे नियोजन करण्यास टाळाटाळ करतो. असे मानसिक नियोजन न करता वृद्धाश्रमात जाणे, म्हणजे आगीतून फुफाट्यात पडण्यासारखे आहे.

वयस्कर मंडळीनी स्वत:चे वागणे तपासून बघितले पाहिजे. तरुण पिढी आपल्याला का टाळते हे समजून घेतले पाहिजे. ह्यातून  आपण योग्य तो धडा घेतला  तर तुमचे सध्याचे वास्तव्य इतरांसाठी सुखकारक करणे तुमचे हातात असेल.

म्हातारपणी वाचन आणि Technology (संगणक, mobile ) ला मित्र केले पाहिजे म्हणजे दोन पिढीतील दरी कमी होण्यास मदत होईल.
——————————————————————————————-

वाचकांनी आपली मनोभूमिका सुधारण्यासाठी खालील पुस्तके नक्की वाचावी. ह्या पुस्तकांचे परीक्षण माझ्या ब्लॉग वर  उपलब्ध आहे.

आनंदाश्रम / बाबा भांड /साकेत प्रकाशन / Rs १००/- पहिली आवृत्ती २०१० /
पृष्ठ संख्या १२७

माणूस आणि निसर्गाच्या अतूट नात्याची आणि माणसाच्या पर्यावरणाची हि गोष्ट आहे.

आनंददायी जीवनसंध्या / मीरा भट्ट / अनुवाद – सुलभा कुलकर्णी / प्रकाशक – रघुनाथ कुलकर्णी / ०३-११-२०१० / Rs ७५/- पृष्ठे ८८

——————————————————————————————

वृद्धापकाळ – मरण ह्या विषयावर माझ्या मनात अनेकवेळा तरंग उमटत असतात. वेळोवेळी हे विचार मी शब्दबद्ध करत असतो. विचारांची स्पंदने आणि कवडसे देत आहे. ते नक्की तुम्हाला पटतील. मनाची कवडे उघडी ठेवून ह्यावर विचार करा व आपल्या वर्तणूक शैलीत आवश्यक ते बदल करा.
आपण सर्व जण लहानपणापासून स्वप्ने बघतो. काहीवेळा आपल्या पालकांची स्वप्ने आपल्यावर लादली जातात. योग्य मार्गदर्शन मिळाले व आपल्यात स्वप्न पूर्ण करायची क्षमता असेल तर काही स्वप्ने प्रत्यक्षात उतरतात. काही उरतात. पूर्ण न झालेली स्वप्ने उराशी बाळगून आपल्या आयुष्याची वाटचाल सुरूच असते. पण आयुष्याच्या उत्तरार्धात हि स्वप्ने पूर्ण होण्याची शक्यता दुरावते. मग काही वेळा हि स्वप्ने पुढील पिढीकडे दिली जातात. आणि हे रहाट गाडगे चालू राहते.

अपूर्ण स्वप्ने मला PC मधील न वापरलेल्या utility programme सारखी वाटतात. आपण फ्री म्हणून download तर केलेली असतात पण आपल्याला खरेच त्या utility ची गरज आहे का हा विचार न करता. मग कधीतरी ह्या न वापरलेल्या Utility तील Virus आपल्याला त्रास देतो. अपूर्ण स्वप्नांचे पण असेच होते. हि अपूर्ण स्वप्ने म्हातारपणी आपले मन अस्वस्थ करत राहतात. कोणीतीही गोष्ट योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य कारणासाठी मिळाली तर मजा असते. म्हातारपणी हि स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द आणि वेळ निघून गेलेली असते. म्हणून आपल्या मनातील स्वप्ने वेळोवेळी तपासून बघितली पाहिजेत आणि आपल्या मनातून कोणीही खंत न बाळगता delete केली पाहिजेत. तरच आपले आयुष्य व शेवटचा दिवस गोड होईल.
—————————–
आपल्या आयुष्यात वाद विवादाचे प्रसंग बरेच वेळा येतात. काही वेळेला वाद विवाद करताना मुळ विषय बाजूला पडतो आणि ह्या वाद विवादाला वेगळेच वळण लागते. भांडण वैयक्तिक पातळीवर उतरते. आपला इगो दुखावला जातो. अश्या वेळी एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे कि आरोप प्रत्यारोप न करता, शांतपणे चर्चा केली पाहिजे. कारण आरोप प्रत्यारोपाचा उद्देश कोण बरोबर हे ठरवण्याचा असतो. त्यात कोणाचाच फायदा नाही. चर्चा केल्यानंतर नेमके काय बरोबर हे कळू शकते. बघा विचार करुन.

“Argument is bad but Discussion is good,
Because Argument is to find out WHO is right.. &
Discussion is to find out WHAT is right..”
———————————————
काही प्रसंगात उलटा – दुसऱ्या बाजूने विचार करून प्रश्न सुटू शकतात.
उलट्या बाजूने विचार सुरु केला तर कदाचित समोरच्या माणसाची बाजूपण समजून घ्यायला मदत होते…..
——————————————
नवरा-बायकोचे प्रेम हे ओंजळीत धरलेल्या पाण्यासारखे असते. खूप प्रेम – खूप प्रेम म्हणून ओंजळ बंद करायला गेलात, तर space न मिळाल्यामुळे वैवाहिक जीवनात प्रश्न निर्माण होतात. वेळेवर स्वावलंबी व्हा.
————————————–

There are three stages of Marriage namely
MAD for each other /
MADE for each other /
MAD because of each other.
———————————–
मरणावर सुद्धा प्रेम करावे …कारण मरण म्हणजे पुन्हा जन्म .…………
——————————–
वैयक्तिक प्रश्नांची उत्तरे वेळेवर मिळाली नाहीत तर ते प्रश्न विसरून जायचे असतात म्हणजे मनाला त्रास होत नाही. उत्तर वेळेवर मिळण्यात जी मजा आहे, ती मजा उत्तर ओरबाडून घेण्यात नाही.

आपल्या समोरील समस्येच्या बाजूला दुसऱ्या माणसाच्या मोठ्या समस्येची रेषा आखली कि आपली समस्या हि समस्याच नसून देवाने आपल्याला परीक्षा देण्यासाठी संधी दिली आहे असा भास होतो.

दुसऱ्याला गृहीत धरण्याची सवय अनेक लोकांना असते, कारण त्यांना मी आणि माझे ह्यात जास्त रस असतो. इतर सर्व लोक हे केवळ आपल्याला सेवा देण्यासाठी आहेत असा त्यांचा ग्रह असतो. मी गृहीत धरतो म्हणजे माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे असा युक्तिवादही केला जातो. जेव्हा आपल्याला दुसऱ्याकडून गृहीत धरले जाते, तेव्हा आपण नेमके कसे वागतो ? असा विचार केला पाहिजे. असे झाले तर परिस्थितीत नक्की सुधारणा होईल.

दुसऱ्याच्या चुका सांगताना, आपणही चुका करतो का? हे तपासले तर बरे होईल. आपण जेव्हा एक बोट दुसऱ्याकडे दाखवितो तेव्हा तीन बोटे आपणाकडे असतात, ह्याचे भान ठेवणे आवश्यक आहे.

चूक कबूल करायला धैर्य लागते. चूक कबूल करताना आपल्या मनाला ज्या वेदना होतात, तीच आपली कालांतराने शक्ती बनते आणि आपण नवीन चुक करण्यापासून परावृत्त होतो.

नाते आणि पैसा दोन्हीही आपापल्या जागी योग्यच. पण नात्यात पैसा आला किवा पैशात नाते लुडबुड करायला लागले कि प्रश्न निर्माण होतो.

मन जेव्हा अस्वस्थ असेल तेव्हा मनाचे मन व्हा आणि मनाची समजूत काढा म्हणजे सर्व गोष्टी सोप्या होतात.

अंधारही सुंदर असतो. खूप काही माणसाला शिकवतो. पण आपण मात्र अंधाराला घाबरतो. कधीतरी शांतपणे अंधारात बसून बघा आणि अनुभव घ्या.

मोह टाळण्याचा अभ्यास हा लहानपणापासून करायचा असतो. ह्या प्रवासात पहिले गुरु हे आपले पालक असतात . ते भाग्य नाही लाभले तर हा प्रवास आपण जसे मोठे होतो, जगाचा अनुभव येतो त्यानुसार करावा लागतो. हा मोह जिंकता आला नाही तर त्याचा प्रवास आस, ध्यास आणि हव्यास ह्या धोकादायक वळणावरून सुरु होतो आणि मग गोष्टी हाताबाहेर जातात. मोह टाळणे शक्य आहे provided you form the habit of loving what you get in life as you may not get what you want in life.

संवाद करायला माणूस २ वर्षांचा असताना शिकतो. पण काय बोलावे, कसे बोलावे, काय बोलू नये वगैरे शिकायला कधी कधी एक जन्म सुद्धा अपुरा पडतो.

मन मारून काहीही करू नये. जे करायचे ते मनापासून आणि मनाचा कौल जाणून. जे आपल्या मनाला पटते तेच करावे, पण त्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे .

चांगल्या शारीरिक आरोग्यासाठी आणि मनाच्या शांती साठी जिभेवर नियंत्रण हवे.

एकटेपणा हा काही वेळा माणसाचा भोग असतो . कधी तो परिस्थितीने लादला जातो. तर काही वेळा मनुष्याच्या स्वभावामुळे तो एकटा पडतो. एकटेपणा काही वेळा थोड्या काळापुरता असतो तर काही वेळा अधिक काळासाठी. मनाशी संवाद साधून ह्या एकटेपणातून मार्ग काढता येतो.

तरुणपणी आरोग्याची काळजी न घेता माणूस पैशाच्या मागे लागतो आणि म्हातारपणी तेच पैसे आरोग्य मिळविण्यासाठी डॉक्टरला देतो.

कित्येक वेळा परिस्थिती माणसाला मासिक दृष्ट्या स्वावलंबी बनवते. पण कोणीही हे करू शकतो. ह्याची सुरवात लहान लहान सुखे नाकारून करता येते. मनाची शक्ती आपोआप वाढते. स्वत:ची कामे शक्यतो स्वत: करणे हा दुसरा उपाय. जेव्हा तुम्ही फार कमी गोष्टींसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहता, तेव्हा तुमची बरीच tension साहजिकपणे कमी होतात.

आपण जेव्हडे दुसऱ्यावर अवलंबून राहतो (प्रेमाचा बुरखा पांघरून) तेव्हडे आपण स्वत:चे नुकसान करत असतो. मी माझ्या संपर्कात येणाया लोकांना ‘ मानसिक दृष्ट्या ‘ स्वावलंबी’ होण्यास प्रवृत करतो. मी स्वत: कोणाच्यात गुंतत नाही आणि कोणाला माझ्यात गुंतू देत नाही.

आयुष्य म्हणजे  ऊन आणि सावल्यांचा खेळ आहे.

सुखी होण्याचा एक मार्ग म्हणजे आपले कोणावाचून अडता कामा नये.

स्वधर्मावर – कामावर  प्रेम आणि ज्याच्यासाठी – ज्याचे काम करतो ह्यावर प्रेम असेल तर कोणत्याच कामाचे ओझे वाटत नाही. गीता आपल्याला हीच शिकवण देते

स्वधर्म (काम) पाळणे  आपले प्रथम कर्तव्य असते.

जो मोह जिंकतो त्याचे आयुष्य नक्कीच सुखात जाते.

सुख दु:ख हे गणितापेक्षा मोठे कोडे आहे.

दुसऱ्याला सांभाळून घेण्यासाठी स्वत:चा इगो आकारात असणे गरजेचे आहे.

जेव्हा नम्रता हि तुमची कमजोरी आहे, असा चुकीचा पवित्रा समोरच्या कडून घेतला जातो आणि तुम्ही गप्पा बसता, तेव्हा नम्रता हा दोष ठरतो असे मला वाटते.

नात्यांचे गणित सोडविणे हे बरेच वेळा  अवघड असते

चांगुलपणा बरोबर unpredictable पणा  जपला, तर गोष्टी थोड्या सोप्या होतात .
आपले आयुष्य म्हणजे असंख्य घटनांची साखळी असते. काही घटना अनपेक्षित असतात, काही घटना घडणार हे माहित असते, पण त्याची वेळ माहित नसते, काही घटनांची वेळ माहित असते. प्रत्येक घटनेच्या वेळी बरेच वेळा आपण ‘ प्रतिक्रिया ‘ (Reaction ) देत असतो . त्याऐवजी आपण Response देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे आयुष्यातील बरीच tensions कमी होण्यास मदत होते. अर्थात ह्या साठी त्या घटनेवर आधी विचार करावा लागतो.
उजेडात असणारी सोबत हि नेमकी किती खरी आणि किती खोटी हा प्रश्न उरतोच. अंधारात सोबत नसते पण आपले मन आपल्याला कधीच सोडून जात नाही.

माझ्या मते, कोणी विचारल्यानंतरच आपले मत द्यावे . अश्यावेळी आपण जर ‘ श्रेयस्कर मत ‘ (समोरच्यासाठी श्रेयस्कर – पण त्याला ऐकायला कदाचित आवडणार नाही ) देणार असो तर फारसा प्रश्न पडत नाही . पण लोकांना ‘ प्रिय मत’ आवडते . प्रत्येकाला मत स्वातंत्र्य आहे, पण जेव्हा Your Right is at the cost of My Right ‘ अशी परिस्थिती येते  तेव्हा संघर्ष अटळ असतो.

जन्म आपल्या हातात नसतो, पण कसे जगावे हे मात्र आपण नक्की ठरवू शकतो.

नाती तुटायला कोणते कारण लागतेच असे नाही.

मनाचे समाधान हे सर्वात महत्वाचे.

माझ्या मते चांगले वागणे आणि वाईट वागणे हे समोरचा  माणूस कसा आहे हे बघूनच ठरवावे लागते.  जास्त चांगुलपणा हा तुमची कमजोरी असे समजले जाते. आपण वाईट वागू शकतो हा आभास समोरच्याला मनात  असणे आवश्यक असत.

समोरच्यासाठी श्रेयस्कर वागणे आणि समोरच्यासाठी प्रिय वागणे ह्याची सीमा रेषा ठरवावी लागतेच.

आपण  काय बोलतो हे आपल्याला कळणे  जास्त महत्वाचे असते . इतरांचा विचार करू नये.

जर आपल्या वागणुकीचा त्रास दुसर्यांना  होत नसेल, तर आपल्या मनाप्रमाणे वागायला हरकत नाही . लोगोका काम है कहेना !!!

आपले अस्तित्वच ह्या जगात शाश्‍वत नाही, तेथे शाश्‍वत आधार मिळणे दुरापास्तच आहे.

Generally there are fights between two rights rather than right & wrong. The only precaution one has to take is that your Right should not be at the cost of my RIGHT. With this basic understanding, the dispute can always be resolved.

It is also necessary to understand as to why conflict takes place between the persons. Friends may read my article. Link: http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/68-conflict.pdf

प्रत्येक सुखात एक दु:ख असते आणि प्रत्येक दु:खात एक सुख. बघा विचार करून.

इथे शाश्वत असे काहीच नाही….!! हे जितक्या लवकर मनात रुजेल तो तुमच्या भाग्याचा दिवस असे समजावे. सुखाचा रस्ता ह्याच दिशेला जातो.

एखाद्या गोष्टीबाबत सगळ अगदी जमून आलंय असं कधी होतंच नाही…..काहीतरी राहूनच जात, नकळत……!! कदाचित ह्यामुळेच आपल्या जगण्याला संजीवनी मिळत असेल.

वेदनेचे फळ सुख, मन:शांती देणारे आणि काळजी मिटविणारे असेल तर माणूस अशी वेदना सहज स्वीकारतो आणि  भोगायला तयार  होतो.

प्रयत्न आणि यश यांची ज्याच्या मुळे भेट होते किवा होत नाही, ते नशीब.

आयुष्यात मानसिक शांती हवी असेल तर नाही ऐकायची आणि नाही म्हणण्याची सवय केली पाहिजे .

आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर, मी काय करू शकतो, मी काय करणार, किती – कुठपर्यंत तडजोड करणार, स्वत:ला काय नको, मी काय करणार नाही, हे नक्की हवे.

बरेच वेळा हृदयाचा आवाज (आतला आवाज- मनाचा कौल ) ऐकणे फायद्याचे ठरते.

समस्येवर उपाय शोधत असाल तर प्रथम त्या समस्येचा मनापासून स्वीकार करा. ज्या क्षणी तुम्ही समस्येचा स्वीकार कराल, त्या क्षणी त्या समस्येचा तुमच्या मनावरील ताण कमी झालेला आढळेल. त्यानंतर समस्या सोडविण्यासाठी तुम्ही यशस्वी प्रयत्न करू शकाल.

काही वेळा हरण्यात सुद्धा मजा असते. सतत जिंकण्याचा सवयीने कालांतराने मनावर ताण येतो. त्यामुळे काही वेळा झालेली हार किवा मनासारखे न मिळालेले यश सुद्धा enjoy करा. जेव्हा तुम्ही जिंकत होतात तेव्हा कोणीतरी हरत होतेच किवा नंबर २ वर होते. !!!!!!! बघा विचार करून. !!!!!!

अहंकार हा माणसाचा मोठा शत्रू आहे. अभिमान आणि अहंकार ह्यातील सीमारेषा खूप धुसर आहे. माणसाला अहंकार वाटू लागला कि समोरची व्यक्ती, परिस्थिती आणि वस्तू यांचे आकलन करण्याची शक्ती धुसर होते. निर्णय चुकतात, पण तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते.

ह्या सगळ्याची सुरवात मिळालेले यश न पचवता आल्यामुळे होते. प्रथम ह्या यशाचा अभिमान वाटू लागतो. कालांतराने अभिमानाची जागा अहंकार घेतो. त्यामुळे यश पचवायला शिका म्हणजे अहंकाराचा प्रश्नच निर्माण होणार नाही.

बदल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. शारीरिक बालपण सर्वांचेच संपते. पण मनातील बालपण आणि निरागसता हरवणार नाही हि काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे.

आपले आयुष्य म्हणजे जन्मापासून – मृत्यू पर्यंत येणाऱ्या अनेक क्षणांचे एक जाळे असते. हे क्षण आनंदाचे, सुखाचे, दुःखाचे, समाधानाचे, यशाचे, अपयशाचे, इच्छापूर्तीचे, अपेक्षापूर्तीचे, समस्येचे, काळजीचे, हुरहुरीचे, प्रेमाचे, रागाचे, अहंकाराचे, वेदनेचे …. ……असतात . (हि यादी कितीही लांबू शकेल…………………… )
काही घटना अनपेक्षित असतात, काही घटना घडणार हे माहित असते, पण वेळ माहित नसते. आपण ह्या क्षणाना – घटनांना कसे सामोरे जातो ह्या गोष्टीवर आपल्या आयुष्याचा डोलारा उभारलेला असतो प्रत्येक घटनेच्या वेळी बरेच वेळा आपण ‘ प्रतिक्रिया ‘ ( Reaction ) देत असतो. त्याऐवजी आपण Response देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे आयुष्यातील बरीच tensions कमी होण्यास मदत होते.

आपल्या आयुष्यात समस्या येतात आणि जातात. समस्या कश्या आणि कोठून येतील  हे काही वेळेला माहित असते. काही वेळेला अमुक गोष्टीमुळे समस्या येणार नाही असा आपला ठाम विश्वास असतो  आणि आपण गाफील राहतो. पण समस्या बरोबर त्याच मार्गाने येते आणि आपण अवाक होतो.

त्यामुळे जर का तुम्ही भविष्यात येऊ शकणाऱ्या समस्येचा मुकाबला कसा करायचा याची पूर्व तयारी करत असाल, तर समस्या निर्माण करणाऱ्या सर्व शक्यतांचा विचार करून व्युह रचना करा. ….

आयुष्य कसे जगायचे हे समजून घेतो तो खरा सुखी.

माणसाने जीवनात कितीही उंची गाठली पैशाने असो,प्रसिद्धीने असो,कर्तृत्वाने असो …. पण जर आचरणात सुद्धा साधेपणा,नम्रपणा ठेवला तर त्या उंचीचा मान समाजात नक्कीच अधिक वाढतो.

दिसणे आणि असणे ह्यातील नेमका फरक जेव्हा माणसाला कळेल तो सुदिन.

मन स्वच्छ ठेवले तर समाजातील अनेक समस्या आपोआप सुटतील.

घर लहान असले तरी मोठे मन हि उणीव भरून काढू शकते.

आयुष्य म्हणजे सुख आणि दु:खाचे कापड आहे . आपले  कापड थोडे मळकट रंगाचे आहे इतकेच. जे मिळाले आहे त्यावर प्रेम करणे म्हणजेच सुखी जीवन .

आयुष्यात प्रत्येकाला समस्या असतात. काही समस्या सांगता येतात तर काही सांगता येत नाहीत.

कमी शिक्षण – गरिबी हा काही गुन्हा नाही. जन्म आपल्या हातात नसतो पण जगणे नक्कीच आपल्या हातात असते .

मरण ह्या शब्दाला माणूस घाबरतो. माझ्या मते मरणासारखी सुंदर गोष्ट नाही. मरण हे आयुष्यातील अंतिम सत्य आहे. असो.

मरणाने अनेक समस्या सुटण्यास मदत होते / किवा त्या समस्या सुटतात. परंतु काही वेळा अनेक समस्या तात्पुरत्या जन्म घेतात.

संवेदनशीलता माणसाबरोबर जन्म घेते  आणि त्याच्याच बरोबर नाहीशी होते असे मला वाटते.

आपले आयुष्य म्हणजे  पानावरच्या पाण्याच्या थेंबासारखे आहे.

प्रत्येक माणसाने प्रत्येक क्षणी (सुखाच्या, दु:खाच्या, वेदनेच्या वेळी ) जर  पुढील ४ शब्द लक्षात ठेवले, तर त्या माणसाचे पाय आपोआपच आयुष्यभर जमिनीवर राहतील, जेणेकरून माणूस म्हणून जन्म मिळाला असला तरी त्याचे माणूसपण सिद्ध होईल. ते जादूचे शब्द आहेत ” This too will pass.” ( हे हि दिवस जातील )

मित्रानो, बघा विचार करून आणि ह्या शब्दांचा उपयोग करायला लागा. ह्या शब्दांमुळे माणसाला कधीही कोणत्याही क्षणी अति आनंद , अति दु:ख, अति वेदना होणार नाहीत.

भूतकाळ, वर्तमानात जगण्यासाठी प्रेरणा देईलच ह्याची खात्री नाही , त्यासाठी वर्तमान काळातील ध्येयच लागते, असे माझे मत आहे.

मनातील अवस्थता वाणीत  – बोलण्यात उतरते आणि पुढे प्रत्यक्ष कृतीत परावर्तीत होते. त्यामुळे हाच तो क्षण –  हीच  ती वेळ असते स्वत:ला सावरण्याची.

मन:शांती मिळवायची असेल तर आयुष्यात जे मिळाले आहे, त्यावर प्रेम करा. कारण आपल्याला जे हवे असेल ते मिळेल ह्याची खात्री नसते.

ज्या माणसाकडे सर्व सुखसोई – गोष्टी आहेत त्याला समाज सुखी आणि श्रीमंत मानतो, पण खरेतर ज्याला सुखी होण्यासाठी कोणत्याही गोष्टीची गरज पडत नाही तो खरा सुखी आणि श्रीमंत, असे मला वाटते.
Common sense is most uncommon.
चेहऱ्या मागील चेहरा हि ओळख जर तुमच्या वर्तनातून लोकांना दिसली तर त्यांचे तुमच्या चेहऱ्याकडे लक्षच जाणार नाही. तुमचा चेहरा कदाचित ते कालांतराने विसरतील, पण तुमचा खरा चेहरा मात्र त्यांच्या मनात कायमचा कोरला जाईल .

कोळ्याच्या जाळ्याप्रमाणेच आपल्या आयुष्यातही मोहाचे अदृश्य जाळे असते. कीटक जेव्हा कोळ्याच्या जाळ्यात अडकतो तेव्हा त्यातून सुटणे खूप कठीण असते. माणसाची सुद्धा ह्याहून वेगळी अवस्था नसते. मोहावर विजय मिळवा. मनाचा संयम आणि निग्रह वाढवा.

आयुष्यात अनेक वेळा विनाकारण नकारात्मक विचार येतात.  नकारात्मक विचार हे पावसासारखे असतात. आधी शिंतोडे पडतात, मग भूर भूर चालू होते आणि मग कोसळायला सुरवात होते. पाऊस सुरु झाला कि आपण कसे चटकन छत्री उघडतो, तसेच जेव्हा नकारात्मक विचार मनात येऊ लागले कि त्यांना झिडकारा, मनाचा गाभारा सकारात्मक विचारांनी भरा आणि बघा  – अनुभवा जादू.

माणसाने स्वत:चा विचार जरूर करावा. पण त्याच बरोबरीने आपला विचार करणाऱ्या माणसाच्या मनाचा विचार केला, तर आपल्या आयुष्यात सुखाची बरसात होऊ शकते.

असे म्हटले जाते कि कळते पण वळत नाही. ‘ कळणे ‘ हे बौद्धिक  पातळीवर घडते.
‘ वळणे ‘ हे मात्र शारीरिक पातळीवर घडावे लागते.  आता भारतातील मतदार कळते पण वळत नाही ह्या स्थितीतून बाहेर पडले आहेत असे वाटते.

कुटुंब व्यवस्थेचा पाया हा कुटुंबातील व्यक्तीच्या उपयुक्ततेवर ठरतो असे माझे मत आहे.

जो पर्यंत जेष्ट पालक दुसऱ्या पिढीला उपयुक्त असतो (आर्थिक, नातवंडांची – घराची जबाबदारी – घरातील कामे वगैरे ) तो पर्यंत त्याची किंमत ठेवली जाते.  त्याने कामे करायची पण योग्य सल्ले सुद्धा द्यायचे नाहीत हे अपेक्षित असते. नातवंडांच्या – सुनेच्या तक्रारी करायच्या नाहीत. नातवाला शिस्त लावण्याच्या भानगडीत पडायचे नाही. थोडक्यात तोंड बंद ठेवायचे.

नकारात्मक विचार हे काही अपवाद वगळता नकारात्मक नसून ठरवलेली गोष्ट कशी योग्य रीतीने (सकारात्मक) साध्य होईल याची पूर्वतयारी असते. आयुष्याचा प्रवास हा नकारात्मक (वजा चिन्ह ) ते सकारात्मक (अधिक चिन्ह ) हा जास्त सहजपणे होतो. जेव्हा फक्त सकारात्मक दृष्टीकोन ठेवला जातो तेव्हा वाटेतील खाच – खळगे नजरेतून सुटण्याची शक्यता असते. वजा चिन्हाचे (-) अधिक चिन्ह (+) करणे खूप सोपे असते. पण + चिन्हातून – चिन्हा पर्यंतचा प्रवास हा हा वेदनामय असतो. बघा विचार करून.

आयुष्यात अनेक घटना घडतात. प्रत्येक घटनेचे निरनिराळ्या  मापदंडाप्रमाणे विश्लेषण करता येतेच असे नाही, असे माझे मत आणि अनुभव आहे.

मित्रानो  स्पंदने – कवडसे म्हणजे जगावे कसे हे सांगणारी काही मुलभुत सिद्धांत आहेत.  खडतर आयुष्याने मला हे सिद्धांत शिकवले आणि मी जे अंगिकारले.

हा विषय बराच गहन आहे तसाच व्यक्ती सापेक्ष आहे. आपले म्हातारपण सुखाचे जावे असे वाटत असेल तर तरुण वयापासून  तयारी केली पाहिजे. त्यामुळे हा लेख जेष्ठ नागरिकांनी तसेच  तरुण मंडळीनी वाचला पाहिजे.

वर दिलेल्या लेखात अनेक बाबींचा उहापोह केला आहे. परंतु जाता जाता परत एकदा  मुख्य गोष्टी अधोरेखित करतो.

१) जो पर्यंत आपण शारीरिक आणि मानसिक दृष्टया सक्षम आहात, तो पर्यंत वेगळे राहा व स्वातंत्र्य उपभोगा.

२) पैसा अडका – जागा आपल्या व पत्नीच्या नावावर ठेवा. प्रेमाखातर  किंवा इतर कारणांनी स्वत:ची संपत्ती मुलगा – मुलीच्या नावावर करू नका.

३) म्हातारपणी  आपली मुले आपला सांभाळ करतील, ह्या त्यांच्या बोलण्यावर १०० % विसंबून राहू नका.  तरुण पिढीचे अग्रक्रम चटकन बदलतात, ह्याचे भान ठेवा.

४) तरुण मंडळींशी मैत्रीचे संबंध जोडा, जेणेकरून तुमच्या कठीण काळात मदत मिळू शकेल.

५) तुलना  टाळा. स्वावलंबी राहा. शक्यतो  कोणाकडून अपेक्षा ठेवू नका म्हणजे अपेक्षाभंग होणार नाही.

६) मुलाबाळांनी मागितल्या शिवाय सल्ला देऊ नका. चांगल्या शब्दात योग्य तोच सल्ला द्या.

७) आपल्या वयाची ढाल पुढे करून आपली काळजी घेतली जावी असे मानसिक दबावतंत्र वापरू नका.

८) ऐकावे जनाचे पण करावे मनाचे,  हे कायम लक्षात ठेवा.

९) देवाकडे कोणीतीही  मागणी करू नका. मागितलेले सगळे देव देत नाही याचा प्रत्यय आजपर्यंतच्या आयुष्यात आलाच असेलच.

१०) कार्यरत राहा. छंद  जोपासा. तब्बेतीची काळजी घ्या. हलका व्यायाम करा. नियमितपणे फिरायला जा. खाण्याच्या वेळा सांभाळा. जिभेवर ताबा ठेवा म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहील.

ह्या व्यक्ती सापेक्ष विषयाचा आवाका एव्हडा मोठा आहे कि कितीही लिहिले तरी कमीच आहे. तुम्हाला काही नवीन मुद्दे सुचले तर मला कळवायला विसरू नका.

तुमच्या वृद्धापकाळासाठी माझ्या शुभेच्छा.

सुधीर वैद्य

०१-१०-२०१४

Advertisements

0 Responses to “३६०) ‘ संध्या छाया भिवविती हृदया ‘ – चिंतन ……”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

October 2014
M T W T F S S
« Jul   Nov »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: